अमेरिकेच्या जेबीएल कंपनीची महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक; पुण्यात उभारणार प्रकल्प

Investment in Maharashtra | पुणे जिल्ह्यातील रांजणगाव किंवा तळेगावमध्ये ‘जेबीएल’ आपल्या प्रकल्पाचा विस्तार करणार असून मोबाइलचे सुटे भाग आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे उत्पादन तेथे होईल. या प्रकल्पामुळे 13 हजार जणांना रोजगार मिळण्याचा अंदाज आहे.

अमेरिकेच्या जेबीएल कंपनीची महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक; पुण्यात उभारणार प्रकल्प
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Jun 19, 2021 | 7:50 AM

मुंबई: कोरोना संकटामुळे अर्थव्यवस्था रुळावरुन घसरली असताना राज्याच्यादृष्टीने एक दिलासादायक वृत्त समोर आले आहे. अमेरिकेच्या जेबीएल कंपनीने राज्यात मोठी गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे. प्राथमिक माहितीनुसार, जेबीएल कंपनी राज्यात तब्बल दोन हजार कोटींची गुंतवणूक करुन प्रकल्प उभारणार आहे. पुण्यातील रांजणगाव किंवा तळेगावमध्ये हा प्रकल्प उभा राहण्याची शक्यता आहे. जेबीएल ही कंपनी इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्मिती क्षेत्रात नावाजलेली आहे. महाराष्ट्रात स्मार्टफोन, मोबाइलचे सुटे भाग, गृहपयोगी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, अन्न व खाद्यपदार्थाची वेष्टने आदी क्षेत्रांत कंपनी आपल्या प्रकल्पाचा विस्तार करणार आहे. (American JBL company will invest in Maharashtra )

राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नुकतीच कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी जेबीएल कंपनीचे भारतातील प्रमुख डॅन वँग, डेसमाँड चेंग, सुधीर बालकृष्णन, व्हिक्टर मोनोरॉय, सुधीर साहू, पॅक्ट्रीक कॉनली यांच्यासह उद्योग विभागाचे सचिव बलदेव सिंग, एमआयडीसी सीईओ डॉ. पी. अन्बलगन आदी लोक उपस्थित होते.

प्रकल्पामुळे मोठ्याप्रमाणावर रोजगारनिर्मिती

पुणे जिल्ह्यातील रांजणगाव किंवा तळेगावमध्ये ‘जेबीएल’ आपल्या प्रकल्पाचा विस्तार करणार असून मोबाइलचे सुटे भाग आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे उत्पादन तेथे होईल. या प्रकल्पामुळे 13 हजार जणांना रोजगार मिळण्याचा अंदाज आहे.

जेबीएलला त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी जमीन देण्याची महाराष्ट्राची तयारी आहे. प्रकल्प लवकर सुरू करण्यासाठी तातडीने 1.50 लाख चौरस फूट सुसज्ज जागा देण्याची, त्यांना हवे असलेले प्रतिदिन 30 लाख लिटर पाणी, उच्चदाब वीजपुरवठा अशा सर्व सुविधा देण्याची एमआयडीसीची तयारी आहे. जमिनीबाबतही राज्याच्या औद्योगिक धोरणानुसार विविध पर्याय त्यांना देण्यात आले असून आवडीचा पर्याय ते निवडू शकतात. सुरुवातीला 2 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असली, तरी पुढील तीन-चार वर्षांत 3 हजार कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक होईल, अशी माहिती एमआयडीसीचे सीईओ डॉ. पी. अन्बलगन यांनी दिली.

इतर बातम्या:

रामदेव बाबांच्या ‘या’ कंपनीवर 3,375 कोटी रुपयांचं कर्ज, बालकृष्ण आणि भाऊ जामिनदार, गुंतवणुकदारांवर काय परिणाम?

PHOTOS : Google चं जगातील पहिलं रिटेल स्टोअर सुरू, पाहा हायटेक सुविधांनी युक्त दुकानाचे फोटो

तुमचाही व्यवसाय गुगल सर्चमध्ये आणायचाय? मग त्यासाठी गुगलच्या ‘या’ ट्रिक्स वापरा

(American JBL company will invest in Maharashtra )

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.