AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Apple Store : ॲपल कर्मचाऱ्यांना लागली लॉटरी! पगाराचे आकडे पाहून गदगद व्हाल

Apple Store : देशात ॲपल कर्मचाऱ्यांना लॉटरी लागली आहे. कर्मचाऱ्यांच्या पगाराचे आकडे पाहून तुम्ही म्हणाल काय नशीब उघडले राव..

Apple Store : ॲपल कर्मचाऱ्यांना लागली लॉटरी! पगाराचे आकडे पाहून गदगद व्हाल
Follow us
| Updated on: Apr 26, 2023 | 5:31 PM

नवी दिल्ली : अखेर ॲपलने भारतात त्यांचे अधिकृत बस्थान बसविले. आता भारतात आयफोनपासून सर्व उत्पादने मिळण्याचे अधिकृत ठिकाण उपलब्ध झाले आहे. कंपनीचे सीईओ टीम कूक यांनी अधिकृतपणे ही सेवा सुरु केली आहे. भारतात Apple ने दोन ठिकाणी नवीन स्टोअर उघडले आहेत. 2025 पर्यंत, प्रत्येक 100 पैकी 25 आयफोन भारतीय असतील, म्हणजे, भारतात त्यांची निर्मिती होईल. भारतात कंपनीने मोठा कर्मचारी वर्ग कामावर ठेवला आहे. त्यांच्या पगाराचे आकडे थक्क करणारेच नाहीत तर प्रतिस्पर्धी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना धक्का देणारे आहेत. किती आहे या कर्मचाऱ्यांना पगार?

इतके आहे वेतन ॲपल हा ब्रँड महागडा आहे. त्याची उत्पादने महाग आहेत. आयफोन आणि इतर उत्पादनाच्या किंमती तर तुम्हालाही माहिती आहे. ही कंपनी तिच्या कर्मचाऱ्यांना गलेलठ्ठ पगार देते. कंपनीने अथवा कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पगाराची माहिती दिली नाही. याविषयीचा अधिकृत आकडा नाही. मीडिया रिपोर्टनुसार, भारतातील ॲपल स्टोअरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दरमहा 1 लाख रुपयांचे वेतन देण्यात येणार आहे. म्हणजे या स्टोअरमधील कर्मचाऱ्यांना 12 लाख अथवा त्यापेक्षा अधिकचे वार्षिक पॅकेज देण्यात येणार आहे.

कर्मचाऱ्यांकडे विशेष कौशल्य अर्थात एवढा वार्षिक पगार घेणारे कर्मचारी पण विशेष कौशल्य आणि तंत्रज्ञानाचे शिक्षण पूर्ण केलेले आहेत. या कर्मचाऱ्यांकडे एमबीए, एमटेक, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, बीटेक, रोबोटिक्स अशा पदव्या आहेत. काहींचे तर परदेशी विद्यापीठातून शिक्षण पूर्ण झाले आहे. काही रिपोर्टनुसार, हे कर्मचारी बहुभाषिक आहेत. त्यांना स्थानिक भाषेशिवाय इतर ही अनेक भाषा येतात.

हे सुद्धा वाचा

देशात मोबाईलची मोठी अर्थव्यवस्था देशात गेल्या आर्थिक वर्षात मोबाईल फोनची निर्यात प्रचंड वाढली. हा आकडा 11.12 अब्ज डॉलर, जवळपास 90,000 कोटी रुपये इतका आहे. यामध्ये ॲपलचा वाटा अर्धा आहे. त्यामुळेच ॲपलने भारतात पाऊल ठेवण्याचे धाडस केले. त्याला प्रतिसादही जोरदार मिळत आहे. ॲपल स्टोअरमध्ये खरेदीसाठी रांगा लागल्या आहेत.

सीईओचा पगार किती बऱ्याचदा आपण कंपनी बदलली की नशीब पालटले असे म्हणतो. पण ॲपलचे नशीब टीम कूक यांच्या येण्याने पार पालटून गेले. 2011 मध्ये टीम कूक हे ॲपलचे सीईओ झाल्यानंतर या कंपनीचे नशीब बदलले. कंपनीचे मार्केट कॅप 235 लाख कोटींच्या पुढे गेले. टीम कूक यांना 2018 मध्ये 84 कोटी रुपयांचा बोनस मिळाला. 2022 साली कंपनीचे सीईओ म्हणून त्यांना वार्षिक 815 कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले. त्यानंतर यंदा त्यांनी स्वतःच पगारात कपात करत तो 402 कोटी रुपयांवर आणला.

पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.