बजाज फिनसर्वकडून गृहकर्जाचे व्याजदर कमी, 645 रुपये किंवा लाखांच्या EMI वर 5 कोटींचे कर्ज

विद्यमान गृहकर्जाचे ग्राहक बजाज फिनसर्वमध्ये त्यांचे गृहकर्ज हस्तांतरित करून या नवीन व्याजदराचा लाभ घेऊ शकतात. ते केवळ व्याजावर बचत करत नाहीत, तर त्यांच्याकडे टॉप-अप कर्ज घेण्याचा पर्याय देखील आहे. गृहकर्जाची शिल्लक हस्तांतरण प्रक्रिया जलद, त्रासमुक्त आणि किमान कागदपत्रांसह पूर्ण होईल.

बजाज फिनसर्वकडून गृहकर्जाचे व्याजदर कमी, 645 रुपये किंवा लाखांच्या EMI वर 5 कोटींचे कर्ज
Follow us
| Updated on: Oct 12, 2021 | 4:17 PM

नवी दिल्लीः घर खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बजाज फिनसर्व लिमिटेड या नॉन-बँकिंग फायनान्स कंपनीने (एनबीएफसी) आपल्या गृहकर्जाच्या व्याजदरात कपात केलीय. बजाज फिनसर्वने गृहकर्जाच्या व्याजदरात 0.05 टक्के कपात केली. पगारदार आणि व्यावसायिक अर्जदारांसाठी व्याजदर आता 6.70 टक्क्यांपासून सुरू होईल, जो पूर्वी 6.75 टक्के होता. बजाज फिनसर्वने एका निवेदनात म्हटले आहे की, मजबूत क्रेडिट आणि इन्कम प्रोफाईल असलेल्या अर्जदारांना या प्रमोशनल दराने कर्ज घेण्याची चांगली संधी आहे. गृहकर्जाचा EMI किमान 645 रुपये प्रति लाख असेल.

या ऑफरचा लाभ कोणाला होणार

विद्यमान गृहकर्जाचे ग्राहक बजाज फिनसर्वमध्ये त्यांचे गृहकर्ज हस्तांतरित करून या नवीन व्याजदराचा लाभ घेऊ शकतात. ते केवळ व्याजावर बचत करत नाहीत, तर त्यांच्याकडे टॉप-अप कर्ज घेण्याचा पर्याय देखील आहे. गृहकर्जाची शिल्लक हस्तांतरण प्रक्रिया जलद, त्रासमुक्त आणि किमान कागदपत्रांसह पूर्ण होईल. बजाज फिनसर्वने उत्सवाच्या ऑफरचा भाग म्हणून गृहकर्जाच्या व्याजदरात कपात केलीय. तुम्ही होम लोनसाठी वेबसाईटद्वारे किंवा भारतभरातील कोणत्याही NBFC शाखेद्वारे अर्ज करू शकता. अर्जदार ऑनलाईन प्रक्रियेद्वारे संपर्क-मुक्त कर्ज अर्जाचा लाभ घेऊ शकतात.

बजाज फिनसर्वची वैशिष्ट्ये

याअंतर्गत कर्जाची परतफेड 30 वर्षांपर्यंत करता येते. या अर्जाद्वारे 5 कोटी किंवा त्याहून अधिक रुपयांचे गृहकर्ज मिळू शकते. 1 कोटी रुपयांपर्यंत टॉप अप कर्ज मिळू शकते. व्याजदर बाह्य बेंचमार्क लिंक्ड लोन (रेपो रेट) वर आधारित आहे. PMAY योजनेच्या EWS आणि LIG श्रेणीअंतर्गत व्याज सबसिडी मिळवू शकतील. तुमच्या गरजेनुसार परतफेडीचा पर्याय उपलब्ध होईल. दस्तऐवज संकलन, मंजुरी आणि पडताळणी, 48 तासांच्या आत कर्जाचे वितरण, शून्य भाग-प्रीपेमेंट आणि अकाली बंद होण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.

संबंधित बातम्या

पेन्शनर्ससाठी वाढवली सुविधा, आता ‘या’ 5 मार्गांनी हयातीचा दाखला सादर करा

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! SBI ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी देतेय त्वरित कर्ज

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.