AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mukesh Ambani हे या वर्षात सर्वाधिक मालामाल, पिछाडीवर सावित्री जिंदल

Mukesh Ambani | मुकेश अंबानी यांनी वर्षाअखेर पुन्हा कमाल दाखवली. अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहे. ब्लूमबर्ग बिलिनिअर्स इंडेक्सनुसार ते भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत. सावित्री जिंदल यांनी मध्यंतरी त्यांना कमाईत मागे टाकले होते. पण वर्षा संपण्यापूर्वीच मुकेश अंबानी यांनी नवीन विक्रम केला आहे.

Mukesh Ambani हे या वर्षात सर्वाधिक मालामाल, पिछाडीवर सावित्री जिंदल
Follow us
| Updated on: Dec 30, 2023 | 4:22 PM

नवी दिल्ली | 30 डिसेंबर 2023 : रिलायन्स समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी वर्ष सरता सरता आणखी एक विक्रम नावावर केला आहे. या वर्षात अनेक कंपन्या, ब्रँड्स रिलायन्सने पंखाखाली घेतले. रिलायन्सचा पसारा वाढतच आहे. मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहे. तर त्यांच्यानंतर गौतम अदानी यांचा क्रमांक लागतो. सावित्री जिंदल यांनी यंदा सर्वाधिक कमाईचा विक्रम नावावर केला होता. जिंदल यांच्या एकूण संपत्तीत 9.6 अब्ज डॉलरची भर पडली होती. त्यांनी श्रीमंतांच्या यादीत 5 व्या क्रमांकावर झेप घेतली होती. पण मुकेश अंबानी यांनी वर्षाअखेरीस हा रेकॉर्ड मोडत, सर्वाधिक कमाईची विक्रम नावावर केला आहे.

इतकी केली कमाई

वर्ष 2023 मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीयात सावित्री जिंदल यांनी आघाडी घेतली होती. हा विक्रम मुकेश अंबानी यांनी मोडला. ब्लूमबर्ग बिलिनिअर्स इंडेक्सच्या आकडेवारीनुसार, अंबानी यांनी या वर्षात 10 अब्ज डॉलरची कमाई केली. भारतीय चलनात ही 832,48,85,00,000 इतकी रुपये होते. त्यांनी सावित्री जिंदल यांचा रेकॉर्ड मोडला आहे. त्यांच्यापेक्षा ही कमाई अधिक आहे.

हे सुद्धा वाचा

सर्वात श्रीमंत उद्योगपती

मुकेश अंबानी यांच्या संपत्ती यंदा 9.98 बिलियन डॉलर्सची भर पडली. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये यंदा 9 टक्क्यांची वाढ झाल्याने त्याचा फायदा त्यांना झाला. त्यांचा Jio Financial Services चा एकत्रिकरणाचा निर्णय फायद्यात असल्याचे समोर आले आहे. मुकेश अंबानी हे आता 97.1 अब्ज डॉलरचे धनी झाले आहेत. भारतातीलच नाही तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची बिरुदावली कायम आहे.

या उद्योपतींना लॉटरी

या यादीत दुसऱ्या स्थानावर HCL चे संस्थापक शिवा नाडर यांचा समावेश आहे. त्यांच्या संपत्तीत यंदा 9.47 अब्ज डॉलरची भर पडली आहे. यंदा त्यांच्या संपत्तीत, कंपनीच्या शेअरने भरारी घेतली. हा शेअर 41 टक्क्यांनी उसळला. तिसऱ्या स्थानावर सावित्री जिंदल आहेत. त्यांच्या संपत्तीत 9 अब्ज डॉलरची भर पडली आहे. त्या भारतातील सर्वात श्रीमंत महिला उद्योगपती आहेत. सावित्री जिंदल यांच्या ओपी जिंदल समूहाच्या काही कंपन्या शेअर बाजारात आहेत. त्यात जेएसडब्ल्यू स्टील, जिंदल स्टील अँड पॉवर, जेएसडब्ल्यू एनर्जी, जिंदल साव, आणि जिंदल स्टेनलेस यांचा समावेश आहे.