पेट्रोल, डिझेलचे नवे दर जाहीर; जाणून घ्या आपल्या शहरातील भाव

देशातील प्रमुख पेट्रोल कंपन्यांकडून गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol Diesel) भाव जारी करण्यात आले. जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किमती (Fuel Price) स्थिर असून, त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

पेट्रोल, डिझेलचे नवे दर जाहीर; जाणून घ्या आपल्या शहरातील भाव
Follow us
| Updated on: Feb 24, 2022 | 1:33 PM

मुंबई : देशातील प्रमुख पेट्रोल कंपन्यांकडून गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol Diesel) भाव जारी करण्यात आले. जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किमती (Fuel Price) स्थिर असून, त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तब्बल 113 दिवसांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. विशेष म्हणजे इंधन निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या तेलाच्या  (Crude Oil) किमती आंतराष्ट्रीय बाजारात सातत्याने वाढत आहेत. मात्र तरी देखील देशात पेट्रोल,डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यात आल्या आहेत. पाच राज्यातील निवडणुकांच्या निकालानंतर इंधनाच्या किमतीमध्ये वाढ होण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे. सध्या युक्रेन आणि रशियामध्ये तणावाचे वातावरण आहे. याचा परिणाम देखील कच्च्या तेलाच्या किमतीवर पडताना दिसून येत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने कच्च्या तेलाच्या दरांमध्ये वाढ होत आहे.

सलग 113 दिवसांपासून इंधनाच्या किमती स्थिर

गुरुवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 98 रुपयांवर पोहोचले आहेत. कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत असताना देखील देशात इंधनाच्या दरात कुठलीही वाढ करण्यात आलेली नाही. चार नोव्हेंबर 2021 रोजी पेट्रोल, डिझेलवरी कर कमी केल्याने पेट्रोल पाच रुपयांनी तर डिझेल दहा रुपयांनी स्वस्त झाले होते. त्यानंतर दरामध्ये कुठलेही बदल करण्यात आलेले नाहीत. कच्च्या तेलाच्या किमती कमी जास्त होताना दिसत आहेत. मात्र तरी देखील इंधनाचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. देशात सलग 113 दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या किमती स्थिर आहेत.

प्रमुख शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव

गुरुवारी मुंबईत पेट्रोलचा भाव प्रति लिटर 109. 98 रुपये तर डिझेल 84. 24 रुपये इतका आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे 101.40 आणि 91.43 रुपये लिटर आहे. तर राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 95.41 रुपये एवढे असून, डिझेलसाठी 86.67 रुपये मोजावे लागत आहेत. सध्या तरी देशात पेट्रोल आणि डिझेलचे भाव स्थिर आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पेट्रोल, डिझेलची दरवाढ होऊ शकते असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. ही दरवाढ अशीच राहिली तर येणाऱ्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर मोठ्याप्रमाणात वाढू शकतात.

संबंधित बातम्या

धड्याsssम! सेन्सेक्स तब्बल 2000पेक्षा जास्त अंकांनी कोसळला, युक्रेन-रशिया वादाचा जबर फटका

डिजिटल लोन म्हणजे काय? डिजिटल लोनसाठी अर्ज कसा कराल, जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया

फायर इन्शुरन्स म्हणजे काय? कोणत्या परिस्थितीमध्ये मिळते नुकसान भरपाई? जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.