Saving Account : खातेदाराच्या मृत्यूनंतर या व्यक्तीला मिळतो बचतीचा पैसा, पण त्यासाठी ही कागदपत्रे हवीत जवळ..

Saving Account : खातेदाराच्या मृत्यूनंतर बँकेतील रक्कम कोणाला मिळते? त्यासाठी काय करावी लागते कसरत..

Saving Account : खातेदाराच्या मृत्यूनंतर या व्यक्तीला मिळतो बचतीचा पैसा, पण त्यासाठी ही कागदपत्रे हवीत जवळ..
रक्कम मिळणार कोणाला?Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 22, 2022 | 5:05 PM

नवी दिल्ली : आता जवळपास प्रत्येकाचं बँकेत खाते (Bank Account) असतेच असते. खातेदारच्या (Account Holder) मृत्यूनंतर (Death) त्याच्या खात्यातील रक्कम (Saving Amount) कोणाला मिळते? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. घरातील कर्त्या व्यक्तीकडे ही रक्कम देण्यात येईल असा जर तुमचा समज असेल तर सपशेल खोटा आहे. कारण ही रक्कम मिळते..

बँकेत खाते उघडताना तुमच्याकडून वारसदाराची (Nominee) माहिती असलेला अर्ज भरून घेण्यात येतो. या अर्जामध्ये वारसदाराचे नाव, वय आणि त्याचा तपशील आणि संबंधित कागदपत्रे (KYC) जमा केलेली असतात.

बँक खातेदाराच्या मृत्यूनंतर ही रक्कम त्याच्या वारसाला देण्यात येते. त्यासाठी वारसाकडून खातेदाराशी संबंधित कागदपत्रांचा पडताळा घेण्यात येतो. त्याची खात्री झाल्यावर ही रक्कम वारसाच्या सुपूर्द करण्यात येते.

हे सुद्धा वाचा

बचत खाते उघडताना अर्जामध्ये वारसाचे नाव, त्याचे खातेदाराशी नाते, त्याचे वय, पत्ता आणि ओळखपत्र क्रमांक यांची माहिती समाविष्ट करण्यात येते. त्याआधारे खातेदाराचे वारस म्हणून त्या व्यक्तीचे नाव नोंदविण्यात येते.

बचत खातेदार कोणालाही त्याचा वारस नेमू शकतो. यामध्ये आई-वडिल, बहिण, भाऊ, पत्नी, मुलं यांचा समावेश आहे. तसेच त्याला वारसदार बदलविता ही येतो. वारसदार निवडीचा अधिकार खातेदाराचा असतो.

वारसाऐवजी दुसरा व्यक्ती बँकेकडे सदर रक्कमेची मागणी करु शकत नाही. त्रयस्थ व्यक्तीने मागणी जरी केली तरी बँक अशा व्यक्तीला ही रक्कम देत नाही. खातेदाराच्या मृत्यूनंतर सदर रक्कम एकतर बँकेतून काढता येते अथवा ती वारसदाराच्या खात्यात हस्तांतरीत करता येते.

खातेदाराच्या मृत्यूनंतर वारसदाराला त्याचे ओळखपत्र दाखवावे लागते. खातेदाराचे मृत्यू प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे दाखवावी लागतात. त्याआधारे बचत खात्यातील रक्कम वारसाच्या खात्यात वळती करण्यात येते.

जर खातेदाराने पती,पत्नी, आई-वडिल, भाऊ, बहिण यांना वारसदार नेमले नसेल. तर त्याच्या कुटुंबातील मोठ्या व्यक्तीला या रक्कमेवर हक्क सांगता येतो. पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला वारस म्हणून दावा सांगता येतो. पण ही प्रक्रिया वेळ खाऊ आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.