Airtel Down : एअरटेलची ब्रॉडबँड सेवा तासभरासाठी डाऊन, कामाचा खोळंबा, चालू वर्षात दुसऱ्यांना इंटरनेट बंद

देशभरात पुन्हा एकदा शुक्रवारी एअरटेलची ब्रॉडबँड सेवा ठप्प झाली. ब्रॉडबँड सेवा प्रभावित झाल्याने ग्राहकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला. इंटरनेट अचानक बंद झाल्याने, कामाचा खोळंबा झाला.

Airtel Down : एअरटेलची ब्रॉडबँड सेवा तासभरासाठी डाऊन, कामाचा खोळंबा, चालू वर्षात दुसऱ्यांना इंटरनेट बंद
Airtel
Follow us
| Updated on: May 07, 2022 | 7:55 AM

देशभरात पुन्हा एकदा शुक्रवारी एअरटेलची ब्रॉडबँड सेवा (Airtel Broadband Service) सुमारे तासभर ठप्प झाल्याचे पहायला मिळाले. एअरटेलची इंटरनेट सेवा ठप्प झाल्याने मोबाईल (Mobile) आणि संगणकावर इंटनेट वापरण्यास समस्या निर्माण झाली. याबाबत आयएएनएसच्या वतीने ट्विट करत माहिती देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी एअरटेलची ब्रॉडबँड सेवा दिल्ली-एनसीआर, मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद, जयपूर आणि इतर प्रमुख शहरांमध्ये प्रभावित झाली. अनेक एअरटेल वापरकर्त्यांकडून (Airtel Users) तर सोशल मीडियावर तक्रार देखील करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात देखील एअरटेल वापरकर्त्यांना अशाच समस्येला सामोरे जावे लागले होते. एअरटेलचे नेटवर्क डाऊन झाल्यामुळे त्याचा परिणाम फायबर इंटरनेट सुविधेसह मोबाईल इंटरनेटवर देखील झाला. इंटरनेट सेवा अचानक ठप्प झाल्याने एअरटेल युझर्संना मोठ्या समस्येचा सामना करावा लागला. अनेकांची कामे ठप्प झाली होती.

चालू वर्षातील दुसरी वेळ

दरम्यान या सर्व प्राकरानंतर कंपनीच्या वतीने आपल्या ग्राहकांची माफी देखील मागण्यात आली आहे. काही तांत्रिक कारणांमुळे ही समस्या निर्माण झाली होती. मात्र आता सर्व समस्या दूर करण्यात आल्या आहेत. युजर्स पुन्हा एकदा पूर्वी प्रमाणे इंटरनेट सेवेचा लाभ घेऊ शकता. इंटरनेट सेवा ठप्प झाल्यामुळे आमच्या ग्राहकांना जो त्रास झाला त्याबद्दल आम्ही कंपनीच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो असे कंपनीने म्हटले आहे. एअरटेलची ब्रॉडबँड सेवा शुक्रवारी तब्बल एक तास बंद झाल्याने ग्राहकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला. यापूर्वी देखील चालू वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात असाच प्रकार घडला होता. इंटरनेट सेवा अचानक बंद झाल्याने जवळपास सर्वच कामे ठप्प झाल्याचे पहायला मिळाले.

एअरटेलने संकटातून भरारी घेतली

याच महिन्यात एका कार्यक्रमात बोलताना भारती एअरटेलचे चेअरमन सुनील मित्तल यांनी म्हटले होते की, कंपनीवर अनेक संकटे आली, मात्र या सर्व संकटांवर कंपनीने यशस्वी मात केली आहे. सध्या कंपनी मजबूत स्थितीमध्ये आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये दूरसंचार क्षेत्राने अनेक बदल पाहिले. या काळात कंपनीचे उत्पन्न कमी झाले. मात्र या सर्व समस्यांवर यशस्वी मात करत कंपनी मार्गक्रमण करत आहे. ग्राहकांना अधिकाधिक चांगली सेवा कशी देण्यात येईल यावर आमचा भर असल्याचे देखील मित्तल यांनी म्हटले होते.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.