Government Company | विक्रीचा झाला होता प्लॅन, त्याच कंपनीमुळे केंद्र सरकार मालामाल
Government Company | गेल्या वर्षी ही कंपनी विक्री करण्याची तयारी केंद्र सरकारने जवळपास केली होती. कारण ही कंपनी नफा मिळवून देत नसल्याचे एकंदरीत गोळाबेरीज केल्यानंतर समोर आले होते. निर्गुंतवणूकीसाठी केंद्र सरकारने प्रयत्न केले. पण याच कंपनीने तीन महिन्यांत केंद्राच्या तिजोरीत 8500 कोटी रुपये जमा केले आहे.
नवी दिल्ली | 28 ऑक्टोबर 2023 : गेल्या वर्षी या कंपनीने केंद्र सरकारची चांगली डोकेदुखी वाढवली होती. ही कंपनी नफ्याचा ट्रॅक सोडून तोट्याकडे चालली होती. महसूली तूट वाढत होती. त्यामुळे केंद्र सरकारने ही कंपनी विक्री करण्याचा निर्णय घेतला. या कंपनीत निर्गुंतवणुकीचा निर्णय घेतला. सर्व तयारी झाली. पण केंद्र सरकारला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे विक्रीची प्रक्रिया थंडावली. पण या कंपनीने चमत्कार केला. केवळ तीनच महिन्यात या कंपनीने नफा मिळवून दिला. जुले ते सप्टेंबर या तीन महिन्यात कंपनीने 8,501 कोटी रुपयांचा नफा मिळवून दिला. त्यामुळे आता या कंपनीची विक्रीची चर्चा मागे पडली आहे.
कोणती आहे ही कंपनी
तर ही कंपनी तुम्ही पण ओळखता. भारत पेट्रोलियम कॉरपोरेशन लिमिटेड (BPCL) ही ती कंपनी आहे. या कंपनीच्या पेट्रोल पंपवर तुम्ही कधी ना कधी पेट्रोल-डिझेल वाहनातच भरलेच असेल. ही कंपनी गेल्यावर्षी विक्री करण्याची तयारी झाली होती. अवघ्या तीनच महिन्यात या कंपनीने नफ्याचे सर्व रेकॉर्ड तोडले. केंद्र सरकारने या कंपनीत निर्गुंतवणूकीसाठी 2019 मध्ये मंजूरी दिली होती. केंद्र सरकारने या कंपनीत 52.98% वाटा विक्रीची घोषणा केली आणि निविदा मागितली होती. विक्री पूर्वी या कंपनीच्या सर्व व्यवसायाचे एकत्रिकरण करण्यात आले होते.
तोट्यातून नफ्याकडे कूच
गेल्या आर्थिक वर्षात 2022-23 जुलै-सप्टेंबरच्या कालावधीत कंपनीला 304 कोटी रुपायंचा तोटा झाला होता. आता या वर्षात कंपनीने स्वतःचा मोठा बदल केला. या कंपनीने नफ्याचे गणित आजमावले. कंपनीने बाजारात मांड ठोकली. एप्रिल ते जून या कालावधीत कंपनीने 10,550.88 कोटी रुपयांचा नफा मिळवला. तर एप्रिल-सप्टेंबर या सहामहीत कंपनीला 19,052 कोटींचा फायदा झाला.
दुसरी सर्वात मोठी पेट्रोलियम कंपनी
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, देशातील दुसरी सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी आहे. ही कंपनी पेट्रोलियम किरकोळ विक्रीसह रिफायनिंगचा, तेल शुद्ध करण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयातंर्गत काम करते. फॉर्च्यूनने 2020 मध्ये जगातील सर्वात मोठ्या सरकारी कंपन्यांची यादी जाहीर केली होती. त्यात बीपीसीएलचा 309 क्रमांकावर होती.
या ठिकामी प्लँट
भारत पेट्रोलियम देशभरात जवळपास 20,000 पेट्रोल पंप चालवते. तर मुंबई, कोच्ची, बिना या ठिकाणी या कंपनीच्या पेट्रोलियम रिफायनरीज आहे. भारत पेट्रोलियम ही कंपनी स्वातंत्र्यपूर्व काळातील आहे. या कंपनीचे पूर्वीचे नाव बुरमाह-शेल ऑईल स्टोरेज कंपनी असे होते. गेल्या वर्षात कंपनीला, एप्रिल-सप्टेंबर या महिन्यात 6,611 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.