Amul Milk Price Hike : आता दूधही फुंकून प्या… अमूलचे दूध इतक्या रुपयांनी महागले; नवे दर कधीपासून?
दूध दरवाढ झाल्यानंतर काँग्रेसने भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. अच्छे दिनचा हवाला देऊन ही टीका केली आहे. काँग्रेसने याबाबतचं ट्विट केलं आहे. वर्षभरात अमूलचं दूध 8 रुपये प्रति लिटरने महागलं आहे.
नवी दिल्ली: अर्थसंकल्प सादर केल्यानंतर लगेचच देशातील जनतेला महागाईचा झटका बसला आहे. अमूलच्या दुधाच्या दरात वाढ झाली आहे. अमूलच्या दुधाचे दर 3 रुपये प्रति लिटरने वाढले आहेत. अमूलने त्याबाबतची माहिती दिली आहे. दूधाचे दर 3 रुपये प्रति लिटरने वाढवण्यात आले आहेत. आजपासूनच हे दुधाचे नवे दर लागू करण्यात येणार असल्याचं अमूलने स्पष्ट केलं आहे.
अमूल कंपनीने दिलेल्या माहितीनुसार अमूलचे ताजे अर्धा लिटर दूध 27 रुपयांनी मिळणार आहे. तर एक लिटरचं पिशीवी 54 रुपयाला मिळणार आहे. अमूल गोल्ड म्हणजे फूल क्रीम दूधाची अर्धा लिटरची पिशवी 33 रुपयांना मिळणार आहे. तर एक लिटरची पिशवी 66 रुपयांना मिळणार आहे.
गायीचे दूधही महागले
अमूलच्या गायीच्या दुधाची किंमतही वाढवण्यात आली आहे. अमूलच्या गायीच्या एक लीटर दुधाची किंमत 56 रुपये करण्यात आली आहे. तर अर्धा लीटर दुधाची किंमत 28 रुपये मोजावे लागणार आहेत. तर म्हशीच्या A2 दूध आता 70 रुपये प्रति लिटर मिळणार आहे. तसेच अमूल दहीसह इतर उत्पादनाचे भावही वाढले आहेत.
अमूल दूध 3 रुपए तक महंगा हो गया।
पिछले 1 साल में ‘8 रुपए’ दाम बढ़े हैं।
• फरवरी 2022: अमूल गोल्ड 58 रुपए लीटर • फरवरी 2023: अमूल गोल्ड 66 रुपए लीटर
अच्छे दिन❓️
— Congress (@INCIndia) February 3, 2023
काँग्रेसचा निशाणा
दरम्यान, दूध दरवाढ झाल्यानंतर काँग्रेसने भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. अच्छे दिनचा हवाला देऊन ही टीका केली आहे. काँग्रेसने याबाबतचं ट्विट केलं आहे. वर्षभरात अमूलचं दूध 8 रुपये प्रति लिटरने महागलं आहे.
वर्षाची पहिली दरवाढ
यावर्षीची अमूलची ही पहिलीच दूध दरवाढ आहे. अमूलने गेल्यावर्षी तीनवेळा दूध दरवाढ केली होती. मार्च, ऑगस्ट आणि ऑक्टोबरमध्ये दूध दरवाढ करण्यात आली होती. हाय कॉस्टिंगमुळे ही दरवाढ करण्यात आली होती.