कर्ज घेण्याच्या नादात होऊ शकते मोठी फसवणूक, असे ओळखा खरे अ‍ॅप

देशामध्ये मोठ्या प्रमाणावर बेरोजगारांची संख्या वाढली आहे. याचाच गैरफायदा घेत अनेक खोटे अ‍ॅप तयार करून फसवणूकीची प्रकरणं समोर आली आहे.

कर्ज घेण्याच्या नादात होऊ शकते मोठी फसवणूक, असे ओळखा खरे अ‍ॅप
व्हॉट्सअ‍ॅपने बऱ्याच वेळा या नवीन स्टोरेज मॅनेजमेंट टूलची चाचणी केली आहे. काही बीटा वापरकर्ते आधीपासूनच या सुविधेचा लाभ घेत होते.
Follow us
| Updated on: Oct 27, 2020 | 9:56 PM

नवी दिल्ली : कोरोनाच्या महामारीमध्ये अनेकांवर आर्थिक संकट ओढावलं आहे. त्यामुळे देशामध्ये मोठ्या प्रमाणावर बेरोजगारांची संख्या वाढली आहे. याचाच गैरफायदा घेत अनेक खोटे अ‍ॅप तयार करून फसवणूकीची प्रकरणं समोर आली आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी कोणत्याही खोट्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नका अशा सूचना वारंवार दिल्या जात आहे. (apps for loan with 5 ways know which apps are fake online fraud news)

सध्या कर्ज देण्यासाठी अनेक नवीन अ‍ॅप बाजारात आले. यामध्ये लवकर कर्ज मिळवण्यासाठी आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर इत्यादी माहिती दिली असता लगेच कर्ज मिळतं. पण नंतर या अ‍ॅपद्वारे फसवणूक होत असल्याचं समोर आलं आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, आतापर्यंत 50,000 हून अधिक लोकांची तब्बल एकूण 15 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे कुठल्याही अ‍ॅपमध्ये माहिती भरण्याआधी तो खरा आहे की खोटा हे तपासून घ्या…

या 5 पद्धतीने तपासा अ‍ॅप खरा की खोटा?

1. सिबिल स्कोअरसंबंधी गंभीर नाही जर तुम्ही कर्ज घेण्यासाठी एखाद्या अ‍ॅपशी संपर्क केला आणि ती कंपनी जर तुम्ही कसे कर्ज फेडणार आहात आणि तुमचा सिबिल स्कोअर चांगला आहे का? हे पाहण्यात गंभीर नसेल तर सावधान राहा. कारण कोणताही खरा अ‍ॅप तुमचा सिबिल स्कोअर चांगला आहे का? याची पाहणी नक्की करेन. पण जर एखाद्या अ‍ॅपने असं न करता थेट कर्जासाठी तुमची कागदपत्रं मागितली तर लगेच शेअर करू नका.

2. अंतिम मुदतीत अर्ज करण्यासाठी दबाव जर एखादी कंपनी अंतिम मुदतीत कर्ज घेण्यासाठी दबाव टाकत असेल तर हे योग्य नाही. कारण कर्जाची गरज तुम्हाला आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि फायद्यासोबत कर्ज घेण्याचा पर्याय निवडू शकता. (apps for loan with 5 ways know which apps are fake online fraud news)

3. शुल्काची कोणतीही माहिती नाही जर अ‍ॅपमध्ये कर्जाचा अर्ज, क्रेडिट रिपोर्टच्या फी संदर्भात तपशील दिलेला नसेल किंवा त्यांसंबंधी कुठलाही खुलासा केला गेला नाही तर त्या संबंधित अ‍ॅपमधून कर्ज घेण्याचं शक्यतो टाळा.

4. कंपनीची वेबसाइट सुरक्षित आहे की नाही? कर्ज घेण्यासाठी जर तुम्ही एखाद्या अ‍ॅपची निवड केलीत तर अ‍ॅपच्या वेबसाइटवर नक्की जा. यामध्ये एखादी गोष्ट तुम्हाला सुरक्षित वाटली नाही तर तुम्ही सावधान व्हा. नाहीतर यातून तुमची मोठी फसवणूक होऊ शकते.

5. कंपनीचा किंवा अ‍ॅपचा पत्ता शोधण्याचा नक्की प्रयत्न करा जर कोणत्याही अ‍ॅपद्वारे तुम्ही कर्ज घेण्याचा प्लॅन करत असाल तर सगळ्यात आधी अ‍ॅपचा मालकी हक्क असणाऱ्या कंपनीचा पत्ता नक्की शोधा. जर कंपनीचा पत्ता वेबसाइटवर दिसला नाही तर अशा अ‍ॅप्समधून कर्ज घेऊ नका.

इतर बातम्या – 

आताच ऑर्डर करा RuPay Card, मोफत मिळणार 10 लाखांचा विमा; सोबत आहेत धमाकेदार ऑफर्स

एकाच गुंतवणुकीवर प्रत्येक महिन्याला मिळवा 19 हजार, आयुष्यभर होईल कमाई!

(apps for loan with 5 ways know which apps are fake online fraud news)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.