PNB ग्राहकांना अलर्ट, 18 कोटी ग्राहकांचा वैयक्तिक आणि आर्थिक डेटा 7 महिन्यांपर्यंत धोक्यात

या दोषाबद्दल CyberX9 चे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक हिमांशू पाठक म्हणाले की, जोपर्यंत आम्ही याबद्दल तक्रार करत नाही, तोपर्यंत बँक शांतपणे झोपत होती. सुमारे सात महिन्यांसाठी 18 कोटी ग्राहकांच्या वैयक्तिक आणि आर्थिक डेटाशी तडजोड करण्यात आली. ते म्हणाले की, आमच्या टीमने पंजाब नॅशनल बँकेच्या सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी समोर आणली.

PNB ग्राहकांना अलर्ट, 18 कोटी ग्राहकांचा वैयक्तिक आणि आर्थिक डेटा 7 महिन्यांपर्यंत धोक्यात
Punjab National Bank
Follow us
| Updated on: Nov 21, 2021 | 4:22 PM

नवी दिल्लीः सायबर सिक्युरिटी फर्म CyberX9 च्या म्हणण्यानुसार पंजाब नॅशनल बँकेच्या सर्व्हरमध्ये मोठा बिघाड झालाय. त्यामुळे 18 कोटी ग्राहकांचा वैयक्तिक आणि आर्थिक डेटा जवळपास सात महिने उघडकीस आलाय. या तांत्रिक दोषामुळे संपूर्ण डिजिटल बँकिंग प्रणाली आणि पंजाब नॅशनल बँकेचे प्रशासकीय नियंत्रण खुले ठेवण्यात आलेय. हा अहवाल समोर आल्यानंतर पीएनबीने तांत्रिक त्रुटी मान्य केल्यात, परंतु कोणतीही संवेदनशील माहिती लीक झाल्याच्या बातम्यांचे खंडन केलेय. बँकेचे म्हणणे आहे की, यावेळी ग्राहकांचा डेटा पूर्णपणे सुरक्षित होता. खबरदारीचा उपाय म्हणून बँकेचा सर्व्हर बंद करण्यात आलाय.

अंतर्गत सर्व्हरवर तडजोड केल्यानं प्रवेश

या दोषाबद्दल CyberX9 चे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक हिमांशू पाठक म्हणाले की, जोपर्यंत आम्ही याबद्दल तक्रार करत नाही, तोपर्यंत बँक शांतपणे झोपत होती. सुमारे सात महिन्यांसाठी 18 कोटी ग्राहकांच्या वैयक्तिक आणि आर्थिक डेटाशी तडजोड करण्यात आली. ते म्हणाले की, आमच्या टीमने पंजाब नॅशनल बँकेच्या सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी समोर आणली. या त्रुटीमुळे प्रशासकीय नियंत्रण धोक्यात आलेय, ज्यामुळे अंतर्गत सर्व्हरमध्ये प्रवेश मिळाला. अंतर्गत सर्व्हरच्या प्रवेशामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर ग्राहकांच्या डेटाशी तडजोड झालीय.

हॅकर्सना बँकेच्या कोणत्याही संगणकावर प्रवेश होता

बँकेच्या एक्सचेंज सर्व्हरमध्ये त्रुटी आढळून आल्याचे पाठक यांनी सांगितले. या सर्व्हरमधील त्रुटीमुळे सर्व ग्राहकांना ईमेल अॅक्सेस देण्यात आला. एक्सचेंज सर्व्हरच्या प्रवेशामुळे हॅकर्स बँकेतील कोणत्याही संगणकावर सहज प्रवेश मिळवू शकतात. बँकेच्या कोणत्याही शाखेचा संगणक हॅक करणे हॅकर्ससाठी अगदी सोपे होते. मात्र, ज्या सर्व्हरमध्ये हा दोष आढळला त्या सर्व्हरवर कोणतीही संवेदनशील माहिती नव्हती, असे बँकेचे म्हणणे आहे.

बिघाड 19 नोव्हेंबरला उघडकीस आला

PNB ने सायबर X9 चे दावे ठामपणे नाकारलेत. तांत्रिक दोष खरा आहे, पण एकाही ग्राहकाचा वैयक्तिक किंवा आर्थिक डेटा लीक झालेला नाही. सध्या हा सर्व्हर बंद करण्यात आला आहे. सायबर X9 ने एनसीआयआयपीसीला या त्रुटीबद्दल माहिती दिली होती. हा खुलासा 19 नोव्हेंबरला करण्यात आलाय.

संबंधित बातम्या

नोकरी शोधणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी| EPF नॉमिनेशन ऑनलाईन बदलता येणार, पण कसे?

ऑनलाईन गांजा विक्री प्रकरण; अ‍ॅमझॉन इंडियाच्या कार्यकारी संचालकांविरोधात गुन्हा दाखल

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.