India vs Canada Issue | भारताशी पंगा महाग पडणार, महिंद्रानंतर आता ‘ही’ मोठी कंपनी कॅनडातून गुंडाळणार बिझनेस?

India vs Canada Issue | कॅनडाला भारतीय उद्योगसमूहाकडून झटका. कॅनडाने खलिस्तानी दहशतवादाच्या मुद्यावरुन भारतावर आरोप केले आहेत. भारत सरकारप्रमाणे भारतीय कंपन्यांनी सुद्धा आक्रमक भूमिका घेतलीय.

India vs Canada Issue | भारताशी पंगा महाग पडणार, महिंद्रानंतर आता 'ही' मोठी कंपनी कॅनडातून गुंडाळणार बिझनेस?
India vs Canada
Follow us
| Updated on: Sep 23, 2023 | 1:15 PM

टोरंटो : भारत आणि कॅनडामधील वाद दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढत चाललाय. खलिस्तानवरुन सुरु झालेला वाद आता दोन्ही देशाच्या अर्थव्यवस्थांवर परिणाम करु लागलाय. भारताशी पंगा कॅनडाला खूप महाग पडेल. भारताने नुकताच एक कठोर निर्णय घेतला. पुढील आदेशापर्यंत कॅनेडीयन नागरिकांसाठी व्हिसा स्थगित केला आहे. भारतीय कंपन्या कॅनडामधील आपला व्यवसाय बंद करत आहेत. कॅनडासाठी हा आर्थिक फटका आहे. दिग्गज भारतीय उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी कॅनडामधील आपला व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. महिंद्रा एंड महिंद्राने कॅनडामधील आपली सब्सिडियरी कंपनीच ऑपरेशन बंद केलं आहे. महिंद्रा अँड महिंद्रा नंतर आता आणखी एका भारतीय कंपनी कॅनडामधील आपला व्यवसाय बंद करु शकते. भारताची JSW स्टील लिमिटेड कॅनडातील टेक रिसोर्सेज कंपनीसोबत डील करणार होती. वाढता वाद पाहून कंपनीने डीलचा वेग कमी केला आहे.

कॅनडा आणि भारतामधील वाढता वाद लक्षात घेऊन महिंद्रा एंड महिंद्राने कॅनेडीयन कंपनी रेसन एयरोस्पेस कॉर्पोरेशनसोबतची आपली भागीदारी तोडण्याचा निर्णय घेतला. महिंद्रानंतर आणखी एका भारतीय कंपनीने कॅनडाच्या कंपनीमधील हिस्सेदारी खरेदी करण्याच्या प्रोसेसची गती कमी केलीय. भारताची JSW स्टील लिमिटेड आणि कॅनडाच्या टेक रिसोर्सेजमध्ये डील होणार आहे. तो वेग आता कमी केलाय. JSW कॅनेडीयन कंपनी टेक रिसोर्सेसच्या स्टील मॅन्यूफॅक्चरिंग यूनिटमध्ये कोल यूनिटमध्ये भागीदारी विकत घेणार आहे. दोन्ही देशातील तणाव लक्षात घेता, कंपनीने या डीलला स्लोडाऊन केलय. रॉयटर्सच्या वृत्तानुसार कंपनी दोन्ही देशातील तणाव कमी होण्याची प्रतिक्षा करणार आहे. 2000 ते 2023 पर्यंत कॅनडाची भारतात किती गुंतवणूक?

रॉयटर्सनुसार, भारताची दिग्गज टेक फर्म TCS, इन्फ़ोसिस, विप्रो सारख्या 30 भारतीय कंपन्यांनी कॅनडामध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केलीय. भारतीय आयटी कंपन्यांच्या गुंतवणूकीमुळे कॅनडामध्ये एका मोठ्या लोकसंख्येला रोजगार मिळतोय. कॅनडातील सर्वात मोठा पेंशन फंडने एकट्या भारतात 1.74 लाख कोटीची गुंतवणूक केली आहे. कंपनीने ही गुंतवणूक लाँग टर्म लक्षात घेऊन केली आहे. तणाव वाढल्यास दोन्ही देशातील आयात-निर्यातीवर परिणाम होईल. इन्वेस्ट इंडियाच्या माहितीनुसार, एप्रिल 2000 ते मार्च 2023 पर्यंत कॅनडाने भारतात जवळपास 3306 मिलियन डॉलरची गुंतवणूक केलीय.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.