Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anirudh Devgan : एक दिवसाचा पगार 73 लाख! कोण आहे हा तज्ज्ञ IIT पास

Anirudh Devgan : आयआयटी दिल्लीचे पदवीधर अनिरुद्ध देवगण यांच्या पगाराची सध्या सगळीकडे चर्चा आहे. सर्वाधिक पगार घेणाऱ्या मोजक्याच सीईओमध्ये त्यांची गणना होते. या तरुण आश्वासक चेहऱ्याने अनेकांची उमेद जागवली आहे.

Anirudh Devgan : एक दिवसाचा पगार 73 लाख! कोण आहे हा तज्ज्ञ IIT पास
Follow us
| Updated on: Aug 16, 2023 | 2:53 PM

नवी दिल्ली | 16 ऑगस्ट 2023 : माहिती तंत्रज्ञान म्हणजे आयटी क्षेत्रात (Information Technology-IT) सर्वाधिक पगार आहेत. परदेशात तर भारतीय कंपन्यांपेक्षा अनेक पट पॅकेज मिळते. त्यामुळे तरुणांचा आज पण याच क्षेत्रात शिक्षणाचा ओढा आहे. भारत आणि जगातील टेक कंपन्या दरवर्षी लाखो विद्यार्थ्यांना लाखो आणि कोटींचे पॅकेज जाहीर करतात. आयटी कंपन्यांच्या व्यवस्थपनात असणाऱ्यांचा पगार तर कोटींच्या घरात पोहचतो. गुगल, मायक्रोसॉफ्ट सहीत अनेक टॉप कंपन्यांमध्ये भारतीय वंशाच्या सीईओंना कोट्यवधींचा पगार असतो. यामध्ये आयआयटी दिल्लीचे पदवीधर अनिरुद्ध देवगण (Anirudh Devgan) यांना मिळणाऱ्या वेतनाची सध्या सर्वदूर चर्चा आहे. सर्वात जास्त वेतन घेणाऱ्या मोजक्याच सीईओमध्ये त्यांची गणना होते.

कोण आहेत अनिरुद्ध देवगण

अनिरुद्ध देवगण हे प्रसिद्ध संगणक तज्ज्ञ आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्लीचे माजी विद्यार्थी आहेत. अनिरुद्ध देवगण हे दिग्गज सॉफ्टवेअर कंपनी कँडेंस डिझाईन सिस्टम्सचे सीईओ आहेत. या कंपनीचे मार्केट कॅप 5,17,000 कोटी रुपयांहून अधिक आहे.

हे सुद्धा वाचा

लहानपणापासूनच आयआयटीची आवड

अनिरुद्ध देवगण यांना लहानपणापासून शिक्षणाची आवड होती. त्याचे वडील आयआयटीतच प्राध्यापक होते. अनिरुद्ध देवगण यांनी त्यांचे शालेय शिक्षण दिल्ली पब्लिक स्कूल (DPS) मधून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी आयआयटी दिल्लीतून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले.

अमेरिकेत घेतले शिक्षण

त्यानंतर अनिरुद्ध देवगण हे शिक्षणासाठी अमेरिकेत गेले. त्यांनी कार्नेगी मेलॉन विद्यापीठातून इलेक्ट्रिकल आणि कम्युटर इंजिनिअरींगमध्ये मास्टर आणि पीएचडीचे शिक्षण पूर्ण केले. अनिरुद्ध देवगण यांनी करिअरची सुरुवात आयटी कंपनी आयबीएमपासून केली. आयबीएममध्ये त्यांनी दहा वर्षांहून अधिक काळ काम केले. त्यांनी मॅग्मा डिझाईन ऑटोमेशनमध्ये 6 वर्षे काम केले.

2017 मध्ये टर्निंग पॉईंट

अनिरुद्ध देवगण 2017 मध्ये कॅडेंस या कंपनीत रुजू झाले. डिसेंबर 2021 मध्ये त्यांना बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये सहभागी करुन घेण्यात आले. त्यानंतर त्यांना सीईओ पद मिळाले. लागलीच अनिरुद्ध हे सिलीकॉन व्हॅलीतील टॉप टेक सीईओ सत्य नडेला, सुंदर पिचाई, जयश्री उल्लाल यासारख्या दिग्गज सीईओच्या यादीत आले.

2200 कोटींचे पॅकेज

अनिरुद्ध देवगण सीईओ झाल्यावर त्यांच्या मुळ वेतनात 125% टार्गेट बोनस जोडण्यात आले. त्यांना $725,000 इतके मुळ वेतन देण्यात आले. 2021 मध्ये त्यांनी फिल कॉफमॅन हा पुरस्कार मिळाला. salary.com नुसार, 2022 मध्ये कॅडेंसचे चेअरमन आणि सीईओच्या रुपाने त्यांना वार्षिक वेतन $32,216,034 म्हणजे 2 अब्ज 68 लाख रुपये देण्यात आले. या हिशोबाने त्यांना दिवसाला जवळपास 73 लाख रुपये वेतन देण्यात आले.

'ये दादा का स्टाईल है...', माझाच भाऊ माझ्या सोबत नाही -अजित पवार
'ये दादा का स्टाईल है...', माझाच भाऊ माझ्या सोबत नाही -अजित पवार.
'इतना हंगामा क्यों...', धनंजय मुंडे यांच्या भेटीवरून सुरेश धसांचा सवाल
'इतना हंगामा क्यों...', धनंजय मुंडे यांच्या भेटीवरून सुरेश धसांचा सवाल.
सुरेश धसांनी गेम केला की त्यांचाच गेम झाला? सापळा रचणारा व्यक्ती कोण?
सुरेश धसांनी गेम केला की त्यांचाच गेम झाला? सापळा रचणारा व्यक्ती कोण?.
ठाकरेंच्या भास्कर जाधवांची नाराजी उघड, उदय सामंतांची थेट ऑफर अन्...
ठाकरेंच्या भास्कर जाधवांची नाराजी उघड, उदय सामंतांची थेट ऑफर अन्....
'एक बार मैंने जो...', डायलॉगबाजीनं शिंदेंनी मानले कोकणवासियांचे आभार
'एक बार मैंने जो...', डायलॉगबाजीनं शिंदेंनी मानले कोकणवासियांचे आभार.
'मी बोललो तर ठाकरेंना देश सोडावं लागेल', रामदास कदम भरसभेत कडाडले
'मी बोललो तर ठाकरेंना देश सोडावं लागेल', रामदास कदम भरसभेत कडाडले.
'...तर धसच जबाबदार', संतोष देशमुख प्रकरणावरून जरांगे पाटलांचा हल्लाबोल
'...तर धसच जबाबदार', संतोष देशमुख प्रकरणावरून जरांगे पाटलांचा हल्लाबोल.
ठाकरेंच्या या 3 नेत्यांची हाकालपट्टी, शिंदेंचा 'धनुष्यबाण' हाती घेणार?
ठाकरेंच्या या 3 नेत्यांची हाकालपट्टी, शिंदेंचा 'धनुष्यबाण' हाती घेणार?.
'आपले कार्यकर्ते नुसते थुंकले तरी ते वाहून जातील', दानवेंची जीभ घसरली
'आपले कार्यकर्ते नुसते थुंकले तरी ते वाहून जातील', दानवेंची जीभ घसरली.
'मला हात लावला तर उडी घेईन', 'म्हाडा' मुख्यालयात महिलेने उधळल्या नोटा
'मला हात लावला तर उडी घेईन', 'म्हाडा' मुख्यालयात महिलेने उधळल्या नोटा.