अनिल अंबानी यांना अच्छे दिन, तीन बँकांचे कर्ज फिटले, शेअर तुफान तेजीत
रिलायन्स पॉवर लिमिटेड ही अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाची कंपनी आहे. रिलायन्स समूह आर्थिक सेवा, पायाभूत सुविधा आणि ऊर्जा यासह अनेक क्षेत्रात कार्यरत आहे. रिलायन्स पावर भारतातील वीज प्रकल्पांच्या विकासासाठी, बांधकामासाठी आणि ऑपरेशनसाठी काम करते.
रिलायन्स समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांची नेहमीच चर्चा होत असते. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे लहान भाऊ अनिल अंबानी यांची देखील चर्चा होत आहे. अनिल अंबानी यांच्या कंपन्यांची परिस्थिती खालावत गेली होती. त्यांच्या कंपन्यांवर कर्जाचा डोंगर वाढला होता. परंतु आता सर्व चित्र बदलत आहेत. अनिल अंबानी यांनी तीन बँकांचे कर्ज फेडले आहे. या बँकांचे 400 कोटी रुपये दिले गेले आहेत. त्यांच्या रिलायन्स पॉवर या कंपनीचे आयसीआयसीआय बँक, एक्सिस बँक आणि डीबीएस बँक फेडले आहे. यामुळे बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
99% टक्के घसरला आता चार वर्षांत 2000 % वाढला
रिलायन्स पावरचा शेअर ऑल टाइम हाई लेव्हलवरुन 99 टक्के हा शेअर घसरला होतो. 16 मे 2008 मध्ये रिलायन्स पावरची किंमत 260.78 रुपये होती. मार्च 2020 मध्ये हा शेअर एक रुपयांवर आला होता. परंतु आता अनिल अंबानी यांच्या रिलायंस पावरची वाटचाल कर्जमुक्त होण्याकडे सुरु आहे. यामुळे रिलायन्स पावरचा शेअर मागील चार वर्षांपासून चांगलाच वाढत आहे. गेल्या 4 वर्षांत 2000 टक्के हा शेअर वाढला आहे. रिलायन्स पावरचा शेअर 27 मार्च 2020 रोजी 1.13 रुपये होता. तो जानेवारी 2024 मध्ये 30 रुपयांवर गेला होता.
काय करते रिलायन्स पावर
रिलायन्स पॉवर लिमिटेड ही अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाची कंपनी आहे. रिलायन्स समूह आर्थिक सेवा, पायाभूत सुविधा आणि ऊर्जा यासह अनेक क्षेत्रात कार्यरत आहे. रिलायन्स पावर भारतातील वीज प्रकल्पांच्या विकासासाठी, बांधकामासाठी आणि ऑपरेशनसाठी काम करते. त्यात काही उपकंपन्याही आहेत. कंपनीकडे सुमारे 6000 मेगावॅटची कार्यरत वीज निर्मिती मालमत्ता आहे.
हिंदुजा समूहाकडून हालचाली
अनिल अंबानी यांची रिलायन्स कॅपिटल कंपनीचे अधिग्रहण हिंदुजा समूहकडून करण्यात आले आहे. आता हा समूह त्यासाठी निधी जमवण्याचा तयारीत लागला आहे. हिंदुजा समूहातील कंपनी इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्स लिमिटेड (IIHL) ने रिलायन्स कॅपिटलचे अधिग्रहण केले आहे. त्यासाठी 27 मे पूर्वी ₹8000 कोटी रुपयांची व्यवस्था करावी लागणार आहे. हा निधी मिळवण्यासाठी हिंदुजा समूहाने जापानी बँकांशी संपर्क केला आहे.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.