एअरटेल पाठोपाठ व्होडाफोन आयडियाचा ग्राहकांना झटका; सर्व प्रिपेड प्लॅन महागणार, जाणून घ्या नवे दर

दोन दिवसांपूर्वीच एअरटेलने प्रिपेड प्लॅनमध्ये दरवाढ करणार असल्याची घोषणा केली होती. एअरटेल पाठोपाठ व्होडाफोन आयडियाने देखील आपल्या प्रिपेड प्लॅनच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

एअरटेल पाठोपाठ व्होडाफोन आयडियाचा ग्राहकांना झटका; सर्व प्रिपेड प्लॅन महागणार, जाणून घ्या नवे दर
Follow us
| Updated on: Nov 24, 2021 | 6:20 AM

मुंबई : Vodafone Idea New Plans – दोन दिवसांपूर्वीच एअरटेलने प्रिपेड प्लॅनमध्ये दरवाढ करणार असल्याची घोषणा केली होती. एअरटेल पाठोपाठ व्होडाफोन आयडियाने देखील आपल्या प्रिपेड प्लॅनच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता व्होडाफोन आयडियाच्या ग्राहकांना देखील आर्थिक झळ बसणार असून, नवे दर येत्या 25 नोव्हेंबरपासून लागू केले जाणार आहेत. वर्तमान काळात व्होडाफोन आयडियाचा सर्वात स्वस्त प्रिपेड प्लॅन हा 75 रुपयांचा आहे, त्यामध्ये वाढ होऊन तो 99 रुपये इतका होणार आहे. म्हणजे व्हीआय नेटवर्क देखील आपल्या सर्व प्रिपेड प्लॅनची किंमत 20 ते 25 टक्क्यांनी वाढवणार आहे.

    असे असतील नवे प्लॅन

व्होडाफोन आयडियाच्या सुधारित दरानुसार 149 रुपयांच्या प्रिपेड प्लॅनची किंमत 179 रुपये होणार आहे. ज्यामध्ये ग्राहकांना 28 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग 300 एसएमएस आणि महिन्याला 2GB डेटा मिळणार आहे. तर 219 रुपयांच्या प्लॅनची किंमत वाढवून 269 रुपये एवढी करण्यात आली आहे. यामध्ये ग्राहकांना 28 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉल दिवसाला 100  एसएमएस आणि दर दिवशी 1 जीबी इंटरनेट मिळेल. 299 रुपयांच्या प्लॅनसाठी ग्राहकांना 359 रुपये मोजावे लागणार आहेत. यामध्ये 28 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉल दिवसाला 100  एसएमएस आणि दर दिवशी 2 जीबी इंटरनेट मिळेल. अशा प्रकारे आयडिया व्हॉडाफोन आपल्या सर्वच प्रिपेड प्लॅनमध्ये जवळपास 20 ते 25 टक्के वाढ करणार आहे.

एअरटेलनेही प्रिपेड प्लॅनच्या किमती वाढवल्या

दरम्यान आयडिया व्होडाफोन प्रमाणेच भारती एअरटेलने देखील आपल्या प्रिपेड प्लॅनच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने सर्वच अनलिमिटेड प्लॅनच्या दरांमध्ये वाढ केली आहे. अनलिमिटेड प्लॅनचे दर 20 टक्क्यांनी वाढवण्यात आले आहेत. तर 28 दिवसांची मुदत असलेल्या 75 रुपयांच्या प्लॅनमध्ये वाढ करून तो आता 99 रुपये करण्यात आला आहे. तसेच 149 रुपयांच्या प्लॅनमध्ये वाढ करून तो 179 रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे. तसेच 219 रुपयांच्या प्लॅनसाठी आता 265  रुपये मोजावे लागणार आहेत. कंपनीने केल्या या अचानक दरवाढीमुळे ग्राहकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ बसण्याची शक्याता आहे.

संबंधित बातम्या 

देशात महागाईचा उच्चांक; भाजीपाल्याचे दर वाढले, टोमॅटो 80 रुपये किलो

Petrol Diesel Price: ऑईल कंपन्यांकडून नवे दर जाहीर; ‘असे’ चेक करा घरीबसल्या अपडेट भाव

शेअरबाजारात सलग दुसाऱ्या दिवशी पडझड; सेन्सेक्स 748 अंकांनी घसरला

Non Stop LIVE Update
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.