आता प्रत्येक घोट स़ोन्याचा! 24 कॅरेट सोन्यापासून तयार चहा पिऊन तर पहा एका किलोसाठी मोजावे लागतील अडीच लाख
आसाममधील मास्टर टी बनवणाऱ्या बरुआ यांनी हा खास सुवर्णमय चहा तयार केला आहे. चहाच्या क्षेत्रात त्याचं चांगलं नाव आहे. युरोपमध्ये ज्यादा दराने चहा विकून ते प्रकाशझोतात आले आहेत. आसामच्या या दुर्मिळ काळ्या चहामध्ये मध, गूळ आणि कोको असतो.
‘शौक बडी चीज है’ म्हणतात, असाच एक महागडा…शौक सध्या ट्रेंड करतं आहे. चहा पिणाऱ्या शौकिनांसाठी (Tea Lover) एक आनंदाची बातमी आहे. आता ते 24 कॅरेट सोन्यापासून (24 Carat Gold) बनवलेला चहा पिऊ शकतात. त्यासाठी त्यांना थोडा खिसा मात्र हलका करावा लागेल. आसाममधील व्यापारी (Assam entrepreneur) रणजित बरुआ यांनी 24 कॅरेट सोन्यापासून बनवलेला चहा बाजारात आणला असून त्याची किंमत थोडी थोडकी नव्हे तर तब्बल 2.5 लाख रुपये प्रति किलो आहे. या चहाच्या फक्त एका घोटानेच तुम्हाला पूर्णपणे वेगळं काहीतरी अनुभवता येईल. गोल्डन ड्रिंक्स ‘स्वर्ण पनम’ असे या चहाचे नाही. उत्पादकांने या चहाच्या संपूर्ण शुद्धतेचे आश्वासन दिले आहे. हे चहाचे मिश्रण खास पद्धतीने तयार करण्यात आले आहे, त्यात 24 कॅरेट खाण्यायोग्य सोन्याच्या बारीक पाकळ्या आणि मधासोबत आसामचा काळा चहा, जो चहाच्या क्लोनच्या उत्तम कोवळ्या पानांपासून बनवलेला आहे, यांचा समावेश आहे.
बरुआ आसामचे मास्टर टी मेकर
आसाममधील मास्टर टी बनवणाऱ्या बरुआ यांनी हा खास चहा तयार केला आहे. चहाच्या क्षेत्रात त्याचं चांगलं नाव आहे. युरोपमध्ये ज्यादा दराने चहा विकून ते प्रकाशझोतात आले आहेत. आसामच्या या दुर्मिळ काळ्या चहामध्ये मध, गूळ आणि कोको यांचे सत्व आहे. हा उत्कृष्ट चहा चहाच्या कोवळ्या पानांनी तयार केला जातो. दुर्मिळ चहा पत्ती आणि पिण्यायोग्य मौल्यवान सोन्यापासून स्वर्ण पनम तयार केले जाते. हा चहा नक्कीच सर्वांना नक्कीच भुरळ घालेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
100 ग्रॅमसाठी मोजा 25 हजार रुपये
हा स्वर्ण पनम हा 24 कॅरेट सोन्याचा भारतातील एकमेव सोनेरी चहा आहे. बरुआची चहा स्टार्ट अप कंपनी अरोमाइका टीने 21 मे रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिनी हे अनोखे उत्पादन बाजारात दाखल केले आहे. गोल्डन पॅनम चहा 100 ग्रॅम पांढऱ्या रंगाच्या सिरॅमिक बरणीमध्ये येतो, जो काळ्या बॉक्समध्ये कांस्य चमच्याने भरलेला असतो. बॉक्सची किंमत 25 हजार रुपये आहे. म्हणजेच 100 ग्रॅमचे पाउच 25 हजार रुपयांना विकते. प्रति किलोबद्दल म्हटले तर त्याची किंमत अडीच लाख रुपये इतकी आहे.
24 कॅरेटवाला चहा आवडेल
अरोमाइका टीचे डायरेक्टर रंजीत बरुआ म्हणाले- एक कप चहा तुम्हाला चांगली चव देऊन तजेला देईल आणि पिण्यायोग्य 24 कॅरेट सोनं तुम्हाला एक समृद्ध अनुभव देईल. चहाची चव आणि दर्जा खूप चांगला आहे आणि यामुळे तुम्हाला नक्कीच एक तजेलदार अनुभव येईल. आम्हाला आशा आहे की लोकांना हा चहा नक्की आवडेल.
“आम्ही फ्रान्समधून पिण्यायोग्य सोन्याच्या पाकळ्या मागवल्या आहेत आणि या ब्रँडसाठी उच्च-गुणवत्तेचा पारंपारिक चहा तयार केला आहे. चहा आणि सोन्याची आवड असलेल्या ग्राहक हे आमचे उद्दिष्ट आहे. उत्पादन सुरू होण्यापूर्वीच आम्हाला 12 ऑर्डर्स मिळाल्या होत्या, ज्यामुळे आम्हाला खूप प्रोत्साहन मिळालं. आम्ही लवकरच त्याची निर्यात सुरू करू.’ असं बरुआ यांनी स्पष्ट केले आहे.
बरुआ, ज्याने झेलेन्स्कीच्या नावाने चहा देखील सुरू केला
रणजित बरुआ यांनी व्यापारी होण्यापूर्वी सुमारे दोन दशके चहा क्षेत्रात काम केले आहे. अरोमनिका चहामध्ये सध्या चहाचे 47 पेक्षा जास्त प्रकार आहेत. रणजित बरुआ यांनी अलीकडेच युक्रेनचे अध्यक्ष व्हॅलोडीमिर झेलेन्स्की यांच्या नावाने सीटीसी चहा सुरू केला तेव्हा ते चर्चेत आले. रशियन हल्ल्याविरुद्ध झेलेन्स्कीच्या शौर्याचा आणि धैर्याचा सन्मान करत त्यांनी त्यांच्या नावाने चहाचा शुभारंभ केला होता. त्यात रशियन आक्रमण आणि चहा बियांच्या पाकिटात एका रोपाला पॅक करण्यात आले होते. यामध्ये जैवविविधता आणि हवामान बदलांना संबोधित करणे हे त्यांचे उद्दीष्ट आहे. (यासंदर्भात आजतकने सविस्तर रिपोर्ट दिला आहे)