लग्न करणाऱ्यांना सरकार देत आहे सोनं, लग्नाच्या आधी असं करा अप्लाय

मुलीसाठी सोन्याचे दागिने खरेदी करणं म्हणजे पालकांसाठी अवघड असतं. पण सोनं खरेदीसाठी सरकारकडून दिलासादायक बातमी समोर आली आहे.

लग्न करणाऱ्यांना सरकार देत आहे सोनं, लग्नाच्या आधी असं करा अप्लाय
सोळा श्रृंगार म्हणजे काय?
| Edited By: | Updated on: Dec 15, 2020 | 8:27 AM

नवी दिल्ली : लग्नाच्या सगळ्यात आनंदायी सोहळ्यात वधूला सोन्याचे दागिने देण्याची प्रथा तशी जुनीच आहे. पण आता सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. यामुळे सध्या सोन्याची खरेदी (Gold Price) करणं काही सोपं नाही. अशा परिस्थितीत मुलीसाठी सोन्याचे दागिने खरेदी करणं म्हणजे पालकांसाठी अवघड असतं. पण सोनं खरेदीसाठी सरकारकडून दिलासादायक बातमी समोर आली आहे. आसाम सरकारने नववधूंसाठी ‘अरुंधती गोल्ड स्कीम’ (Arundhati Gold Scheme) वापरात आणली आहे. या खास योजनेअंतर्गत सोन्याच्या खरेदीसाठी 30 हजार रुपयांची मदत होणार आहे. (arundhati gold scheme assam govt gives gold to brides)

गेल्या वर्षी आसाम सरकारने ही सुवर्ण योजना सुरू केली. सुरुवातीला सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 30 हजार रुपये होती. पण आता कोरोना संकटात आणि इतर घडामोडींमुळे सोन्याच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान, सोन्याच्या किंमती वाढल्या असल्या तरी ही योजना अद्यापही सुरू आहे. पण यामधील रक्कमेमध्ये वाढ करण्यात आलेली नाही.

या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी काय आहे सरकारच्या अटी ?

– वधूच्या कुटूंबाला विशेष विवाह कायदा 1954 अन्वये लग्नाची नोंदणी करावी लागणार आहे.
– वधू कमीतकमी दहावीपर्यंत वाचली असावी.
– मुलीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त नसावं.
– पहिल्या लग्नातच वधूला या योजनेचा लाभ मिळणार आहे.
– या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचं वय 18 वर्षे आणि मुलाचं वय 21 वर्षांपेक्षा जास्त असणं आवश्यक आहे.

2019-20 मध्ये आसाम सरकारने अरुंधती सुवर्ण योजनेसाठी 300 दशलक्ष रुपये वाटप केले होते. खरंतर, गरीब कुटुंबांसाठी ही योजना अत्यंत फायद्याची आहे. सगळ्यात खास गोष्ट म्हणजे या योजनेंतर्गत सोन्याच्या दागिन्यांऐवजी सरकार वधूच्या बँक खात्यात 30 हजार रुपये जमा करते. यामुळे यानंतर या पैशातून खरेदी केलेल्या दागिन्यांचे बिल जमा करावे लागते.

अरुंधती सुवर्ण योजनेचा लाभ मिळण्यासाठी revenueassam.nic.in या वेबसाठईटवर ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो. इतकंच नाही तर फॉर्म भरल्यानंतर प्रिंटआउट घेऊन ती सबमिट करणं आवश्यक आहे. यानंतर, आपला अर्ज स्विकारला गेला की नाही हे एसएमएसद्वारे कळवलं जातं. (arundhati gold scheme assam govt gives gold to brides)

संबंधित बातम्या –

वृद्धापकाळात प्रत्येक महिन्याला मिळतील 30 हजार रुपये, ‘या’ बँकेत सोप्या पद्धतीने उघडा खातं

Fact check | ‘पीएम निवृत्ती वेतन योजने’तून खरंच 70 हजार रुपये मिळणार?

(arundhati gold scheme assam govt gives gold to brides)