बिअर शॉपबाहेरील पोस्टरमुळे आनंद मंहिद्रा गोंधळले, ट्विट करून म्हणाले…!
या पोस्टरवर थंडगार बिअर आणि त्याची किंमत हिंदी आणि इंग्रजीमध्ये लिहलेली आहे. पण त्यावर आनंद महिंद्रा यांना असं काही सूचलं की त्यांनी थेट याचं ट्विट केलं.
नवी दिल्ली : ज्येष्ठ व्यापारी आणि महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra and Mahindra) ग्रुपचे प्रमुख आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. महिंद्राचं एखादं लाँचिंग असो किंवा एखादा अनोखा फोटो आनंद महिंद्रा नेहमीच त्यावर हटके ट्वीट करत असतात. यावेळीसुद्धा त्यांनी असंच एक अनोखं ट्वीट केलं आहे. खरंतर, आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विट (Tweet) अकाउंट बिअर शॉपचा एक फोटो शेअर केला आहे. या पोस्टरवर थंडगार बिअर आणि त्याची किंमत हिंदी आणि इंग्रजीमध्ये लिहलेली आहे. पण त्यावर आनंद महिंद्रा यांना असं काही सूचलं की त्यांनी थेट याचं ट्विट केलं. (anand mahindra get confused after seeing the poster of beer shop)
खरंतर, आनंद महिंद्रा यांनी बिअर शॉपचं एक पोस्टर ट्विट केलं आहे. सगळेच जण हे फोटो पाहून गोंधळले आहेत. या पोस्टरमध्ये इंग्रजी आणि हिंदीमध्ये बिअरची किंमत आणि नाव लिहलं आहे. Chilled Beer Rs. 140 असं इंग्रजीमध्ये लिहलं आहे तर हिंदीमध्ये थंडी बिअर 150 रुपये असं लिहलं आहे. आनंद्र महिंद्रा यांनी लोकल फॉर वोकलला जोडत शेअर केलं आहे.
Confused. Has this establishment signed up for ‘vocal for local?’ Or have they not? ? pic.twitter.com/OKb1Vd4QS6
— anand mahindra (@anandmahindra) November 27, 2020
पंजाबी गाण्यांवरही केलं होतं ट्विट
याआधीही काही दिवसांपूर्वी आनंद महिंद्रा यांनी एका पंजाबी गाण्यावर छान ट्विट केलं होतं. या व्हिडिओमध्ये एक मुलगी पंजाबी गाणं म्हणत होती. आनंद महिंद्रा यांना हे गाणं इतकं आवडलं की त्यांनी ते त्यांच्या ट्वीटवर शेअर केलं होतं.
इतर बातम्या –
आनंद महिंद्रांकडून राजकीय परिस्थितीवरील गमतीदार व्हिडीओ ट्वीट
VIDEO: घोड्यावरुन परीक्षेला जाणाऱ्या ‘या’ मुलीचा व्हिडीओ व्हायरल, आनंद महिंद्रांकडूनही शेअर
(anand mahindra get confused after seeing the poster of beer shop)