अनिल अंबानी यांच्या मुलाने स्वत:च्या हिमतीवर उभारला 2000 कोटींचा उद्योग, कशी घेतली त्याने ही भरारी
Jai Anmol Ambani: मुकेश अंबानी यांच्या मुलांप्रमाणे अनिल अंबानी यांच्या मुलगा जय अनमोल याने अजोबा धिरुभाई अंबानी यांचे नाव पुढे नेण्याची जबाबदारी उचलली आहे. अनमोल वडिलांसाठी नवीन आशेचा किरण बनला आहे.
मुंबई | 17 मार्च 2024 : उद्योग विश्वात मुकेश अंबानी यांच्या मुलांची नेहमीच चर्चा होत असते. आकाश, अनंत आणि ईशा अंबानी यांनी मिळवलेल्या यशाच्या अनेक बातम्या येत असतात. मुकेश अंबानी यांचे लहान बंधू अनिल अंबानी यांच्या अनेक कंपन्या संकटात आहेत. त्यांची मुले काय करतात? यासंदर्भात काहीच माहिती समोर येत नाही. अनिल अंबानी यांना दोन मुले आहेत. जय अनमोल अंबानी आणि जय अंशुल अंबानी अशी त्यांची नावे आहेत. दोन्ही मुले वडीलांचे कोसळले साम्राज्य नव्याने उभारण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रसिद्धीपासून लांब राहून अनमोल सातत्याने मेहनत करत आहेत. त्याने 2000 कोटी रुपयांचा बिजनेस उभा केला आहे.
अजोबा अन् वडिलांचे नाव पुढे नेण्याची जबाबदारी
मुकेश अंबानी यांच्या मुलांप्रमाणे अनिल अंबानी यांच्या मुलगा जय अनमोल याने अजोबा धिरुभाई अंबानी यांचे नाव पुढे नेण्याची जबाबदारी उचलली आहे. अनमोल वडिलांसाठी नवीन आशेचा किरण बनला आहे. अंबानी परिवारात जन्म घेतल्यामुळे उद्योगाचे बाळकडू घरातूनच मिळाले. त्याचा वापर करत अनिल अंबानी यांच्या कंपन्यांना गतवैभव प्राप्त करुन देण्याची जबाबदारी अनमोल उचलत आहे.
सुरुवात इंटर्नपासून आता 2000 कोटींचे यश
जय अनमोल याच्या करिअरची सुरुवात रिलायंस म्यूचुअल फंड (Reliance Mutual Fund) मधून झाली. त्यांनी वयाच्या 18 वर्षी एक इंटर्न म्हणून काम सुरु केले. 2014 मध्ये त्यांनी कंपनीसोबत काम सुरु केले. रिलायंस निपॉन एसेट मॅनेजमेंट आणि रिलायंस होम फायनेंसमध्ये संचालक झाले. त्यांचे वडील अनिल धीरूभाई अंबानी ग्रुप (Anil Dhirubhai Ambani Group) च्या कंपनीवर वाढलेले कर्ज आणि कमी झालेला नफा याचा दबाव यश अनमोल याच्यावर होता. त्यामुळे त्यांनी जपानी कंपनी निपॉनला रिलायंसमधील भागेदारी वाढवण्यासाठी तयार केले.
तसेच रिलायंस लाइफ इंश्योरेंस आणि रिलायंस कॅपिटल एसेट मॅनेजमेंट कंपनीचा जन्म झाला. धाडसी निर्णय, संघर्षाचा समाना करत घेत कंपनीची कंपनीची नेट वर्थ 2000 कोटींवर नेली. जय अनमोल याचे 2022 मध्ये कृशा शाहसोबत लग्न झाले होते.
अनिल यांच्या मुलांकडे कोणती जबाबदारी ?
अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी आहेत. त्यांच्याकडे एकूण सात कंपन्या आहेत. त्यात रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, रिलायन्स पॉवर, रिलायन्स मुंबई मेट्रो, रिलायन्स रोड्स, रिलायन्स डिफेन्स, रिलायन्स कॅपिटल आणि रिलायन्स एंटरटेन्मेंटचा समावेश आहे. त्यातील रिलायन्स मुंबई मेट्रो चार हजार कोटी रुपयांत घेण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने मागील आठवड्यात घेतला.