Patanjali : पतंजली केवळ ब्रँड नाही, तर भारतीय संस्कृतीचा दूत
Patanjali an ambassador of Indian culture : योगगुरू बाबा रामेदव आणि आचार्य बालकृष्ण यांच्या पतंजलीने भारतीय संस्कृती आणि परंपरांचे पुनरुज्जीवन केलेच नाही तर जागतिक स्तरावर नव्याने ओळख करून दिली. जण हा ब्रँड भारतीय संस्कृतीचा राजदूत ठरला.

पतंजली केवळ एक ब्रँड नाही, तर एक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक आंदोलन पण आहे. त्याने जगभरातील कोट्यवधि लोकांचे आरोग्य निरोगी बनवले. त्यांना तंदुरुस्त करण्यासाठी मोठे पाऊल टाकले. योगगुरू बाबा रामेदव आणि आचार्य बालकृष्ण यांच्या पतंजलीने भारतीय संस्कृती आणि परंपरांचे पुनरुज्जीवन केलेच नाही तर जागतिक स्तरावर नव्याने ओळख करून दिली. हा ब्रँड खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृतीचा राजदूत ठरला.
अनेक जागतिक ब्रँड्स हे केवळ नफ्या-तोट्यावर अवलंबून असतात. त्यांचे मुख्य ध्येय नफा कमावणे हेच आहे. तर पतंजलीने एक पाऊल पुढे जात भारतीय आध्यात्मिक आणि सांस्कृतिक मुल्यांवर जोर दिला. पतंजली आत्मनिर्भरतेवर लक्ष केंद्रीत केले. पश्चिमी ग्राहकांमध्ये भारतीय पारंपारिक ज्ञान वृद्धिंगत करण्यावर पतंजलीने मोठी भूमिका निभावली.
पतंजलीचे आध्यात्मिक मिशन




रामदेव बाबा यांच्या नेतृत्वात पतंजली योगपीठाने योग, आयुर्वेद आणि नैसर्गिक, परंपरागत उपचार पद्धती जनमाणसात रूजवण्याचे काम केले. योगाच्या माध्यमातून शरीर आणि मनाला स्वस्थ करण्याचे परंपरेला विज्ञानाची जोड दिली. त्यामुळे जगभरातील लोक प्रभावितच नाही तर लाभार्थी झाले. पतंजली योग शिबिर आणि टीव्ही कार्यक्रमातून जगभरातील लोकांना संतुलित जीवनाचा मूलमंत्र दिला, जगण्याची प्रेरणा दिली.
सांस्कृतिक वारसा जपला
मागील काही दशकांमध्ये पाश्चिमात्य जीवनशैलीच्या प्रभाव भारतीयांवर पडला. भारताच्या पारंपरिक चिकित्सा पद्धती आणि आरोग्यविषयक उपचार या काळात मागे पडले. पण पतंजलीने आयुर्वेद, योग आणि नैसर्गिक उपचार पद्धतींना पुन्हा लोकप्रियता मिळवून दिली. त्यांनी भारताचा हा सांस्कृतिक वारसा जपला. आयुर्वेदिक औषधे, हर्बल उत्पादने आणि नैसर्गिक जीवनशैलीला प्रोत्साहन देऊन पतंजलीने भारतीय संस्कृतीच्या मुळांना अधिक बळकट केले.
आधुनिक आरोग्यासह जीवनशैलीवर मोठा प्रभाव
रामदेव बाबांनी केवळ योग आणि आयुर्वेदाचा प्रचार-प्रसारच केला असे नाही, तर जगभरात आरोग्य आणि नैसर्गिक जीवनशैली बळकट करण्याचे काम केले. त्यांच्या शिकवणी केवळ शारीरिक आरोग्यासाठी फायदेशीर नाहीत, तर मानसिक शांतता आणि आध्यात्मिक उन्नतीचा मार्गही प्रशस्त केला.
त्यांच्या सकाळ, संध्याकाळच्या योग सत्रांमध्ये हजारो लोक सहभागी होतात. यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि इतर अनेक आजारांवर सकारात्मक परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. स्वाभाविक आणि संतुलित जीवनशैलीला चालना देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे आधुनिक आरोग्य प्रणाली प्रभावित झाली आहे. पतंजलीची उत्पादनं आता जगभरातील 20 हून अधिक देशांमध्ये रुग्णांना व्याधींपासून मुक्ततेसाठी मदत करत आहेत.