Retirement Planning: कोणत्या वयात करावे निवृत्तीचे नियोजन, कुठे आणि कशी करावी गुंतवणूक
जर तुम्ही योग्य वेळी सेवानिवृत्तीचे नियोजन सुरू केले तर वृद्धापकाळातील सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही सहज निधी गोळा करू शकता. निवृत्तीचे वय किती असावे हे तुम्ही ठरवू शकता. तुमच्या मनानुसार नियोजन करुन तुम्ही गुंतवणूक आणि बचत करु शकता.
मुंबई : पहिल्या पगारापासून भविष्याची व्यवस्था करुन ठेवली पाहिजे असं सांगितले जाते. परंतु असे फार कमी लोकं करतात. वयाच्या 30 व्या वर्षी निवृत्तीचे नियोजन असेल पाहिजे. तरुण वयातच बचतीचा मार्ग स्वीकारला पाहिजे. मुलांचे शिक्षण, वैद्यकीय खर्च इत्यादींचे नियोजन केले पाहिजे. आताच एकूण वार्षिक उत्पन्नाच्या 30 पट रक्कम सेविंग करावी.
जर तुम्ही वयाच्या 25 ते 30 च्या दरम्यान सेवानिवृत्तीचे नियोजन सुरू केले तर वृद्धापकाळातील सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही सहजपणे निधी गोळा करू शकता. तुम्ही जितक्या उशिरा योजना कराल तितक्या आक्रमकपणे तुम्हाला गुंतवणूक करावी लागेल. अशा परिस्थितीत तुमच्या खिशावर आणखी बोजा पडेल. निवृत्तीसाठी निधी जमा करण्यासाठी तुम्ही कोणती गुंतवणूक धोरण अवलंबले पाहिजे हे जाणून घ्या.
प्रथम ध्येय सेट करा
सेवानिवृत्तीसाठी किती पैसे जोडायचे आहेत याचे ध्येय निश्चित करावे लागेल. यानंतर तुमची गुंतवणूक झपाट्याने वाढवण्यासाठी तुम्ही किती जोखीम पत्करू शकता हे ठरवावे लागेल. तुम्ही जोखीम घेण्याच्या स्थितीत असाल, तर उच्च परतावा असलेल्या गोष्टींना लक्ष्य करा. यामध्ये पैसे गमावण्याचा धोका देखील आहे. त्यामुळे तुमची गुंतवणूक एकाच ठिकाणी न करता वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवा. तुम्ही रिअल इस्टेटमध्येही गुंतवणूक करू शकता, भविष्यात तुमच्यासाठी हा एक चांगला सौदा ठरू शकतो.
गुंतवणुकीची रक्कम हळूहळू वाढवा
तुमचे उत्पन्न हे वाढत राहणार आहे. अशा स्थितीत वयाच्या 20-30 व्या वर्षी तुम्ही तुमच्या उत्पन्नातील 20 टक्के रक्कम निवृत्तीसाठी वाचवा आणि ती गुंतवायला सुरुवात करा. 30 ते 40 वर्षे वयोगटातील 30% आणि 40 ते 50 वर्षे वयोगटातील 40% किंवा तुमच्या उत्पन्न आणि बचतीला अनुकूल असलेली जास्तीत जास्त रक्कम गुंतवा. पण वेळेनुसार तुमच्या गुंतवणुकीची रक्कमही वाढवा. यामुळे तुमची संपत्ती निर्माण जलद होईल.
गुंतवणुकीवर देखरेख ठेवा
तुमच्या गुंतवणुकीवर वेळोवेळी लक्ष ठेवा. मॉनिटरिंगचा फायदा असा आहे की कोणती मालमत्ता तुम्हाला चांगला परतावा देत आहे आणि कोणती दीर्घकाळ चांगला परतावा देत नाही याची तुम्हाला कल्पना येईल. अशा परिस्थितीत तुम्ही पैसे काढून चुकीच्या गुंतवणुकीच्या पर्यायातून बाहेर पडू शकता आणि ती रक्कम इतर कोणत्यातरी योजनेत गुंतवू शकता.