AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त दोन दिवस कळ सोसा, APPLE iPhone मोबाईलमध्ये मिळणार 5Gचे नेटवर्क

ॲपल बीटा सॉफ्टवेअर प्रोग्राम मिळवण्यासाठी पुढील आठवड्यापासून एअरटेल आणि जिओ ग्राहकांना तुमच्या iPhone ची नोंदणी करावी लागेल.

फक्त दोन दिवस कळ सोसा, APPLE iPhone मोबाईलमध्ये मिळणार 5Gचे नेटवर्क
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Nov 05, 2022 | 6:12 PM

नवी दिल्लीः ॲपल आयफोन (APPLE iPhone) धारकांना आता फक्त काही तासात 5G नेटवर्कची (5G Network) सुविधा उपलब्ध होणार आहे. सोमवारी म्हणजेच येत्या ७ नोव्हेंबरपासून ॲपलच्या फोनवर 5G ची सुविधा मिळणार आहे. ॲपलच्या iOS 16 बीटा सॉफ्टवेअर प्रोग्राममध्ये 5G ची सुविधा मिळेल. त्यामुळे यूझर्सना सुसाट वेगातील इंटरनेट सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

ॲपलने दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही iPhone 14, iPhone 13, iPhone 12 and iPhone SE (3rd generation) चे एअरटेल आणि जिओचे ग्राहक 5G सुविधा घेण्यासाठी ॲपल बिटा सॉफ्टवेअर प्रोग्रामचा वापर करू शकतात. ॲपल बीटा सॉफ्टवेअर प्रोग्रामद्वारे यूझर्सना प्री रिलिज सॉफ्टवेअर वापरता येते. हे सॉफ्टवेअर मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येण्यापूर्वी त्याच्या अत्याधुनिक सुविधांचा अनुभवदेखील घेता येतो. या सॉफ्टेवेअरची गुणवत्ता, वापर कसा आहे, याबद्दल यूझर्सनी फीडबॅक देण्याचे आवाहन ॲपलकडून करण्यात आले आहे. जेणेकरून त्यातील उणीवा शोधून अॅपलला ते सॉफ्टवेअर अधिक उत्तम दर्जाचे बनवता येईल. ॲपल बीटा सॉफ्टवेअर प्रोग्राम मिळवण्यासाठी पुढील आठवड्यापासून एअरटेल आणि जिओ ग्राहकांना तुमच्या iPhone ची नोंदणी करावी लागेल. याद्वारे 5G beta सह इतरही सार्वजनिक बीटा सॉफ्टवेअरचे आणि त्यानंतरचे अपडेट्स मिळवता येतील.

ॲपल बीटा सॉफ्टवेअर प्रोग्रामबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी beta.apple.com वर भेट देण्याचे आवाहन कंपनीतर्फे करण्यात आले आहे. तसेच याविषयीच्या FAQ अर्थात प्रश्नोत्तरांसाठी https://beta.apple.com/sp/betaprogram/faq येथे भेट देण्याचे आवाहन कंपनीतर्फे करण्यात आले आहे.

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना लष्कराने घेरलं; सुत्रांची माहिती
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना लष्कराने घेरलं; सुत्रांची माहिती.
पर्यटकांच्या हत्येचा बदला कोणत्याही क्षणी? देशात हालचालींना वेग
पर्यटकांच्या हत्येचा बदला कोणत्याही क्षणी? देशात हालचालींना वेग.
पहलगाम हल्ल्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक
पहलगाम हल्ल्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक.
पाकिस्तान सुधरेना! कुरघोड्या सुरूच, सलग पाचव्या दिवशी गोळीबार
पाकिस्तान सुधरेना! कुरघोड्या सुरूच, सलग पाचव्या दिवशी गोळीबार.
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.