नवी दिल्ली : सोन्याचा भाव गेले काही दिवस चढाच राहीला आहे. भारतीय सराफ बाजारात ( सोमवारी 20 मार्च, 2023 ) सोने आणि चांदी यांच्या किंमतीत वाढच झालेली दिसत आहे. सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅमसाठी 59 हजार रूपयांच्या पुढे गेली आहे. तर चांदीचा भाव प्रति किलो 68 हजारापेक्षा अधिक झाला आहे. शुद्ध 24 कॅरेट 10 ग्रॅमचा सोन्याचा भाव 59671 रुपये झाला आहे. तर शुद्ध चांदीचा भाव प्रति किलोमागे 68250 रुपये झाला आहे. आता तर मिस्ड कॉलवर सोन्याचा भाव कळत आहे.
इंडीयन बुलियन अॅण्ड ज्वेलर्स असोसिएशनच्या ( Indian Bullion Jewelers Association ) मते राष्ट्रीय पातळीवर शुक्रवारी सायंकाळी २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅमसाठी 58220 रुपये इतका होता. तो सोमवारी सकाळी आणखीनच महाग होत 59671 रुपयांवर पोहचला आहे. अशा पद्धतीने शुद्धतेवर आधारीत सोने आणि चांदीच्या भावात वाढ झाली आहे. त्यामुळे सोने आणि चांदीत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी चांगली संधी चालून आली आहे.
सोने आणि चांदीच्या भाव दर्शविणाऱ्या अधिकृत वेबसाइट ibjarates.com च्या मते आज सकाळी 995 शुद्ध सोन्याचा भाव दहा ग्रॅम म्हणजे एक तोळ्याचा भाव वाढून 59,432 वर पोहचला आहे. तर 916 शुद्धतेचे सोने आज 54,659 झाले आहे. याशिवाय 750 शुद्धतेचे सोन्याची किंमत 44,753 वर पोहचली आहे, तर 585 शुद्धतेवाले सोने आज महाग होत 34,908 रूपये झाले आहे. याशिवाय 999 शुद्धतेची एक किलो चांदीचा भाव आज 68,250 झाला आहे.
ibja मार्फत केंद्र सरकारने घोषीत केलेल्या सुट्या शिवाय शनिवार आणि रविवारी सोने-चांदीचे भाव जाहीर केले जात नाहीत. 22 कॅरेट आणि 18 कॅरेट गोल्ड ज्वेलरी किरकोळ दर जाणण्यासाठी 8955664433 वर मिस्ड कॉल देऊन माहिती घेऊ शकता. त्यामुळे तुमच्या मोबाईलवर ‘एसएमएस’वर सोने-चांदी दराची लागलीच माहिती मिळू शकते. याशिवाय अपडेट जाणण्यासाठी तुम्ही www.ibja.co किंवा ibjarates.com वर देखील माहिती मिळू शकते.
इंडीयन बुलियन ज्वेलर्स एसोसिशनच्यावतीने ( Indian Bullion Jewelers Association ) वेगवेगळ्या शुद्धतेनूसार सोन्याच्या स्टॅंडर्ड भावाची माहिती मिळत असते. सोन्याचा हा दर टॅक्स आणि मेकींग चार्ज पूर्वीचा असतो. ibja द्वारा जारी केलेले सोन्याचे भाव देशभर सर्वमान्य आहेत. परंतू त्यात जीएसएसटीचा अंतर्भाव केलेला नसतो. दागिने प्रत्यक्षात विकत घेतना सोने आणि चांदीचा दर त्यामुळे जरा जास्त असतो.
अर्थव्यवस्थेवर जेव्हा जेव्हा संकट येते तेव्हा लोकं सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीवर अधिक भर देतात. FEDने 2022मध्ये व्याजदर वाढवल्यामुळं त्याचा परिणाम अमेरिकेतील बँकिंग क्षेत्रावर झाला आहे. त्यामुळं मोठे संकट ओढावलं आहे. सोने हा सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे हे जगभरात सिद्ध झाले आहे. सोने हा गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम व कोणतीही जोखीम नसलेला मार्ग आहे. बँका कर्जबाजारी किंवा दिवाळखोरीत जाऊ शकतात पण सोन्याच्या बाबतीत असं होऊ शकत नाही. या टप्प्यावर ही सर्वात आकर्षक गोष्ट आहे. किंमती वाढल्यामुळं सोन्याची मागणी काही प्रमाणात घटली आहे. परंतु ज्यांना सोन्याची खरेदी करायची आहे, त्यांना चांगली संधी आहे. नाणे, बार, दागिने या स्वरुपात ग्राहक सोने खरेदी करु शकतात, असं रिद्धीसिद्धी बुलियन्स लिमिटेडचे एमडी सीईओ पृथ्वीराज कोठारी यांना सांगितलं.