मोठा झटका, ‘या’ कंपनीने काढले तब्बल 1400 कर्मचाऱ्यांना कामावरून, आर्थिक संकट आणि..

Spicejet Layoff : गेल्या काही दिवसांपासून अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहेत. हे फक्त भारतामध्येच नाही तर विदेशात देखील मोठ्या प्रमाणात घडत आहे. आता थेट भारतामधील एक मोठ्या कंपनीने देखील आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतलाय.

मोठा झटका, 'या' कंपनीने काढले तब्बल 1400 कर्मचाऱ्यांना कामावरून, आर्थिक संकट आणि..
Follow us
| Updated on: Feb 12, 2024 | 1:03 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून जगभरात नोकऱ्यांवर संकट येताना दिसत आहे. अनेक मोठ्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना काढून टाकले. महागाई आणि नोकऱ्यांच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर जगभरात सुरू असलेल्या टाळेबंदीच्या लाटेचा परिणाम आता थेट भारतामध्येही परिणाम होताना दिसत आहे. भारताची बजेट एअरलाइन स्पाइसजेटनेही आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. यामुळे मोठा झटका बसल्याचे बघायला मिळतंय. कंपनी आर्थिक संकटात असल्याने असा निर्णय घेतल्याचे सांगितले जातंय.

आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या स्पाइसजेट विमान कंपनीने आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतलाय. स्पाइसजेट कंपनीने खर्च कमी करण्यासाठीच असा निर्णय घेतल्याचे देखील सांगितले जातंय. मात्र, हजारो कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची वेळी आल्याचे दिसतंय.

रिपोर्टनुसार, एअरलाइन स्पाइसजेटने तब्बल 1400 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. म्हणजेच काय तर त्यांनी 15 टक्के इतके कर्मचारी हे कामावरून काढले आहेत. सध्या कंपनीमध्ये नऊ हजारांच्या आसपास कर्मचारी आहेत. एअरलाइन स्पाइसजेटने सध्या 30 च्या आसपास विमाने सुरू आहेत.

1400 कर्मचाऱ्यांना कामावरून काढणे म्हणजेच हा नक्कीच मोठा झटका म्हणावा लागणार आहे. 60 कोटी रुपयांवर कर्मचाऱ्यांच्या पगारीचा खर्च गेल्याने कंपनीला हा निर्णय घ्यावा लागल्याचे देखील सांगितले जातंय. रिपोर्टनुसार टाळेबंदीबाबत कंपनीकडूबन कर्मचाऱ्यांना फोनवरून माहिती ही दिली जातंय.

यापूर्वी एअरलाइन स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना उशीरा पगार मिळत होती. आता तर थेट 1400 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आलंय. हेच नाही तर जानेवारी महिन्याचा पगार देखील कर्मचाऱ्यांना अजून मिळाला नसल्याचे सांगितले जातंय. आता कंपनी पुढील काही दिवसांमध्ये मोठे काही निर्णय घेऊ शकते असेही सांगितले जातंय.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.