Anant Ambani Pre-Wedding : उन्हाळ्यातही अनंत आणि राधिका यांनी Portofino शहर का निवडलं ? काय आहे खासियत ?
अनंत अंबानी आणि राधिका यांचा प्री- वेडिंग सोहळ्याचा दुसरा सिझन सुरु झाला आहे. यावेळी पाहूण्यामध्ये तारकांची मांदियाळी आहे. यावेळीची पार्टी खास क्रुझ आणि समुद्र किनाऱ्यांवर होणार आहे. काय आहे या ठिकाणाचे वैशिष्ट्ये पाहूयात ...
Anant Ambani Pre-Wedding : एकीकडे लोकशाहीचा जननी मानल्या जाणाऱ्या भारताची निवडणूक अंतिम टप्प्यात आहे. दुसरीकडे लोकशाहीतील भारतातील अब्जाधीश कुटुंबातील लग्न सोहळ्याची तयारी देखील धुमधडाक्यात सुरु आहे. भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांचे धाकटे पूत्र अंनत अंबानी यांच्या विवाह पूर्व सोहळ्याने जगाचे लक्ष वेधले आहे. आता या प्री-वेडिंग पार्टीचा दुसरा सिझन सुरु होत आहे. यासाठी आलिशान क्रुझ आणि निळ्याशार समुद्र किनाऱ्यांवर जंगी पार्टी रंगणार आहे. या क्रुझवरील सोहळ्यासाठी देखील बॉलिवूड, हॉलीवूडसह जगभरातील नामांकित व्यक्ती आपली पायधूळ झाडणार आहेत. हा सोहळा 29 मेपासून सुरु झाला आहे आणि तो 1 जून 2024 पर्यंत रंगणार आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वसर्वा मुकेश अंबानी यांचे सुपूत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट एका आलिशान लक्झरी क्रूझवर आपल्या मित्र आणि कुटुंबियांसोबत त्यांची दुसरी प्री-वेडिंग पार्टी साजरी करणार आहेत. यावेळी समुद्र किनारी आणि क्रूझवर सेलिब्रेशन रंगणार आहे. 29 मे ते 1 जून 2024 पर्यंत चालणाऱ्या या चार दिवसांच्या सोहळ्याने जगभराचे लक्ष वेधून घेतले आहे. या सोहळ्याला देखील बॉलीवूडचा सलमान खान, आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि एम.एस. धोनी यांच्यासारखे सेलिब्रिटी इटलीला पोहोचले देखील आहेत. या सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत दिलेल्या माहीतीनूसार ते शनिवारी पोर्टोफिनोच्या इटालियन रिव्हिएरा शहरातील भूमध्य समुद्राला ही मंडळी भेट देणार आहेत. याची प्री-वेडिंग थीम आहे La Vite e un Viaggio म्हणजेच Life Is A Journey अशी आहे. तर इटलीच्या पोर्टोफिनो शहराची खासियत काय आहे हे जाणून घेऊयात. अंबानी कुटुंबाने प्री-वेडिंग फंक्शनसाठी हे शहर का निवडले याची खासियत काय पाहूयात…
पोर्टोफिनो शहर कोठे आहे?
पोर्टोफिनो हे इटालियन रिव्हिएरा शहरातील सर्वात लोकप्रिय रिसॉर्ट शहरांपैकी एक आहे. उन्हाळ्यात देखील इथलं वातावरण बऱ्यापैकी आल्हाददायक असतं. येथील लहान रस्त्यावर बुटीक, आर्ट गॅलरी, कॅफे आणि रेस्टॉरंट्स आहेत. इथले डायव्हिंग, हायकिंग आणि बीच खूपच प्रसिद्ध आहेत. याशिवाय, चर्च ऑफ सेंट मार्टिन ( दिवो मार्टिनो ) आणि कॅस्टेलो ब्राऊन टेकडीच्या शिखरावर वसलेला किल्ल्यासारखी, येथीस काही ऐतिहासिक ठिकाणे देखील प्रसिद्ध आहेत. पोर्टोफिनो शहरात अंदाजे 400 कायमस्वरूपी रहिवासी राहतात.
आवर्जून पाहण्याची ठिकाणे
चिएसा सॅन जॉर्जियो हे दुपारचा लंच करण्यासाठी उत्कृष्ठ ठिकाण आहे. स्वादिष्ट पदार्थांची रेलचेल येथे असते. त्यामुळे तुमची तृष्णा भागविण्याचे हे एक उत्तम ठिकाण आहे. सॅन जॉर्जियोच्या चर्चच्या पलीकडे कॅस्टेलो ब्राऊनचा राजवाडा आणि मैदान आहे. हा राजवाडा 1400 सालात बांधलेला आहे. आता येथे विविध सण तसेच कार्यक्रम आयोजित केले जातात. याशिवाय, तुम्ही पोर्टोफिनोच्या दीपगृहातून अप्रतिम दृश्याचा आनंद घेऊ शकता. तुम्ही पोर्टोफिनो शहरात फिरण्यासाठी गोव्या प्रमाणे मोटर बाईक भाड्याने घेऊ आरामात साईट सिईंग करु शकता.
कुठे खरेदी कराल ?
पोर्टोफिनो मधील खरेदी करण्यासाठी तुमचा खिसा मजबूज असायला हवा, येथील विविध श्रेणीतील बुटीक प्रसिद्ध आहेत. छोट्या रस्त्यांवरून फिरताना तुम्ही मनसोक्त खरेदी करु शकता आणि तुम्हाला लोरो पियाना, लुई व्हिटॉन, डायर, मिसोनी आणि यांसारखे मोठे ब्रँड येथे दिसतील. पोर्टोफिनो हे बऱ्यापैकी महागड्या शहरांपैकी एक आहे. येथील रेस्टॉरंट्सही देखील बरीच महाग आहेत. बंदराजवळील रेस्टॉरंट्स उत्तम आहेत.
पोर्टोफिनोला कुठल्या महिन्यात जावे
पोर्टोफिनोला सहलीसाठी सर्वोत्तम वेळ एप्रिल आणि मे आहे. पोर्टोफिनोला भेट देण्यासाठी पुढील सर्वोत्तम वेळ सप्टेंबर आणि ऑक्टोबर आहे. तुम्ही कडक उन्हाळ्याचे महिने प्रवास टाळता. परंतु हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार कर्मचारी एप्रिल आणि मेमध्ये येथे सर्वात उत्साही असतात. त्यामुळे येथे उन्हाळ्यातही लोक फिरायला येतात.