Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amazon new feature Shoes | रिप्लेसमेंटची कटकटच संपली! आता अॅमेझॉनच्या नवीन फीचरमध्ये शूज घेण्याअगोदर डायरेक्ट घालूनच पाहा

अॅमेझॉनने व्हर्च्युअल ट्राय ऑन फॉर शूज हे नवीन फीचर लाँच केले आहे. शूज खरेदी करण्याआधीच ग्राहकांना व्हर्च्युअल पध्दतीने ते घालून बघता येणार आहेत. त्यामुळे शूजची खरेदी करताना साईजसह इतर सर्व शंका दूर होणार असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

Amazon new feature Shoes | रिप्लेसमेंटची कटकटच संपली! आता अॅमेझॉनच्या नवीन फीचरमध्ये शूज घेण्याअगोदर डायरेक्ट घालूनच पाहा
अॅमेझॉनच्या नवीन फीचरमध्ये शूज घेण्याअगोदर डायरेक्ट घालूनच पाहाImage Credit source: Amazon
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 3:24 PM

सध्याच्या वेळेला सर्वात मोठी ई-कॉमर्स साइट असलेल्या अॅमेझॉनने (Amazon) एक नवीन फीचर (Feature) विकसित केले आहे. या नवीन फीचरच्या मदतीने तुम्ही पसंत केलेले शूज खरेदी करण्यापूर्वी घालून पाहू शकणार आहात. अॅमेझॉनने एक नवीन इंटरॅक्टिव मोबाईल एक्सपिरियंसचा पर्याय ग्राहकांपुढे उपलब्ध केला आहे. यासह, ग्राहकांना iOS Amazon अॅपवर शूज घालून, त्यांना तपासून खरेदी करायचे की नाही हे ठरविता येणार आहे. दरम्यान, ही सेवा सध्या यूएस आणि कॅनडामधील ग्राहकांसाठी लागू करण्यात आली आहे. अॅमेझॉन फॅशनने शूजसाठी व्हर्च्युअल ट्राय-ऑन (Virtual Try On For Shoes) लाँच केले आहे. या नवीन फीचरचा फायदा घेउन ग्राहकांना त्यांच्या पायात शूज कसे दिसतील, याची कल्पना करणे अधिक सोपे होणार आहे.

कोणत्या ब्रँडचा समावेश?

ग्राहक हे प्रोडक्ट घेण्याआधी त्याला सर्व भागातून तपासू शकणार आहेत. याबाबत कंपनीने म्हटले आहे, की ग्राहक iOS साठी उपलब्ध Amazon Shopping अॅपद्वारे शूजसाठी व्हर्च्युअल ट्राय ऑन वापरू शकतात. या नवीन फीचरच्या माध्यमातून ग्राहकांना न्यू बॅलन्स, अॅडिडास, रिबॉक, पुमा, सुपरगा, लॅकोस्टे, एसिक्स आणि सॉकनी सारख्या ब्रँडचे शूज व्हर्च्युअल पध्दतीने वापरता येणार आहेत.

असे काम करते फीचर

अॅमेझॉन शॉपिंग अॅपवर शूज निवडल्यानंतर ग्राहकाला व्हर्च्युअल ट्राय-ऑन बटणावर टॅप करावे लागेल. यासाठी त्यांना प्रोडक्ट डिटेल्सवर जावे लागेल. यानंतर फोनचा कॅमेरा तुमच्या पायाकडे न्यावा लागेल. याद्वारे ग्राहकांच्या पायात शूज कसे दिसतील याची कल्पना करणे यातून सोपे होणार आहे. ग्राहक त्यांचे पाय हलवून सर्व बाजूने शूज पाहू शकतात. याशिवाय ग्राहक सेम स्टाइल शूजचा रंगही बदलू शकणार आहेत. या फीचरमुळे ग्राहकांना आपल्याला हवे असलेले प्रोडक्ट योग्य पध्दतीने निवडता येईल. कंपनीने म्हटले आहे, की ग्राहकांना या नवीन फीचर्सचा फोटो घेण्याचा आणि सोशल मीडियावर मित्रांसोबत शेअर करण्याचा पर्याय देखील उपलब्ध असणार आहे. यासाठी त्यांना शेअर आयकॉनवर क्लिक करावे लागेल. लवकरच हे फीचर भारतातही येणार असल्याचे म्हटले जात आहे.

हे सुद्धा वाचा

प्रोडक्ट परत करण्याचे प्रमाण होईल कमी

अनेकदा आपण ई-कॉमर्स साइटवरुन प्रोडक्ट मागवितो. ते घरी आल्यावर त्याला आपण ट्राय करतो, त्या वेळी शूजची साईज किंवा स्क्रीनवर दाखविलेल्या रंगात आणि प्रत्यक्ष घरी आलेल्या रंगात दिसणार फरक आदी विविध कारणांमुळे आपण ते प्रोडक्ट परत रिप्लेस करतो किंवा आपली ऑर्डरच रद्द करीत असतो. त्या पार्श्वभूमीवर हे फीचर चांगले मानले जात आहे. ग्राहकांना प्रोडक्ट घेण्याआधीच ते व्हर्च्युअल पध्दतीने तपासता येत असल्याने प्रोडक्ट रिप्लेसमेंटची झंझट संपणार आहे.

बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.