हवाई वाहतूक कोरोनापूर्व स्थितीमध्ये; प्रवाशांच्या संख्येत 71 टक्क्यांची वाढ

हवाई वाहतूक कोरोनाच्या सावटातून बाहेर येताना दिसत आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्यात हवाई वाहतूक कोरोनापूर्व स्थितीमध्ये पोहोचल्याची माहिती हवाई वाहतूक अधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आली आहे.

हवाई वाहतूक कोरोनापूर्व स्थितीमध्ये; प्रवाशांच्या संख्येत 71 टक्क्यांची वाढ
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Nov 19, 2021 | 4:52 PM

नवी दिल्ली – गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोना संकट होते. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा सर्वच क्षेत्रावर नकारात्मक परिणाम झाला होता. लॉकडाऊन काळात देशांतर्गंत आणि देशाबाहेरील हवाई वाहतूक बंद असल्याने या क्षेत्राला मोठा फटका बसला होता, मात्र आता हवाई वाहतूक कोरोनाच्या सावटातून बाहेर येताना दिसत आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्यात हवाई वाहतूक कोरोनापूर्व स्थितीमध्ये पोहोचल्याची माहिती हवाई वाहतूक अधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आली आहे. पुढील काळात प्रवाशांची संख्या आणखी वाढेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. ‘विंग्ज इंडिया-2022′ ची माहिती देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात उपस्थित अधिकाऱ्यांच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे. 24 ते 27 मार्च 2022 दरम्यान हैदराबादमध्ये  ‘विंग्ज इंडिया’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. 

हवाई वाहतूक व्यवसायावर सकारात्मक परिणाम 

या कार्यक्रमाला नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची देखील उपस्थिती होती. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, लॉकडाऊनचा मोठा फटका हा विमान वाहतूकीला बसला आहे. मात्र आता वाढत्या लसीकरणामुळे आपण हळूहळू कोरोनाच्या संकटातून बाहेर पडत असून, त्याचा सकारात्मक परिणाम हा विमान वाहतुकीवर होताना दिसत आहे. कोरोनापूर्व काळात विमान वाहतुकीची जी स्थिती होती, त्या स्थितीच्या जवळपास आपण पोहोचलो आहोत. येणाऱ्या काळात प्रवाशी संख्या आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.

प्रवाशांच्या संख्येत 71 टक्क्यांची वाढ

ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गंत हवाई वाहतूकीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, प्रवाशांची संख्या तब्बल  70.46 टक्क्यांनी वाढून, 89.85 लाखांवर पोहोचली आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA)  सादर कलेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात  52.71 लाख नागरिकांनी देशांतर्गंत प्रवास केला होता.

‘इंडिगो’ला प्रवाशांची सर्वाधिक पसंती 

डीजीसीएकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार ‘इंडिगो’ या विमान वाहतूक कंपनीच्या विमानातून  गेल्या ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे, तब्बल 48.07 लाख लोकांनी इंडिगोच्या विमानातून प्रवास केला आहे. इंडिगो पाठोपाठ ‘एअर इंडिया’च्या विमानातू 10.61 लाख तर एअर एशिया इंडियाच्या विमानातून 5.72 लोकांनी प्रवास केला आहे.

खाण्या-पिण्याची सुविधा उपब्ध होणार

कोरोना काळात विमान प्रवासावर अनेक निर्बंध घालण्यात आले होते. कमी अंतराचा प्रवास असेल तर प्रवाशांना खाण्या-पिण्याच्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या जात नव्हत्या. मात्र आता हळूहळू निर्बंध हटवण्यात येत असून, कमी अंतराचा प्रवास असेल तरी देखील प्रवाशांना खाण्याचे पदार्थ उपलब्ध करून दिले जणार आहेत.

विमानात वृत्तपत्रेही वाचता येणार

दरम्यान कोरोनाकाळात विमानामध्ये वृत्तपत्र आणि मासिके वाचण्यास मज्जाव करण्यात आला होता. मात्र आता ही देखील बंदी उठवण्यात आली आहे. याबाबत हवाई वाहतूक मंत्रालयाकडून नुकताच आदेश देण्यात आला असून, या आदेशानुसार आता विमान कंपन्यांना आपल्या प्रवाशांना वृत्तपत्रे आणि मासिकांची सुविधा पुरवू शकणार आहेत.

संबंधित बातम्या 

भारतीयांची फसवणूक करणारे टेक सपोर्ट स्कॅम नक्की काय आहे? जाणून घ्या याबाबत सर्वकाही

आता ईपीएफमध्ये नॉमिनी बदलणे झाले सोपे, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

पोस्ट ऑफिसच्या ‘या’ 3 योजनांमध्ये करा गुंतवणूक, एफडीपेक्षा अधिक व्याज मिळेल

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....