Sanjay Dutt : संजय दत्त पण ॲक्टिव्ह! या कंपनीत केली मोठी गुंतवणूक

Sanjay Dutt : बॉलिवूडच नाही तर दक्षिणेतील सेलिब्रिटी सिनेमातून घर चालवितात तर उद्योग व्यवसायातून कमाई करतात. अनेकांनी मोठं-मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. आता संजय दत्त ने पण हाच धडा गिरवला आहे.

Sanjay Dutt : संजय दत्त पण ॲक्टिव्ह! या कंपनीत केली मोठी गुंतवणूक
Follow us
| Updated on: Jun 22, 2023 | 3:00 PM

नवी दिल्ली : प्रत्येक जण काही तरी बचत करुन कुठे न कुठे गुंतवणूक करतात. त्यातून भविष्यात मोठा नफा कमाविता येतो. नोकरदार आणि व्यावसायिकच नाही तर बॉलिवूड आणि टॉलिवूडमधील सेलिब्रिटी पण मोठं-मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक (Investment) करतात. अनेक जण घर चालविण्यासाठी सिनेमात काम करतो, तर कंपन्यांमधील गुंतवणुकीतून कमाई करतो, असे मिश्किलपणे सांगतात. पण ही गोष्ट खरी आहे. नवीन स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करुन हा व्यवसाय दोनच वर्षांत मोठी भरारी घेतो आणि या त्याचा मोठा फायदा या सेलिब्रिटींना होतो. आता संजय दत्त (Sanjay Dutt) पण हाच कित्ता गिरवणार आहे. या कंपनीत संजूबाबाने मोठी गुंतवणूक केली आहे.

संजय दत्त एका अहवालानुसार, अभिनेता संजय दत्तने (Sanjay Dutt) मुंबईतील स्टार्टअप कार्टेल अँड ब्रदर्स (Cartel And Bros) मध्ये गुंतवणूक केली आहे. ही कंपनी त्यांचा दारुचा ब्रँड भारतात विक्री करण्याच्या तयारीत आहे. यापूर्वी संजय दत्त याने Cyber Media India Ltd मध्ये गुंतवणूक केली आणि 1 टक्के हिस्सा खरेदी केला.

अक्षय कुमार बॉलीवूडमध्ये लोकप्रिय अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याने एका स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली. या फर्मचे नाव टू ब्रदर्स ऑर्गेनिक फार्म्स (TBOF) आहेत. ऑर्गेनिक फार्मिंग संबंधित हे स्टार्टअप आहे. बिझनेस टुडे नुसार, नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यामुळे बळ मिळते. या स्टार्टअपचे सेंद्रिय उत्पादने युरोपात विक्री होतात. पुणे येथील या स्टार्टअपची सुरुवात सत्यजीत हांगे आणि अजिंक्य हांगे यांनी केली आहे. ही कंपनी जगातील 53 देशांमध्ये हे सेंद्रिय उत्पादने निर्यात होतात. भारतातील 1000 हून अधिक शहरांमध्ये या कंपनीची उत्पादने उपलब्ध आहेत.

हे सुद्धा वाचा

सुनील शेट्टी-आयुष्यमान खुराणा चित्रपट अभिनेता सुनील शेट्टीने फिटनेस स्टार्टअप एक्वाटीनमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. ते या स्टार्टअपचे ब्रँड अँम्बेसिडर आहेत. त्यांनी नवीन फुड डिलिव्हरी स्टार्टअप वायू (Waayu) मध्ये गुंतवणूक केली आहे. तर आयुष्यमान खुरानाने द मॅन कंपनीत गुंतवणूक सुरु केली आहे. त्याने 2019 मध्ये या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली.

रणवीर सिंह-दीपिका पादुकोण बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार, बॉलिवूड स्टार रणवीर सिंह याने प्रमुख ओमनीचॅनल ब्युटी कंपनी Sugar कॉस्मेटिकमध्ये गुंतवणूक केली आहे. ही कंपनी कॉस्मेटिक ब्रँडमध्ये दर्जेदार उत्पादन करत आहे. या कंपनीची सुरुवात 2012 मध्ये सुरु केली होती. तर अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने जवळपास सहा कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. ध्ये फर्लेंको, पर्पल, ब्लूस्मार्ट, एपिगेमिया, बेलाट्रिक्स, एअरोस्पेस आणि फ्रंटरो या कंपन्यांमध्ये तिने गुंतवणूक केली आहे.

Non Stop LIVE Update
'त्या' प्रश्नावर पांड्यानं जे उत्तर दिलं अन् मोदींनाही हसू आवरलं नाही
'त्या' प्रश्नावर पांड्यानं जे उत्तर दिलं अन् मोदींनाही हसू आवरलं नाही.
बर झाल त्याच्या हातात कॅच बसला नाहीतर..सूर्याच्या कॅचवरून रोहितचा टोला
बर झाल त्याच्या हातात कॅच बसला नाहीतर..सूर्याच्या कॅचवरून रोहितचा टोला.
विधानभवनात वर्ल्डकप विजेत्या चॅम्पियन्सच मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत
विधानभवनात वर्ल्डकप विजेत्या चॅम्पियन्सच मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत.
VIDEO: डोळ्यांच पारण फेडणारा कोयनेतील ओझर्डे धबधबा तुम्ही पाहिलाय का?
VIDEO: डोळ्यांच पारण फेडणारा कोयनेतील ओझर्डे धबधबा तुम्ही पाहिलाय का?.
लाडकी बहीणला आणखी अटी लावा, 'यांना' लाभ देऊ नका, कुणाची आक्रमक मागणी?
लाडकी बहीणला आणखी अटी लावा, 'यांना' लाभ देऊ नका, कुणाची आक्रमक मागणी?.
सरकारी पैशातून मत खरेदी..., 'लाडकी बहीण'वरून वडेट्टीवारांची सडकून टीका
सरकारी पैशातून मत खरेदी..., 'लाडकी बहीण'वरून वडेट्टीवारांची सडकून टीका.
'लाडकी बहीण'चा बोजवारा..सर्व्हर बंद, महिलांची लांबलचक रांग अन् मनस्ताप
'लाडकी बहीण'चा बोजवारा..सर्व्हर बंद, महिलांची लांबलचक रांग अन् मनस्ताप.
बसवर टीका करणारे रोहितच्या मागे फोटोसाठी पोट धरून..भाजप नेत्याचा टोला
बसवर टीका करणारे रोहितच्या मागे फोटोसाठी पोट धरून..भाजप नेत्याचा टोला.
संदेह गमला, रेडा कैसा बोलविला..तुकोबांच्या पालखीत चालणारा रेडा पाहिला?
संदेह गमला, रेडा कैसा बोलविला..तुकोबांच्या पालखीत चालणारा रेडा पाहिला?.
वर्ल्डकप जिंकून मायदेशी रोहित शर्माला पाहून वर्ल्ड चॅम्पियनची आई भावूक
वर्ल्डकप जिंकून मायदेशी रोहित शर्माला पाहून वर्ल्ड चॅम्पियनची आई भावूक.