LIC ची भन्नाट योजना, 200 रुपयांची गुंतवणूक करा आणि 17 लाख रुपये मिळवा

जर तुम्हालाही एखाद्या चांगल्या योजनेत पैसे गुंतवायचे असतील तर तुमच्यासाठी LIC ची जीवन लाभ पॉलिसी अतिशय फायदेशीर ठरु शकते. (LIC Jeevan Labh Policy)

LIC ची भन्नाट योजना, 200 रुपयांची गुंतवणूक करा आणि 17 लाख रुपये मिळवा
lic-invest
Follow us
| Updated on: Jun 07, 2021 | 3:34 PM

मुंबई : बहुतेक लोक गुंतवणूक केलेली रक्कम सुरक्षित राहावी, तसेच योग्य परतावा मिळावा, यासाठी विविध योजनांची माहिती घेत असतात. जर तुम्हालाही एखाद्या चांगल्या योजनेत पैसे गुंतवायचे असतील तर तुमच्यासाठी LIC ची जीवन लाभ पॉलिसी अतिशय फायदेशीर ठरु शकते. यात विमा पॉलिसीसह बचतही होते. या योजनेअंतर्गत तुम्ही दररोज फक्त 200 रुपयांची गुंतवणूक करुन ठराविक कालावधीनंतर तुम्हाला 17 लाख रुपये मिळू शकतात. (All You Need To Know about LIC Jeevan Labh Policy)

विशेष म्हणजे जर एखाद्या पॉलिसीधारकाचा अचानक मृत्यू झाला तर जमा झालेली संपूर्ण रक्कम नॉमिनी (nominee) असलेल्या व्यक्तीला दिली जाते. यात योजनेत तुम्हाला तीन पर्याय दिले जातात. म्हणजेच तुम्ही ही पॉलिसी 16 वर्षे, 21 वर्षे किंवा 25 वर्षांच्या मुदतीसाठी घेऊ शकता. तसेच कमीत कमी 8 वर्षाच्या मुलासाठी एलआयसी जीवन लाभ पॉलिसी घेता येते.

योजनेचे फायदे

1. जीवन लाभ पॉलिसीअंतर्गत जर तुम्ही सलग 3 वर्षे प्रीमियम भरल्यास तुम्हाला कर्जाची सुविधा मिळू शकते

2. कोणत्याही कारणास्तव जर तुम्हाला पॉलिसी बंद करायची असल्यास तुम्ही तीन वर्षानंतर ती बंद करु शकता.

3. या पॉलिसीद्वारे तुम्हाला आयकरात कलम 80 सी अंतर्गत सूटही दिली जाते.

4. एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये तुम्हाला accident cover ही दिला जातो. त्याशिवाय यात तुम्हा अन्य काही फायदेही मिळतात.

किती प्रीमियम भरावा लागणार

जर तुम्ही 16 वर्षांसाठी ही पॉलिसी घेत असाल तर तुम्हाला 10 वर्षासाठी प्रीमियम भरावा लागेल. त्याच वेळी जर तुम्ही 21 वर्षांसाठी ही पॉलिसी घेत असाल तर 15 वर्षे आणि 25 वर्षांच्या पॉलिसीसाठी 16​ वर्षे प्रीमियम भरावा लागतो. म्हणजेच समजा जर एखाद्या 30 वर्षीय व्यक्तीने 10 लाखांच्या निश्चित रक्कमेद्वारे ही पॉलिसी 16 वर्षांसाठी घेतली. तर त्याला दहा वर्षे प्रीमियम भरावा लागतो. यानुसार त्याला दररोज त्याला 200 रुपये गुंतवावे लागतात.

कसे मिळतील 17 लाख

ज्या व्यक्तीने 10 वर्षात 8.22 लाख रुपयांचा प्रीमियम भरला असेल त्याला 16 वर्षांनंतर हमी रक्कम म्हणून 10 लाख रुपयांव्यतिरिक्त 6,88,00 रुपये बोनस दिला जातो. तसेच अंतिम अतिरिक्त बोनस म्हणून 25000 रुपये दिले जातात. त्यानुसार तुमची एकूण रक्कम 17,13,000 रुपये होते. म्हणजेच 10 वर्षात तुम्हाला 8,22,900 रुपयांऐवजी तुम्हाला मॅच्युरिटीनंतर 17,13,000 रुपये मिळतील. (All You Need To Know about LIC Jeevan Labh Policy)

(All You Need To Know about LIC Jeevan Labh Policy)

संबंधित बातम्या : 

5 रुपयांची नोट विकून 30 हजार कमावण्याची सुवर्णसंधी; पटापट जाणून घ्या…

क्रेडिट कार्डातील पैसे वापरण्याची लिमिट कशी वाढवाल? जाणून घ्या सर्व काही

Business Idea | केवळ 15 हजारात बिझनेस सुरु करा, वर्षभरात लाखो कमवा, सरकारकडून 90 टक्के कर्ज

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.