Khan Sir Success Story | एका मुलापासून सुरुवात, आज लाखोंचे विद्यापीठ, अशी होते खान सरांची कमाई

Khan Sir Success Story | देशातील विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय खान सरांचा प्रवास काही साधा नव्हता. त्यांना संघर्ष करावा लागला. त्यांनी अगोदर स्वतःला घडवले आणि आज अनेक जण त्यांच्या तालमीत अस्सल सोनं म्हणून बाहेर पडत आहेत. त्यांची यशोगाथा सर्वांनाच प्रेरणादायी आहे. एका मुलाच्या घरी जाऊन शिकवण्यापासून या मोठ्या प्रवासाची सुरुवात झाली आहे.

Khan Sir Success Story | एका मुलापासून सुरुवात, आज लाखोंचे विद्यापीठ, अशी होते खान सरांची कमाई
Follow us
| Updated on: Oct 22, 2023 | 10:42 AM

नवी दिल्ली | 22 ऑक्टोबर 2023 : प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना आज खान सर हेच प्रेरणा आहेत. या विद्यार्थ्यांना खान सर हे नाव जणू टॉनिकच आहे. सर्वच काही गेमिंगचे किडे नसतात. अनेक विद्यार्थी मोबाईलवर युट्यूबमधून करिअरची संधी साधतात. युट्यूबवरील खान सरांचे व्हिडिओ म्हणजे त्यांचा घरबसल्या होणारा अभ्यास आहे. याच माध्यमातून काही जणांनी यशाला गवसणी घातली आहे. पण खान सरांचा इथंपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. एका विद्यार्थ्याला घरी जाऊन शिकविण्याचा त्यांचा निर्णय आज अनेकांचे करिअर घडविणारा ठरला आहे.

यह सफर नही था आसान

आज खान सर लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. खान सर ओळखत नसलेल्या लाखो विद्यार्थ्यांचे ते आयकॉन आहेत. पण या प्रवासासाठी खान सरांना मोठा संघर्ष करावा लागला. त्यांच्या कोचिंगवर लाखो विद्यार्थी चांगल्या पदावर भरारी घेत आहे. पण खान सरांना कोणतीही मोठी परीक्षा उत्तीर्ण होता आली नाही. कदाचित विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठीच खान सरांच्या नशीबाला कलाटणी मिळेल नसेल ना?

हे सुद्धा वाचा

शिक्षणात नव्हते एकदम हुशार

खान सर यांचे आयुष्य हालाकीचं होतं. घरात गरिबी होती. शाळेत जाताना त्यांना अर्ध्या पेन्सिलवर समाधान मानावे लागले. पुस्तकांसाठी संघर्ष करावा लागला. ते शाळेत एकदम हुशार विद्यार्थी नव्हते. बीएससीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांचा मित्र हेमंत यांनी त्यांना कोचिंग सुरु करण्याची कल्पना सुचवली. जिद्द आणि चिकाटीने त्यांनी स्वतःला घडवले. त्यांची संघर्षगाथा, त्यांच्या युट्यूब चॅनलवर, त्यांच्याच तोंडून तुम्हाला ऐकता येईल.

एका मुलाची शिकवणी

खान सरांनी एका मुलाच्या घरी जाऊन, त्याला शिकविण्याचे काम सुरु केले. तो मुलगा शाळेत सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण झाला. शिक्षणात फारशी प्रगती नसणारा मुलगा टॉप आल्याने खान सरांकडे विद्यार्थ्यांची गर्दी वाढली. त्यांच्यामुळे मुलांना शिक्षणात गोडी निर्माण झाली. हळूहळू त्यांना प्रसिद्ध मिळत गेली.

बॉम्ब हल्ला झाला

पुढे त्यांनी कोचिंग सेंटर उघडले. या शिकवणीला उंदड प्रतिसाद मिळाला. जुन्या मित्रांच्या मदतीने त्यांनी चांगली सुरुवात केली. युपीएससी, बिहारमधील स्पर्धा परीक्षा, इतर स्पर्धा परीक्षांसाठी त्यांनी कोचिंगला सुरुवात केली. त्यावेळी अनेक गरीब, मध्यमवर्गातील विद्यार्थ्यांकडे फीसाठी पैसे नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी अत्यंत कमी शुल्क आकारले. त्यामुळे या क्षेत्रातील अनेकांना फटका बसला. त्यांनी त्यांच्या सेंटरजवळ बॉम्ब फेकला. कोचिंगवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. पण विद्यार्थ्यांनी त्यांना साथ दिली.

युट्यूबमाध्यमातून लाखोंची कमाई

कोरोना काळात त्यांनी युट्यूबवर धडक दिली. त्यांनी Khan GS Research Centre नावाने अधिकृत युट्यूब चॅनल सुरु केले. आज त्यांचे 2 कोटींहून अधिक सब्सक्राईबर आहेत. मीडिया रिपोर्टनुसार प्रत्येक महिन्याला युट्यूबच्या माध्यमातून ते 10-12 लाख रुपयांची कमाई करतात. त्यांची एकूण संपत्ती जवळपास 5 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येते.

देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.