RBIच्या घोषणेनंतर ‘या’ बँकांनी आपला रेपो रेट वाढविला, गृहकर्जावर किती पडणार बोजा?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरांनी बुधवारी (4 मे) आपल्या पॉलिसी रेटमध्ये 40 बेसिस पॉइंट्सच्या वाढीची घोषणा केली. त्यासोबतच कॅश रिझर्व्ह रेशोतदेखील 50 बेसिस पॉइंट्सने वाढ केल्याने परिणामी इतर बँकांच्या व्याजदरावर याचा परिणाम दिसून येत आहे. या सर्व घडामोडीत देशातील दोन मोठ्या बँकांनी आपल्या रेपो रेटमध्ये (Repo Rate) वाढ केली असून याचा परिणाम गृहकर्जावर होत आहे.
आरबीआयने (RBI) नुकत्याच केलेल्या घोषणेच्या अनुषंगाने बँकांनी त्यांच्या रेपो रेटशी संबंधित गृहकर्जांमध्ये व्याजदर वाढ केली आहे. आयसीआयसीआय बँक आणि बँक ऑफ बडोदा यांच्याकडून त्यांचे एक्सटर्नल बेंचमार्कशी लिंक कर्ज व्याजदर वाढवले आहेत. रिझर्व्ह बँकेच्या घोषणेनंतर लगेचच आयसीआयसीआय (ICICI) बँकेने आपल्या वेबसाइटवर असे म्हटले आहे, की बँक एक्सटर्नल बेंचमार्क लिडिंग रेट” (I-EBLR) हा रेपो दरापेक्षा मार्क अपसह आरबीआयच्या पॉलिसी रेपो रेटशी संदर्भित असून 4 मे 2022 पासून एक्सटर्नल बेंचमार्क लिडिंग रेट 8.10 टक्के p.a.p.m प्रमाणे लागू होईल. दरम्यान, बँक ऑफ बडोदाच्या वेबसाइटनुसार 5 मे 2022 पासून किरकोळ कर्जासाठी संबंधित बडोदा रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (BRLLR) 6.90 टक्के आहे. सध्याचा आरबीआयचा रेपो रेट 4.40 टक्के + मार्क अप 2.50 टक्के, S.P.0. 25 टक्के आहे.
एक्सटर्नल बेंचमार्क कर्ज म्हणजे काय?
आरबीआयने 1 ऑक्टोबर 2019 पासून सर्व नवीन फ्लोटिंग रेट वैयक्तिक किंवा किरकोळ कर्जे एक्सटर्नल बेंचमार्कशी जोडण्याला अनिवार्य केले आहे. नमूद केलेल्या कोणत्याही एक्सटर्नल बेंचमार्कमधून बँका निवडण्यास स्वतंत्र देण्यात आले आहे. यासाठी पुढील बाबींची पुर्तता करणे आवश्यक राहणार आहे :
1) आरबीआयचा पॉलिसी रेपो रेट. 2) फायनान्शियल बेंचमार्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (FBIL) द्वारे प्रकाशित भारत सरकारचे 3 महिन्यांचे ट्रेझरी बिल उत्पन्न. 3) एफबीआयएलद्वारे प्रकाशित भारत सरकारचे 6 महिन्यांचे ट्रेझरी बिल उत्पन्न. 4) एफबीआयएलद्वारे प्रकाशित केलेले इतर कोणतेही बेंचमार्क बाजार व्याज दर.
कर्जदारांनी काय करावे?
इतरही आणखी बँका लवकरच आपले व्याजदर वाढीची घोषणा करतील, असा अंदाज आहे. रेपो दरात 40 बीपीएस वाढ झाल्यामुळे सध्याच्या आणि नवीन कर्जदारांच्या कर्ज घेण्याच्या खर्चात वाढ होईल. गृहकर्ज किंवा एक्सटर्नल बेंचमार्क दर विशेषत: रेपो रेटशी निगडीत इतर कोणत्याही कर्जाचा लाभ घेण्याची योजना आखणाऱ्यांवर त्याचा परिणाम होईल. रेपो रेट किंवा इतर कोणत्याही व्याजदर बेंचमार्कशी संबंधित विद्यमान कर्जदारांचे व्याजदर, अंतर्गत आणि बाह्य दोन्ही त्यांच्या कर्जाच्या पुढील रीसेट तारखेपर्यंत समान राहतील. त्यांच्या रीसेट तारखेवरील नवीन व्याज दराची गणना रीसेट तारखेला लागू होणारा बेंचमार्क दर आणि क्रेडिट स्प्रेडमध्ये विचार केल्यावर केली जाईल. हा नवीन व्याजदर नंतर त्यांच्या कर्जाच्या पुढील रिसेट तारखांपर्यंत लागू राहील.