Amazon वर ऑर्डर केलेला फोन मिळालाच नाही, मुंबईच्या पठ्ठ्याच्या तक्रारीची थेट CEO बेजोस यांच्याकडून दखल

आपली ऑर्डर डिलिव्हर न झाल्यानं एका मुंबईकरानं थेट Amazon चे प्रमुख (CEO) जेफ बेजोस यांनाच तक्रारीचा ई-मेल केला.

Amazon वर ऑर्डर केलेला फोन मिळालाच नाही, मुंबईच्या पठ्ठ्याच्या तक्रारीची थेट CEO बेजोस यांच्याकडून दखल
Amazon CEO Jeff Bezos
Follow us
| Updated on: Oct 17, 2020 | 7:14 PM

मुंबई : आपल्या आजीसाठी मुंबईच्या एका व्यक्तीने Amazon वरुन एक फोन ऑर्डर केला. मात्र, त्याला त्याच्या ऑर्डरचं पॅकेट मिळालंच नाही. नंतर लक्षात आलं की हे पॅकेट त्याच्या सोसायटीच्या गेटवरुन चोरीला गेलं आहे. त्यामुळे तो चांगलाच संतापला आणि त्याने रागाच्या भरात थेट Amazon चे प्रमुख (CEO) जेफ बेजोस यांनाच तक्रारीचा ई-मेल केला (Amazon order of Mumbaikar not deliver he complaint direct to Jeff Bezos).

विशेष जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या जेफ बेजोस यांनी या तक्रारीच्या ई-मेलची दखल घेत तात्काळ हा प्रश्न सोडवला. जेफ बेजोस यांनी संबंधित मेल केवळ वाचलाच नाही, तर तो तात्काळ अ‍ॅमेझॉनच्या टीमकडे पाठवून त्यावर कारवाई करण्यास सांगितले. यानंतर अ‍ॅमेझॉनच्या कर्मचाऱ्यांनी तक्रारदार मुंबईकरांना स्वतः संपर्क करुन त्यांनी मागवलेला फोन त्यांना सुपुर्त केला.

नेमकं काय घडलं?

मुंबईचे ओंकार हनमंते यांनी आपल्या आजीसाठी अ‍ॅमेझॉनवरुन एक फोन ऑर्डर केला होता. त्यांनी नोकियाच्या बेसिक फोनची ऑर्डर केली होती. मात्र, अनेक दिवस होऊनही त्यांना आपला फोन मिळालाच नाही. विशेष म्हणजे अ‍ॅमेझॉनच्या वेबसाईटवर मात्र हा फोन ग्राहकांना मिळाल्याचं दाखवत होतं. त्यामुळे ओंकार हनमंते यांनी थेट जेफ बेजोस यांनाच तक्रारीचा ई-मेल लिहिला.

ई-मेलमध्ये नेमकं काय लिहिलं?

‘हाय जेफ,

आशा आहे की तुम्ही अगदी खुशाल असाल.

मी तुमच्या ग्राहक सेवा आणि डिलिवरी व्यवस्थेवर खूपच नाराज आहे. मी अ‍ॅमेझॉनवरुन जो फोन ऑर्डर केला होता तो मला डिलिव्हरच करण्यात आला नाही. डिलिव्हरी बॉयने तो माझ्या सोसायटीच्या गेटवरच ठेवला. तो तेथून चोरीला गेला. माझ्या ऑर्डरबाबत मला डिलिव्हरी बॉयकडून कोणताही फोनही करण्यात आला नव्हता.

विशेष म्हणजे तुमची कस्टमर सर्व्हिस टीम नेहमी पाठंतर केलेलं उत्तर देते की तपास सुरु आहे. ते ऐकताना आपण एखाद्या रोबोटशी बोलतो आहोत की काय असं वाटतं.

गेटवरुन संबंधित फोनचं पॅकेट चोरीला गेल्याचं सीसीटीव्हीवरुन उघड

या प्रकरणी तपास केला असता सोसायटीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संबंधित डिलिव्हरी बॉयने ओंकार हनमंते यांना संबंधित वस्तू देण्याऐवजी गेटवरच ठेऊन दिली. यानंतर तेथे एक व्यक्ती आला आणि त्याने ते पॅकेट चोरल्याचं स्पष्टपणे दिसलं.

हे खरं आहे की जगातील इतका श्रीमंत व्यक्ती आपले सर्व मेल स्वतः निश्चितच वाचत नसणार, मात्र अ‍ॅमेझॉनचे संस्थापक आणि सीईओ जेफ बेजोस काही मोजक्या महत्त्वाच्या मेलची दखल घेऊन स्वतः त्यांना उत्तरं देतात किंवा तो प्रश्न मार्गी लावतात.

जेफ बेजोस यांनी आपल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं, की ते आजही आपल्या ग्राहकांचे मेल स्वतः वाचतात. जर त्या मेलला थेट उत्तर देणं शक्य नसेल तर संबंधित विभागाकडे पाठवतात.

संबंधित बातम्या :

अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टच्या ऑफिसवर मनसेची कूच; ‘मराठी’साठी खळ्ळखट्याकचा दिला इशारा

मस्तच! कोल्हापुरी चप्पल आता अॅमेझॉनवर!

Amazon आणि Flipkart विरोधात व्यापारी संघटना आक्रमक, उत्सव विक्री महोत्सवावर बंदीची मागणी

Amazon order of Mumbaikar not deliver he complaint direct to Jeff Bezos

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.