Mukesh Ambani : ही मेट्रो कंपनी पण मुकेश अंबानी यांच्या खिशात! जर्मनीच्या या कंपनीने गुंडाळला गाशा

Mukesh Ambani : जर्मनीची जागतिक दर्जाची कंपनी रिलायन्स रिटेलने अखेर खिशात घातली. या मेट्रो कंपनीमुळे आता रिलायन्सचा रिटेल क्षेत्रातील पसारा वाढणार आहे.

Mukesh Ambani : ही मेट्रो कंपनी पण मुकेश अंबानी यांच्या खिशात! जर्मनीच्या या कंपनीने गुंडाळला गाशा
Follow us
| Updated on: May 12, 2023 | 5:42 PM

नवी दिल्ली : जर्मनीची दिग्गज रिटेल कंपनी मेट्रो एजी (Mero AG) अखेर रिलायन्स रिटेलने खिशात घातली. मेट्रो एजीने भारतातील आपला व्यवसाय गुंडाळला आहे. रिटेल क्षेत्रातील मेट्रो एजी ही दिग्गज कंपनी आहे. आता या कंपनीचा सर्व कारभार रिलायन्स रिटेलच्या ताब्यात आला आहे. उद्योगतपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani)  यांनी जबरदस्त खेळी करत हा व्यावसायिक करार पूर्ण केला. मेट्रो कॅश अँड कँरी इंडिया या नावाने मेट्रो जी कंपनी व्यावसाय करत होती. डिसेंबर 2022 मध्ये मेट्रो इंडिया ताब्यात घेण्याची घोषणा मुकेश अंबानी यांनी केली होती. त्यासंबंधीचा करार अंतिम टप्प्यात होता. ही डील 2850 कोटी रुपयात पूर्ण झाली आहे.

असा वाढला पसारा मेट्रो एजीने या कराराविषयी माहिती दिली. त्यानुसार मेट्रो ब्रँडची देशातील 31 मोठी विक्री स्टोअर आणि सर्वच्या सर्व रिअल इस्टेट पोर्टफोलिओ आता रिलायन्स रिटेल व्हेंचर्सला (Reliance Retail) विक्री करण्यात आला आहे. मेट्रो इंडिया भविष्यात रिलायन्स रिटेलसाठी किरकोळ बाजारात महत्वपूर्ण भूमिका बजावेल. मेट्रो स्टोअर खाद्य पदार्थ, अन्नधान्य आणि इतर वस्तूंची घाऊक विक्री करते.

सध्या व्यवस्थापन मेट्रोकडे या विक्री करारानुसार अजून काही दिवस मेट्रो इंडियाच सर्व कारभार हाकेल. त्यानंतर करारानुसार तो रिलायन्स रिटेलकडे सोपविण्यात येईल. सध्या मेट्रो इंडियाचे कर्मचारी आणि इतर व्यवस्थापकीय बाबीत कुठलाही बदल करण्यात येणार नाही. त्यामुळे मेट्रोचा लूक बदलणार नाही. ग्राहकांसाठीच्या ऑफर्स कायम असतील. या करारामुळे रिलायन्सला त्यांच्या किरकोळ वस्तूंच्या विक्री व्यवसाय अजून वाढविता येणार आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलयान्स इंडस्ट्रीज यांची रिलायन्स रिटेल ही उपकंपनी असून रिटेल व्यवसायात या कंपनीची देशभरात मोठी चेन आहे.

हे सुद्धा वाचा

नफ्यात जोरदार वाढ देशातील दिग्गज कंपनी रिलायन्सने आर्थिक वर्ष 2022-23 मधील मार्च तिमाहीत निव्वळ नफ्यात जोरदार कामगिरी बजावली आहे. त्यांचा निव्वळ नफा 19 टक्क्यांनी वाढला आहे. आता हा नफा 19,299 कोटींच्या घरात पोहचला आहे. कंपनीला आतापर्यंत एखाद्या तिमाहीत मिळालेला हा सर्वाधिक नफा आहे. रिलायन्स समूहाने जानेवारी-मार्च 2023 या तिमाहीतील आर्थिक आकेडवारी जाहीर केली. यासंबंधीची माहिती कंपनीने शेअर बाजाराला दिली. कंपनीला पेट्रो रसायन आणि तेलाच्या माध्यमातून मोठे उत्पन्न मिळाले. तर किरकोळ बाजार आणि दूरसंचार उद्योगाने त्यांना मोठी साथ दिली.

महसूलात मोठी वाढ आर्थिक वर्ष 2022-2023 मध्ये रिलायन्सचा शु्द्ध नफा 66,702 कोटी रुपये होता. रिलायन्सचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा फायदा आहे. या दरम्यान कंपनीचा महसूल 10 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहचला. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये आरआयएलने 60,705 कोटी शुद्ध लाभ कमाविला होता. त्यावेळी महसूल 7.36 लाख कोटी रुपये होता.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.