America Shutdown | 1 ऑक्टोबरपासून अमेरिकेत शटडाऊन! भारतीय बाजारावर काय होईल परिणाम

America Shutdown | अमेरिकेवरील जून महिन्यातील संकट आता ऑक्टोबर महिन्यात धडकू शकते. 1 ऑक्टोबरपासून अमेरिकेतील प्रशासन शटडाऊन करण्याची शक्यता वाढली आहे. यापूर्वी जून महिन्यात हे संकट घोंगावत होते. त्याचा भारतीयच नाही तर जागतिक अर्थव्यवस्थेवर पण मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

America Shutdown | 1 ऑक्टोबरपासून अमेरिकेत शटडाऊन! भारतीय बाजारावर काय होईल परिणाम
Follow us
| Updated on: Sep 30, 2023 | 3:33 PM

नवी दिल्ली | 30 सप्टेंबर 2023 : अमेरिकेतील जो बायडन सरकार (US Joe Biden Government) 1 ऑक्टोबरपासून देशात शटडाऊन (US Shutdown) लागू करु शकते. त्यामुळे अत्यावश्यक सेवा ठप्प होतील. अमेरिकेत एकप्रकारे हा आर्थिक मेगा ब्लॉक असेल. या काळात सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार नाही. त्यांचे वेतन थांबविण्यात येईल. प्रशासनिक खर्च लांबविण्यात येईल. जोपर्यंत अमेरिकेन संसद अत्यावश्यक खर्चाशी संबंधीत बिल मंजूर करत नाही, तोपर्यंत शटडाऊन सुरु असेल. संसदेने खर्चासाठी निधीची तरतूद केल्यास अथवा अतिरिक्त कर्ज घेण्यास मंजुरी दिली तर अमेरिकेतील कामकाज सुरळीत होईल. तोपर्यंत अमेरिकन जनतेला सरकारकडून मिळणाऱ्या सर्व सवलती, सबसिडी बंद असतील.

अमेरिकेवर का कोसळले संकट

अमेरिकेत 2 लाख कोटी डॉलरची तूट आली आहे. ही खूप मोठी महसूली तूट आहे. म्हणजे सरकारची कमाई आणि खर्चात जवळपास 2 लाख कोटी डॉलरची तफावत आहे. गेल्या वर्षीपेक्षा ही तफावत जवळपास दुप्पट आहे. तर कोरोना पूर्व काळात पण इतकी महसूली तूट आली नव्हती. कोरोनापूर्व काळात जो महसूल होता, तोच गेल्या तीन वर्षानंतर ही कायम आहे. म्हणजे सरकारची कमाईच होत नाही. उलट सरकारचा खर्च वाढला आहे. राष्ट्रीय कर्जावर अतिरिक्त व्याज द्यावे लागत आहे. एकप्रकारे सरकार घाट्यात सुरु आहे. त्यामुळे हे संकट ओढावले आहे.

हे सुद्धा वाचा

काय होईल परिणाम

जगाच्या अर्थव्यवस्था या घडामोडींचा मोठा परिणाम दिसणार नाही. कारण ही त्या देशाची अंतर्गत व्यवस्थेतील भाग आहे. या अर्थव्यवस्थेला त्याची सवय आहे. या कार्यकाळात कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविण्यात येते. योजनांवरील सवलत बंद असते. पण एकदा मंजुरी मिळाल्यानंतर थकीत वेतन अदा होते. तर योजनांवरील सवलत, सबसिडी पूर्ववत होते

शटडाऊनची नाही पहिली वेळ

  1. अर्थात अमेरिकेत शटडाऊनची ही काही पहिली वेळ नाही.
  2. अमेरिकेत पहिल्यांदा हे संकट 21 नोव्हेंबर 1981 मध्ये आले होते.
  3. त्यानंतर 1982 साली दोनदा शटडाऊन झाले होते.
  4. 1990 पर्यंत एक ते तीन दिवस अमेरिका थांबली होती.
  5. 1995 मध्ये पहिल्यांदा 5 दिवस हा मेगा ब्लॉक होता.
  6. 1995 मध्येच 16 डिसेंबर रोजी 21 दिवस शटडाऊन होते.
  7. 1 ऑक्टोबर 2013 मध्ये 16 दिवस प्रशासन ठप्प होते.
  8. 20 जानेवारी 2018 मध्ये दोन दिवसांसाठी कामकाज ठप्प होते.
  9. 22 डिसेंबर 2018 रोजी सर्वाधिक 35 दिवस अमेरिका शटडाऊन होती.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.