Air India आता झाली टाटांची, 18 हजार कोटींमध्ये करार, शेअर परचेज करारावर स्वाक्षरी

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, शेअर खरेदी करार विक्रेता आणि खरेदीदार यांच्यात आहे. हा कायदेशीर करार आहे. या करारामध्ये किमतीसह खरेदी-विक्रीची संपूर्ण माहिती देण्यात आलीय. हा करार विक्री प्रतिबिंबित करतो आणि त्याच्या अटी परस्पर सहमत झाल्यात.

Air India आता झाली टाटांची, 18 हजार कोटींमध्ये करार, शेअर परचेज करारावर स्वाक्षरी
एअर इंडिया
Follow us
| Updated on: Oct 25, 2021 | 7:32 PM

नवी दिल्लीः एअर इंडिया आता टाटांची झालीय. 18 हजार कोटी रुपयांमध्ये एअर इंडियाचा करार करण्यात आलाय. तसेच शेअर परचेस करारावरही हस्ताक्षर झालेत. सरकारी विमान वाहतूक कंपनी एअर इंडियाच्या विक्रीसाठी सरकारने सोमवारी टाटा सन्ससोबत शेअर खरेदी करारावर स्वाक्षरी केली. टाटा सन्सला एअर इंडियामध्ये परत येण्यासाठी एकूण 68 वर्षे लागली. वर्ष 1953 मध्ये जेव्हा भारत सरकारने टाटा सन्सकडून एअर इंडियाची मालकी विकत घेतली. त्यामुळे एअर इंडियाला टाटा समूहात परत येण्यासाठी एकूण 68 वर्षे लागली. चला एअर इंडिया कराराबद्दल जाणून घेऊया …

शेअर खरेदी करार म्हणजे काय?

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, शेअर खरेदी करार विक्रेता आणि खरेदीदार यांच्यात आहे. हा कायदेशीर करार आहे. या करारामध्ये किमतीसह खरेदी-विक्रीची संपूर्ण माहिती देण्यात आलीय. हा करार विक्री प्रतिबिंबित करतो आणि त्याच्या अटी परस्पर सहमत झाल्यात. या महिन्याच्या सुरुवातीला सरकारने सॉल्ट-टू-सॉफ्टवेअर समूहाच्या होल्डिंग कंपनी टेल्स प्रायव्हेट लिमिटेडचा 2,700 कोटी रुपयांचे रोख पेमेंट करण्याचा आणि एअरलाईनच्या कर्जाचे 15,300 कोटी रुपये घेण्याचा प्रस्ताव स्वीकारला होता.

एअर इंडिया करारात काय समाविष्ट?

या करारात एअर इंडिया एक्स्प्रेस आणि ग्राउंड हँडलिंग आर्म एआयएसएटीएसच्या विक्रीचाही समावेश आहे. 2003-04 नंतर हे पहिले खासगीकरण आहे. एअर इंडिया देशांतर्गत विमानतळांवर 4,480 लँडिंग आणि पार्किंग स्लॉट आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 2,738 ठेवते. तसेच कंपनीकडे परदेशी विमानतळांवर पार्किंगसाठी सुमारे 900 स्लॉट आहेत. हे स्लॉट कंपनीच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील पोहोच आणि उड्डाणे याबद्दल सांगतात. तर एअर इंडियाची उपकंपनी एअर इंडिया एक्सप्रेस दर आठवड्याला 665 उड्डाणे चालवते.

एअर इंडियाची कथा

एअर इंडियाची स्थापना 1932 मध्ये टाटा एअर सर्व्हिसेस म्हणून झाली, ज्याचे नंतर टाटा एअरलाइन्स असे नामकरण करण्यात आले. भारतीय व्यावसायिक जेआरडी टाटा यांनी ही विमान सेवा सुरू केली होती. एप्रिल 1932 मध्ये टाटाने इम्पिरियल एअरवेजसाठी मेल वाहून नेण्याचा करार जिंकला. यानंतर टाटा सन्सने दोन सिंगल इंजिन विमानांसह आपला हवाई वाहतूक विभाग तयार केला. 15 ऑक्टोबर 1932 रोजी टाटांनी कराचीहून बॉम्बेला एअर मेल विमानाने उड्डाण केले. हे विमान मद्रासला गेले, ज्याचे पायलट रॉयल फोर्सचे माजी पायलट नेविल विंटसेंट यांनी केले, जे टाटाचे मित्रही होते. सुरुवातीला कंपनीने साप्ताहिक हवाई मेल सेवा चालवली, जी कराची आणि मद्रासदरम्यान आणि अहमदाबाद आणि मुंबई मार्गे चालली. पुढील वर्षात विमान कंपनीने 2,60,000 किलोमीटर उड्डाण केले. यामध्ये पहिल्या वर्षी 155 प्रवाशांनी प्रवास केला आणि 9.72 टन मेल आणि 60,000 रुपयांचा नफा मिळवला.

एअर इंडिया इंटरनॅशनलने ताफ्यात पहिले बोईंग 707-420 समाविष्ट केले

21 फेब्रुवारी 1960 रोजी एअर इंडिया इंटरनॅशनलने ताफ्यात आपले पहिले बोईंग 707-420 समाविष्ट केले. विमान कंपनीने 14 मे 1960 रोजी न्यूयॉर्कला सेवा सुरू केली. 8 जून 1962 रोजी एअरलाइनचे नाव अधिकृतपणे बदलून एअर इंडिया करण्यात आले. 11 जून 1962 रोजी एअर इंडिया ही जगातील पहिली सर्व जेट एअरलाइन बनली. 2000 मध्ये एअर इंडियाने चीनच्या शांघायला सेवा सुरू केली. 23 मे 2001 रोजी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने कंपनीचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक मायकेल मस्करेन्हास यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप निश्चित केला. एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्सचे 2007 मध्ये एअर इंडिया लिमिटेडमध्ये विलीनीकरण करण्यात आले.

संबंधित बातम्या

मोठी बातमी! सरकारने 12 औषधे केली स्वस्त, NPPA ने उचलले मोठे पाऊल

सेन्सेक्स 145 अंकांनी वाढला, निफ्टीही हिरव्या चिन्हात बंद, सलग 4 दिवसांच्या घसरणीनंतर वाढ

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.