आयात शुल्क कपातीचा परिणाम, खाद्य तेल झाले स्वस्त; सर्वसामान्यांना दिलासा

गेल्या काही महिन्यांमध्ये खाद्य तेलाचे दर गगनाला भिडले होते. तेलाचे दर वाढल्याने याचा मोठा आर्थिक फटका हा सर्वसामान्यांना सहन कारावा लागत होता. तेलाचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राकडून तेलावरील आयात शुल्कात कपात करण्यात आली होती. आता त्याचा सकारात्मक परिणाम होताना दिसून येत आहे.

आयात शुल्क कपातीचा परिणाम, खाद्य तेल झाले स्वस्त; सर्वसामान्यांना दिलासा
संग्रहित छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 26, 2021 | 1:54 PM

नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यांमध्ये खाद्य तेलाचे दर गगनाला भिडले होते. तेलाचे दर वाढल्याने याचा मोठा आर्थिक फटका हा सर्वसामान्यांना सहन कारावा लागत होता. तेलाचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राकडून तेलावरील आयात शुल्कात कपात करण्यात आली होती. आता त्याचा सकारात्मक परिणाम होताना दिसून येत आहे. देशातील काही प्रमुख बाजारपेठांमध्ये तेलाचे दर कमी होताना दिसत आहेत. सोयाबीन तेलासह, सुर्यफूल तेल, मोहरीचे तेल आणि पाम तेल देखील काही प्रमाणात स्वस्त झाले आहे. पुढील काही दिवसांमध्ये तेलाच्या किमती आणखी कमी होऊ  शकतात असा अंदाज अर्थ तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे.

सोयाबीन स्वस्त झाले

सोयाबीनच्या किमती स्वस्त झाल्या आहेत. सोयाबीनचा मागणीपेक्षा पुरवठा वाढल्याने सोयाबीनचे भाव पडले आहेत. त्यामुळे तेल निर्मिती कंपन्यांना सध्या सोयाबिन स्वस्तात उपलब्ध होत आहे. तसेच दुसरीकडे केंद्राकडून देखील तेलावर आकारण्यात येणारे आयात शुक्ल कमी केल्याने तेलाच्या किमती या काहीप्रमाणात कमी झाल्याचे दिसून येत आहे. तेलाच्या किमती कमी झाल्याने सर्वासामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मोहरीच्या दरात देखील घट

सोयाबीनपाठोपाठ मोहरीच्या दरात देखील मोठ्याप्रमाणात घट झाली आहे. मोहरीचे दर प्रति क्विटंल मागे तब्बल 600 रुपयांनी घसरले आहेत.  गेल्या आठवड्यात मोहरीला प्रति क्विटंल 8500-8525  रुपयांचा भाव मिळत होता. मात्र चालू आठवड्यात त्यामध्ये घसर होऊन मोहरीचे दर प्रति क्विटंल 7975-8025  च्या दरम्यान आले आहेत. मोहरी स्वस्त झाल्याने मोहरीच्या तेलाचे दर देखील घसरले आहेत. गेल्या आठवड्यात मोहरीच्या तेलाचा भाव  2390 रुपये प्रति पाच लिटर होता. तर चालू आठवड्यामध्ये  तेलाच्या दरामध्ये 75 रुपयांची घट होऊन तेलाचे दर 2315 रुपयांवर पोहोचले आहेत.

संबंधित बातम्या 

‘या’ कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल; 1 लाखाचे झाले 11 लाख, टाटा केमिकललाही टाकले मागे

लहान मुलांसाठी आधार कार्ड का आहे महत्त्वाचे?, कितव्या वर्षी होते अपडेट जाणून घ्या

PF Withdrawal: पीएफ कधी काढता येतो?; जाणून घ्या पीएफबाबतच्या महत्त्वाच्या अटी

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.