Apple iPhone 12 केला होता ऑर्डर, भांड्याचा साबण मिळाला अन् 5 रुपयांचं नाणे, काय आहे प्रकरण?

अमीनने स्थानिक प्रसारमाध्यमांना सांगितले की, पॅकेजच्या वितरणास विलंब झाल्यामुळे त्याला आधीच चुकीचा संशय आला होता. हैदराबादहून कोचीला येणारी सर्व ऑर्डर 2 दिवसांत वितरीत केली जातात. त्याच्या बाबतीत पॅकेज हैदराबादला सोडल्यानंतर एक दिवस सालेममध्ये राहिले. डिलिव्हरीसाठी 3 दिवस लागले.

Apple iPhone 12 केला होता ऑर्डर, भांड्याचा साबण मिळाला अन् 5 रुपयांचं नाणे, काय आहे प्रकरण?
धक्कादायक : मध्य प्रदेशात अमेझॉनवरुन 1 टन गांजाची तस्करी
Follow us
| Updated on: Oct 25, 2021 | 10:27 PM

नवी दिल्ली : ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे केलेल्या ऑर्डरमध्ये फसवणुकीची प्रकरणे थांबण्याचे नाव घेत नाहीत. केरळमधील एका युजरसोबत अशाच प्रकारची फसवणुकीची घटना नुकतीच घडलीय. केरळच्या अलुवा येथील नुरुल अमीनने 12 ऑक्टोबरला अॅपलचा आयफोन 12 ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म अॅमेझॉनद्वारे ऑर्डर केला, यासाठी त्याने अॅमेझॉन पे कार्डद्वारे 70,900 रुपये दिले. यानंतर 15 ऑक्टोबरला त्यांना पार्सल मिळाले, तेव्हा आयफोन 12 ऐवजी भांड्याचा साबण आणि 5 रुपयांचे नाणे मिळाले.

पॅकेजच्या वितरणास विलंब झाल्यानं त्याला चुकीचा संशय

अमीनने स्थानिक प्रसारमाध्यमांना सांगितले की, पॅकेजच्या वितरणास विलंब झाल्यामुळे त्याला आधीच चुकीचा संशय आला होता. हैदराबादहून कोचीला येणारी सर्व ऑर्डर 2 दिवसांत वितरीत केली जातात. त्याच्या बाबतीत पॅकेज हैदराबादला सोडल्यानंतर एक दिवस सालेममध्ये राहिले. डिलिव्हरीसाठी 3 दिवस लागले.

झारखंडमध्ये iPhone 12 चा वापर होत होता

नुरुल अमीनने भीतीमुळे अॅमेझॉन डिलिव्हरी पार्टनरसमोर बॉक्स उघडला आणि व्हिडीओ रेकॉर्ड केला. पॅकेजचे वजन आयफोनच्या बरोबरीचे असल्याचे दिसत होते, परंतु फोनऐवजी साबण आणि 5 रुपयांचे नाणे बाहेर आले. यानंतर तत्काळ अॅमेझॉन कस्टमर केअर आणि पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. ऑर्डरच्या 15 दिवस आधी 25 सप्टेंबरपासून झारखंडमध्ये अमीनचा आयफोन वापरला जात असल्याचे तपासात समोर आले.

नुरुलला 70,900 रुपये परत मिळाले

पोलिसांनी सांगितले की, नुरुलच्या तक्रारीनंतर अॅमेझॉनचे अधिकारी आणि तेलंगणातील विक्रेत्याशी संपर्क साधण्यात आला. वस्तूंचा साठा संपला असल्याची माहिती विक्रेत्याने दिली. यानंतर नुरुल अमीन यांना दिलेली रक्कम परत करण्यात आली. अमीनने सांगितले की, त्यांचे पैसे Amazon Pay कार्डमध्ये परत आलेत. विक्रेत्याने ग्राहकाचे पैसे परत केल्याचीही माहिती केरळ पोलिसांनी दिली. यानंतरही या प्रकरणाचा तपास सुरू आहे. फ्लिपकार्ट वापरकर्त्याच्या बाबतीतही असेच प्रकरण घडले. बिग बिलियन डेज सेलदरम्यान त्याने आयफोन 12 ची ऑर्डर दिली. त्यांच्या पॅकेजमध्ये साबणही देण्यात आला.

संबंधित बातम्या

Bank Holiday List : नोव्हेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद राहणार, शाखेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची यादी तपासा

BPCL च्या खासगीकरणात अडथळा, बोली लावणाऱ्या कंपन्यांना सहयोगीच मिळत नाहीत

Apple iPhone 12 was ordered pot soap was found and a 5 rupee coin what is the matter?

Non Stop LIVE Update
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.