Amazon BFCM Sale: Amazon चा BFCM सेल 25 नोव्हेंबरपासून सुरू, 70 हजार निर्यातदारांचा सहभाग

ब्लॅक फ्रायडे आणि सायबर मंडे सेल या महिन्यात 25 नोव्हेंबरपासून सुरू होईल आणि 29 नोव्हेंबरपर्यंत चालेल. Amazon ने एका निवेदनात म्हटले आहे की, भारतीय निर्यातदार आगामी सुट्टीच्या हंगामासाठी Amazon च्या जागतिक वेबसाइट्सवर 52,000 हून अधिक नवीन उत्पादने सादर करतील.

Amazon BFCM Sale: Amazon चा BFCM सेल 25 नोव्हेंबरपासून सुरू, 70 हजार निर्यातदारांचा सहभाग
Follow us
| Updated on: Nov 21, 2021 | 8:40 PM

नवी दिल्ली : ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी अॅमेझॉन इंडिया ब्लॅक फ्रायडे आणि सायबर मंडे सेल दरम्यान जागतिक ग्राहकांना 70 दशलक्ष ‘मेड इन इंडिया’ उत्पादने ऑफर करणार आहेत, अशी माहिती कंपनीनं दिलीय. त्यासाठी हजाराहून अधिक भारतीय निर्यातदारांनी तयारी केलीय.

ब्लॅक फ्रायडे आणि सायबर मंडे सेल 29 नोव्हेंबरपर्यंत चालणार

ब्लॅक फ्रायडे आणि सायबर मंडे सेल या महिन्यात 25 नोव्हेंबरपासून सुरू होईल आणि 29 नोव्हेंबरपर्यंत चालेल. Amazon ने एका निवेदनात म्हटले आहे की, भारतीय निर्यातदार आगामी सुट्टीच्या हंगामासाठी Amazon च्या जागतिक वेबसाइट्सवर 52,000 हून अधिक नवीन उत्पादने सादर करतील. महाकाय ई-कॉमर्स कंपनीने सांगितले की, जगभरातील Amazon ग्राहकांना घर आणि स्वयंपाकघर, खेळणी, कपडे, आरोग्य सेवा, कार्यालयाशी संबंधित उत्पादने तसेच भारतीय निर्यातदारांनी बनवलेले दागिने आणि फर्निचर यांसारखी उत्पादने खरेदी करता येतील.

सणासुदीच्या हंगामानंतर BFCM सुरू होते

Amazon India चे अभिजित कामरा म्हणाले, “BFCM सेलची सुरुवात जागतिक सुट्टीच्या मोसमापासून होणार आहे. ही विक्री भारतात सणासुदीच्या हंगामानंतर होत आहे, जो परंपरेने आमच्या विक्रेत्या भागीदारांसाठी वाढीचा प्रमुख काळ आहे.” ते म्हणाले की, आम्हाला विश्वास आहे की 2021 BFCM विक्री आमच्या विक्रेत्यांना निर्यात व्यवसायाला गती देण्यासाठी मदत करेल.

OnePlus 9 वर 7000 रुपयांचा डिस्काऊंट

OnePlus 9 हा कंपनीचा प्रीमियम स्मार्टफोन आहे. OnePlus 9 वर सध्या चांगली डिस्काउंट ऑफर दिली जात आहे. या फोनवर 7,000 रुपयांची सूट दिली जात आहे. ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वरून तुम्ही डिस्काउंटसह हा फोन खरेदी करू शकता. Amazon वर सवलतीसह OnePlus 9 खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे SBI क्रेडिट कार्ड असणे आवश्यक आहे. SBI क्रेडिट कार्डने हा फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी 7,000 रुपयांची सूट दिली जात आहे. OnePlus 9 स्मार्टफोन डिस्काउंटसह 39,999 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. Amazon वर OnePlus 9 ची किंमत 46,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ही किंमत त्याच्या बेस व्हेरिएंटसाठी आहे. पण जर तुमच्याकडे SBI क्रेडिट कार्ड असेल तर तुम्ही या ऑफरचा फायदा घेऊ शकता. म्हणजेच तुम्हाला या फोनवर 7,000 रुपयांचा डिस्काऊंट मिळेल. हा फोन 49,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आला होता. हे स्मार्टफोन अँड्रॉयड 11 वर आधारित ऑक्सीजन ओएस 11 वर काम चालता. वनप्लस 9 मध्ये 6.55 इंचाचा फुल एचडी प्लस (1,080×2,400 पिक्सल) एमोलेड डिस्प्ले दिला आहे. याचा आस्पेक्ट रेश्यो 20.9 आहे. रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज दिला आहे.
संबंधित बातम्या
Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.