पेट्रोल, डिझेलचे नवे दर जाहीर; जाणून घ्या आपल्या शहरातील भाव

पेट्रोल कंपन्यांनी आज जाहीर केलेल्या नव्या दरानुसार दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 103.97 तर डिझेलचे दर 86.67 रुपये इतके आहेत. तर मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 109.98 तर डिझेलचे दर हे 94.14 रुपये आहेत.

पेट्रोल, डिझेलचे नवे दर जाहीर; जाणून घ्या आपल्या शहरातील भाव
पेट्रोल
Follow us
| Updated on: Dec 13, 2021 | 9:24 AM

नवी दिल्ली : Petrol, Diesel Price Today कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेल्या ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्याने पुन्हा एकदा जगभरातील अर्थव्यवस्थांनी उसळी घेतली आहे. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये तेजी आल्याचे दिसून येत आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कच्च्या तेलाच्या दरामध्ये 1.24 टक्क्यांची वाढ झाली आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर आता 76.08  डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. सामान्यपणे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यास देशात पेट्रोल, डिझेलचे दर देखील वाढतात. मात्र भारतामध्ये गेल्या दीड महिन्यांपासून इंधनाचे दर स्थिर आहेत. त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही.

प्रमुख शहरातील इंधनाचे दर

पेट्रोल कंपन्यांनी आज जाहीर केलेल्या नव्या दरानुसार पेट्रोल, डिझेलच्या किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. महिनाभरापासून दर स्थिर आहेत. दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 103.97 तर डिझेलचे दर 86.67 रुपये इतके आहेत. तर मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 109.98 तर डिझेलचे दर हे 94.14 रुपये आहेत. कोलकातामध्ये पेट्रोल प्रति लिटर 104.67 आणि डिझेल 89.79 रुपये लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे 101.40 आणि 91. 43 रुपये इतके आहे.

दररोज 6 वाजता बदलतात किमती

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

असे तपासा पेट्रोल आणि डिझेलचे भाव

आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.

संबंधित बातम्या 

या आठवड्यात चार दिवस बँका राहणार बंद, दोन दिवसांच्या आत पूर्ण करा पैशांचे व्यवहार

ज्योतिषामुळे बदलले नशीब, दिवसाची कमाई 32 लाखांपेक्षा अधिक; कोण आहेत पुनीत गुप्ता?

बँकिंग क्षेत्रातील नव्या धोरणांचा ठेवीदारांना फायदा; अनेक वर्षांपासून अडकलेले पैसे मिळाले परत, मोदींची बँक ठेवी विमा कार्यक्रमात माहिती

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.