Anant Ambani : भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी सध्या चर्चेत आहे. लवकरच तो राधिका मर्चंटसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. दोघाचं प्री-वेडिंग फंक्शन गुजरातच्या जामनगरमध्ये आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्याला अनेक मोठे नेते, सेलिब्रिटी, उद्योगपती यांनी हजेरी लावली. या सोहळ्या दरम्यान बोलताना अनंत अंबानी याने आपल्या आजारपणाचा उल्लेख केला आहे. ज्यामुळे त्याचे वजन वाढले आहे.
अनंत अंबानींचे वजन का वाढते? अनंत अंबानींचे वजन आता किती आहे? अनंत अंबानी वजन का कमी करत नाहीत? अनंत अंबानी काय करतात? असे अनेक प्रश्न लोकांना पडले आहेत.
मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लहानपणापासून अस्थमा या गंभीर आजाराने त्रस्त आहे. दम्याचा उपचार करण्यासाठी त्याला स्टिरॉइड्सचा भारी डोस द्यावा लागतो. त्यामुळे त्यांचे वजन वाढते. कितीही प्रयत्न करूनही त्यांचे वजन कमी होत नाही. कारण तो दम्याचा गंभीर रुग्ण आहे.
पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अनंत अंबानी यांनी अवघ्या 18 महिन्यांत 108 किलो वजन कमी केले होते. 2016 मध्ये अनंत अंबानी यांचे वजन 208 किलो होते. त्यानंतर कठोर परिश्रमाने त्यांनी 108 किलो वजन कमी केले होते. मात्र काही वेळाने अनंतचे वजन पुन्हा वाढू लागले. आणि ते पुन्हा लठ्ठपणाचे बळी ठरले.
दम्यावर कुठलाही कायमस्वरूपी उपचार नाही. त्याचे परिणाम कमी करण्यासाठी स्टिरॉइड्स द्यावे लागतात. सहसा इनहेलर किंवा टॅब्लेट दिले जाते. वेदनाशामक औषधे लक्षणे कमी करण्यासाठी त्वरीत कार्य करतात. रोगाच्या तीव्रतेनुसार औषधाचा डोस समायोजित करून दम्याची लक्षणे नियंत्रित केली जाऊ शकतात.
श्वास घेण्यास त्रास होणे.
श्वास सोडताना घरघर होणे.
छातीत दाब जाणवणे.
अनंत अंबानी यांनी ब्राउन युनिव्हर्सिटीमधून पदवीपर्यंत शिक्षण केले आहे. ते रिलायन्स इंडस्ट्रीजचे काम सांभाळतात. त्यांनी गुजरातमधील जामनगरमध्ये प्री-वेडिंग फंक्शनचे आयोजन केले होते. जेथे त्यांनी तयार केलेल्या वनतारामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत. यावेळी प्राण्यांसाठी करत असलेल्या सेवेचे अनेकांनी कौतूक केले आहे.