अनिल अंबानींना मोठा दिलासा; ‘या’ कंपनीच्या विक्रीमुळे कर्जाचा बोझा कमी होणार

रिलायन्स समूहातील Reliance Home Finance ही दिवाळखोरीत निघालेली कंपनी विकत घेण्यासाठी एथॅम इन्व्हेस्टमेंट अँण्ड इन्फ्रास्ट्रक्टर लिमिटेडने (Authum Investment and Infrastructure) तयारी दर्शविली आहे.

अनिल अंबानींना मोठा दिलासा; 'या' कंपनीच्या विक्रीमुळे कर्जाचा बोझा कमी होणार
अनिल अंबानी
Follow us
| Updated on: Jun 21, 2021 | 7:25 AM

मुंबई: कर्जाच्या प्रचंड बोझ्यामुळे आर्थिक संकटात सापडलेले उद्योगपती अनिल अंबानी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. रिलायन्स समूहातील Reliance Home Finance ही दिवाळखोरीत निघालेली कंपनी विकत घेण्यासाठी एथॅम इन्व्हेस्टमेंट अँण्ड इन्फ्रास्ट्रक्टर लिमिटेडने (Authum Investment and Infrastructure) तयारी दर्शविली आहे. हा व्यवहार अंतिम टप्प्यात असून रिलायन्स होम फायनान्ससाठी एथॅम इन्व्हेस्टमेंट तब्बल 2900 कोटी रुपये मोजणार आहे. (Authum Investment and Infrastructure selected for bidder reliance home finance will reduce reliance capital debt by 25 percent)

अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहावर बँकांचे हजारो कोटींचे कर्ज आहे. त्यामुळे हा व्यवहार पार पडल्यास बँक ऑफ बडोदाच्या नेतृत्वाखालील बँकांच्या समूहाला 2,587 कोटी रुपये मिळतील. सूत्रांच्या माहितीनुसार, एथॅम इन्व्हेस्टमेंट अँण्ड इन्फ्रास्ट्रक्टर लिमिटेड सुरुवातीला 90 टक्के म्हणजे 2,587 कोटी रुपये जमा करेल. त्यानंतर उर्वरित 300 कोटींची रक्कम वर्षभरात टप्प्याटप्याने जमा केली जाईल. या व्यवहारामुळे रिलायन्स समूहावरील कर्जाचा बोझा 11200 कोटी रुपयांनी कमी होणार आहे. तर रिलायन्स कॅपिटलची हिस्सेदारी 25 टक्क्यांनी कमी होणार आहे.

रिलायन्स होम फायनान्सच्या लिलाव प्रक्रियेला 31 मे रोजी सुरुवात झाली होती. येत्या 19 जूनला ही प्रक्रिया संपुष्टात येत आहे. बँकांच्या समूहाकडून ही लिलाव प्रक्रिया राबवण्यात आली होती. अनेक बड्या कंपन्यांनी रिलायन्स होम फायनान्स विकत घेण्यासाठी बोली लावली होती. एथॅम इन्व्हेस्टमेंट अँण्ड इन्फ्रास्ट्रक्टर लिमिटेड ही बिगरबँकिंग वित्तीय संस्था आहे. गेल्या 15 वर्षापासून ही कंपनी या क्षेत्रात कार्यरत आहे. या कंपनीचे नेटवर्थ 1500 कोटींच्या आसपास आहे.

इतर बातम्या:

रिलायन्स इन्फ्रावरील कर्जाचा बोजा कमी होणार, रिलायन्स पॉवर 1325 कोटींचे शेअर्स, वॉरंट जारी करणार

शेअर बाजार नियमकांची मोठी कारवाई; अदानी ग्रूपच्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव कोसळले

अंबानी VS अदानी : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या तुलनेत 2 महिन्यांच्या कालावधीत अदानी एंटरप्रायजेसचा शेअर्स 6 पट वाढला, गुंतवणूकदार झाले श्रीमंत

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.