खात्यातून पैसे कट झाले, पण हातात मिळाले नाही, सर्वात अगोदर ‘हे’ काम करा
एटीएममधील बिघाड किंवा इतर कारणांमुळे दररोज असे प्रकार होतात आणि मोठा व्यवहार असेल तर मनात भीती निर्माण होते. त्यातली त्यात रविवारचा दिवस असेल तर बँकेत जाऊनही चौकशी करता येत नाही. पण अशा वेळी शांतपणे विचार करुन नियम माहित करुण घेणं गरजेचं आहे.
ATM transaction failed but money deducted : एटीएमचा व्यवहार (ATM transaction) करताना अनेकदा खात्यातून पैसे वजा (Money deducted) झाल्याचा मेसेज येतो, पण हातात पैसे पडलेले नसतात. एटीएममधील बिघाड किंवा इतर कारणांमुळे दररोज असे प्रकार होतात आणि मोठा व्यवहार असेल तर मनात भीती निर्माण होते. त्यातली त्यात रविवारचा दिवस असेल तर बँकेत जाऊनही चौकशी करता येत नाही. पण अशा वेळी शांतपणे विचार करुन नियम माहित करुण घेणं गरजेचं आहे. कारण, तुमचे पैसे कुठेही जाऊ शकत नाहीत. यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नियमही (RBI rules about ATM transaction) माहित असणं गरजेचं आहे.
रिझर्व्ह बँकेचा नियम काय सांगतो?
एटीएम व्यवहार ((ATM transaction) ) करणाऱ्या ग्राहकांना सर्वात अगोदर आरबीआयचा नियम माहित असणं गरजेचं आहे. एटीएममधून पैसे काढताना, पैसे वजा झाल्याचा मेसेज आला, पण पैसे तुमच्या हातात आले नसतील, तर पैसे निश्चितपणे मिळतील. पण यासाठी काही अटीही आहेत, ज्या लक्षात न ठेवल्यास तुम्ही पैसे गमावू शकता.
एटीएममधून पैसे वजा झाल्याचा मेसेज आला, पण हातात पैसे आले नसतील तर तुम्ही सर्वात अगोदर तुमच्या बँकेशी संपर्क साधा. बँकेला सुट्टी असेल, तर कस्टमर केअरला फोन लावून माहिती देता येईल. प्रत्येक बँकेच्या कस्टमर केअरचा नंबर इंटरनेटवरही सहजपणे मिळू शकेल.
ट्रान्झॅक्शन फेल का झालं याचं कारण तर तुम्हाला सांगितलं जाईलच, पण तुमचे पैसेही परत मिळतील. पैसे परत मिळण्यासाठी साधारणपणे एक आठवड्याचा वेळ लागतो. अनेक बँकांचे पैसे त्याअगोदरही मिळतात. ट्रान्झॅक्शन फेल झाल्याची स्लीप मिळते, जी तुम्हाला पैसे परत मिळेपर्यंत सांभाळून ठेवावी लागेल. काही एटीएममधून स्लीप येत नाही. अशा वेळी बँक स्टेटमेंट काढून ते बँकेला देता येईल.
ट्रान्झॅक्शन फेल झाल्यानंतर अनेकदा तारांबळ उडते. पण तारांबळ होऊ न देता किमान 24 तास वाट पाहणं गरजेचं असतं. 24 तासांनंतरही पैसे न मिळाल्यास बँकेला लेखी तक्रार देण्याचाही मार्ग आहे. तक्रार केल्यानंतरही एका आठवड्याच्या आत तुमचे पैसे येत नसतील तर दररोज 100 रुपये या प्रमाणे तुम्हाला दंड स्वरुपात बँकेकडून पैसे मिळतील.