CEO म्हणाली, 100 तास काम केले, पण प्रॉडक्टिव्ह नव्हते, बाथरुममध्ये रडत होती, महिंद्रा म्हणाले, क्वांटिटी नव्हे क्वालिटी हवी
90-hour workweek row: महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी जास्त तास काम करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. दिल्लीत आयोजित भारत यंग लीडर्स डायलॉग 2025 ला संबोधित करताना ते म्हणाले, कामात गुणवत्ता महत्त्वाची आहे. त्याची संख्या नाही. त्यामुळे ही 48 तास, 70 तास किंवा 90 तासांची बाब नाही.
90-hour workweek row: इन्फोसिसचे चेअरमन नारायण मूर्ती यांनी 70 तास कामाचा सल्ला दिला होता. त्यानंतर इंजिनिअरींग सेक्टरमधील दिग्गज कंपनी लार्सन अँड टूब्रो (L&T) चे चेअरमन एस.एन. सुब्रह्मण्यन यांनी 90 तास कामाचा मुद्दा आणला. त्यानंतर सुब्रह्मण्यन जबरदस्त ट्रोल होत आहे. बॉलीवूडपासून उद्योग जगापर्यंत त्यांच्या मुद्याला विरोध केला जात आहे. आता एडलव्हाइस म्यूचुअल फंडच्या एमडी आणि सीईओ राधिका गुप्ता यांनी 100 तास काम करण्याचे आपले अनुभव शेअर केले आहेत.
राधिका गुप्ता यांनी काय म्हटले?
राधिका गुप्ता यांनी एक्सवर लिहिले आहे की, पहिल्या नोकरीत पहिल्या प्रोजेक्टवर काम करताना सलग चार महिने 100 तास काम केले. एक दिवस सुट्टी घेतल्यानंतर रोज 18 तास काम केले. त्यावेळी रविवार ऐवजी सोमवारी सुट्टी घेत होती. कारण रविवारी क्लाइंट साइटवर राहत होते. त्यावेळी माझा 90% वेळ दु:खात जात होता. एका वेळेस रात्री दोन वाजता रुम सर्व्हिसकडून चॉकलेट केक खाल्ला. दोन वेळा रुग्णालयात भरती झाली. ऑफिसच्या बाथरुममध्ये जाऊन मी रडत होती. 100 तास काम केले पण प्रोडक्टिव नव्हते. ही गोष्टी माझीच नाही तर माझ्या बॅचमेटसोबतही असेच घडले आहे.
आनंद महिंद्रा यांनी केला विरोध
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी जास्त तास काम करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. दिल्लीत आयोजित भारत यंग लीडर्स डायलॉग 2025 ला संबोधित करताना ते म्हणाले, कामात गुणवत्ता महत्त्वाची आहे. त्याची संख्या नाही. त्यामुळे ही 48 तास, 70 तास किंवा 90 तासांची बाब नाही. तासांपेक्षा कामाच्या आउटपुट जास्त महत्वाचे आहे. तुम्ही 10 तास काम केले तरी तुम्ही काय आउटपुट देत आहात? तुम्ही 10 तासात जग बदलू शकता का? आनंद महिंद्र पुढे म्हणाले की, कामाचे तास वाढवण्याची चर्चा चुकीची आहे. मला इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि इतरांबद्दल खूप आदर आहे. त्यामुळे गैरसमज करून घेऊ नका. माझ्या मते कामाचे तास वाढवणे हा चुकीचा वाद आहे.
परिवारासोबत वेळ महत्वाचा
आनंद महिंद्रा यांनी आपल्या ऑटो मॅन्युफॅक्चरिंग व्यवसायाचे उदाहरण देताना सांगितले की, कुटुंबासाठी कार बनवण्यासाठी कुटुंबाच्या गरजा समजून घेतल्या पाहिजेत. आमचा व्यवसायचे उदाहरण पाहू या, कार बनवताना कारमध्ये ग्राहकाला काय हवे आहे त्याचा विचार आम्ही करतो. आम्ही कार्यालताच राहिल्यावर परिवारास काय हवे, हे आम्ही कसे समजणार? एखादा परिवार कोणत्या पद्धतीची कार पसंत करेल, हे समजण्यासाठी आम्हालाही परिवारासोबत राहावे लागणार आहे.