अनिल अंबानींसाठी पुन्हा एक गुड न्यूज, रिलायन्स पॉवर बनली 16,000 कोटींची कंपनी

reliance power share price: 2020 च्या दिवाळखोरीच्या घोषणेनंतर आता अनिल अंबानी यांचे उद्योग जगात जोरदार पुनरागमन होताना दिसत आहेत. अनिल अंबानी यांच्या मुलांनी त्यांचा कौटुंबिक व्यवसायाचे पुनरुज्जीवन करण्यात यश मिळवले आहे. अनिल अंबानी यांची मुले मुकेश अंबानी यांच्या मुलांवर पाऊल टाकत यश मिळवत आहेत.

अनिल अंबानींसाठी पुन्हा एक गुड न्यूज, रिलायन्स पॉवर बनली 16,000 कोटींची कंपनी
Anil Ambani
Follow us
| Updated on: Sep 25, 2024 | 4:17 PM

anil ambani net worth: रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे बंधू अनिल अंबानी गेल्या अनेक वर्षांपासून अडचणीत होते. परंतु गेल्या आठवड्याभरापासून त्यांच्यासमोरील अडचणी दूर होऊ लागल्या आहेत. त्यांच्या कंपन्यांना चांगले दिवस येत आहेत. त्यांच्या कंपन्यांच्या शेअरला गेल्या तीन, चार दिवसांपासून अपर सर्कीट लागत आहे. आता त्यांची रिलायन्स पॉवर कंपनी 16,000 कोटींची कंपनी झाली आहे. वर्षभरात कंपनीचे शेअरने मोठी भरारी घेतली आहे. 158% शेअर वाढले आहेत. वर्षभरापूर्वी कंपनीचा शेअर 15.53 रुपयांवर होता. तो आता 40 रुपयांवर गेला आहे. कंपनीला मिळालेले नवीन गुंतवणूकदारांमुळे अनिल अंबानी समूहाच्या सर्वच कंपन्यांचे शेअर तेजीत आले आहे.

कर्जमुक्तीकडे वाटचालीमुळे गतवैभव

2008 मध्ये जागतिक श्रीमंताच्या यादीत अनिल अंबानी सहाव्या स्थानावर होते. त्यावेळी त्यांची संपत्ती 42 दक्षलक्ष डॉलर होती. परंतु त्यानंतर त्यांच्या व्यवसायाला उतरती कळा लागली. 2020 मध्ये ब्रिटनच्या न्यायालयात त्यांनी दिवाळखोरी जाहीर केली. रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये परिवर्तन डिसेंबर 2023 मध्ये सकारात्मक बदल सुरू झाले. रिलायन्स पॉवरने मोठ्या प्रमाणात कर्जाची परतफेड करण्यास सुरुवात केली. मार्च 2024 पर्यंत कंपनीने 1,023 कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड केली होती. त्यानंतर ऑगस्टमध्ये आणखी 800 कोटी रुपये होते. अगदी अलीकडेच, कंपनीने बँकांसोबत 3,872 कोटी रुपयांचे कर्ज सेटल केले, त्याला कर्जमुक्त दर्जा दिला.

16,091 कोटी रुपयांवर पोहचली कंपनी

रिलायन्स पॉवर कंपनी कर्जमुक्त होत असल्यामुळे तिच्या शेअरमध्ये बाजारात तेजी आली आहे. गेल्या नऊ ट्रेडिंग दिवसांमध्ये त्याचे शेअर्स 35% पेक्षा जास्त वाढले आहेत. सलग चार दिवस कंपनीचे शेअर अपर सर्कीटमध्ये पोहचत आहे. 26 ऑक्टोबर 2023 रोजी कंपनीच्या शेअर 15.53 रुपयांच्या 52 आठवड्यांचा नीचांकावर होता. त्याचे मार्केट कॅप सुमारे 6,238 कोटी रुपये होते. त्यानंतर आता कंपनीचे मूल्यांकन 9,853 कोटी रुपयांनी वाढले आहे. सप्टेंबर 2024 पर्यंत कंपनीचे मूल्यांकन 16,091 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

2020 च्या दिवाळखोरीच्या घोषणेनंतर आता अनिल अंबानी यांचे उद्योग जगात जोरदार पुनरागमन होताना दिसत आहेत. अनिल अंबानी यांच्या मुलांनी त्यांचा कौटुंबिक व्यवसायाचे पुनरुज्जीवन करण्यात यश मिळवले आहे. अनिल अंबानी यांची मुले मुकेश अंबानी यांच्या मुलांवर पाऊल टाकत यश मिळवत आहेत.

'बाजारबुणगे, हिंमत असेल तर...', ठाकरेंचा कोणाला अप्रत्यक्षपणे इशारा?
'बाजारबुणगे, हिंमत असेल तर...', ठाकरेंचा कोणाला अप्रत्यक्षपणे इशारा?.
'अक्षय शिंदे कोणी संत नव्हता, तो..', शर्मिला ठाकरे नेमक काय म्हणाल्या?
'अक्षय शिंदे कोणी संत नव्हता, तो..', शर्मिला ठाकरे नेमक काय म्हणाल्या?.
जरांगेंचं उपोषण स्थगित, सलग 8 दिवस उपोषण केल्यानंतर 9व्या दिवशी माघार?
जरांगेंचं उपोषण स्थगित, सलग 8 दिवस उपोषण केल्यानंतर 9व्या दिवशी माघार?.
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणी कोर्टाने केले 'हे' सवाल
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणी कोर्टाने केले 'हे' सवाल.
'हे न पटण्यासारखं...', मुंबई हायकोर्टानं सरकारी वकिलांनाच फटकारलं
'हे न पटण्यासारखं...', मुंबई हायकोर्टानं सरकारी वकिलांनाच फटकारलं.
मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली; शिंदे हा नालायक...
मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली; शिंदे हा नालायक....
'पवार-ठाकरे-काँग्रेसकडून लिहून घ्यावं...', फडणवीसांचं जरांगेंन आव्हान
'पवार-ठाकरे-काँग्रेसकडून लिहून घ्यावं...', फडणवीसांचं जरांगेंन आव्हान.
भाऊ की भाई? शिंदे-फडणवीस समर्थकांमध्ये एन्काऊंटरच्या श्रेयावरुन वॉर?
भाऊ की भाई? शिंदे-फडणवीस समर्थकांमध्ये एन्काऊंटरच्या श्रेयावरुन वॉर?.
अक्षय शिंदेचं एन्काऊंटर पोलिसांच्या व्हॅनमध्येच... पण त्याआधी काय घडलं
अक्षय शिंदेचं एन्काऊंटर पोलिसांच्या व्हॅनमध्येच... पण त्याआधी काय घडलं.
आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर राऊतांसह राजकीय नेत्यांची फायरिंग
आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर राऊतांसह राजकीय नेत्यांची फायरिंग.