बँकेचा अलर्ट! तुमच्या खात्यातून 12 रुपये कापले? तर जाणून घ्या असं का घडलं?
अशा स्थितीत स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटद्वारे ग्राहकांना स्पष्टीकरण दिलेय. ग्राहक या प्रकरणी आपली तक्रार कशी नोंदवू शकतात. तसेच बँकेकडून खात्यातून 12 रुपये का कापले जात आहेत आणि त्यामागील कारण काय आहे हे जाणून घ्या.
नवी दिल्लीः अनेकदा लोक खात्याती पैसे कापले गेल्याची बँकेत तक्रार करतात. कोणताही व्यवहार न करता हे पैसे कापले जात असल्याचंही ग्राहक सांगतात. परंतु पैसे कापण्यामागे एक कारण असते. अनेक जण ट्विटरद्वारे तक्रार करत आहेत की, त्यांच्या खात्यातून 12 रुपये कापले गेलेत आणि हे पैसे कापण्यापूर्वी ग्राहकाला बँकेने विचारले नाही. परंतु कोणत्याही कारणाशिवाय बँकेतून पैसे डेबिट होत नसल्याचीही माहिती मिळालीय.
बँकेकडून खात्यातून 12 रुपये का कापले जात आहेत?
अशा स्थितीत स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटद्वारे ग्राहकांना स्पष्टीकरण दिलेय. ग्राहक या प्रकरणी आपली तक्रार कशी नोंदवू शकतात. तसेच बँकेकडून खात्यातून 12 रुपये का कापले जात आहेत आणि त्यामागील कारण काय आहे हे जाणून घ्या.
12 रुपये का कापले जात आहेत?
ज्यांच्या खातेधारकांनी पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेत नोंदणी केली आहे, अशा खात्यांमधून 12 रुपये कापले जात आहेत. ही केंद्र सरकारची एक विमा योजना आहे, ज्यामध्ये लोकांना एका वर्षात 12 रुपये जमा केल्यावर अपघाती विमा दिला जात आहे आणि दरवर्षी त्याचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत ज्या लोकांनी यासाठी नोंदणी केली आहे, त्यांच्या खात्यातून पैसे स्वयं डेबिट केले जातील. यामुळे तुमच्या खात्यातून 12 रुपयेही कापले जाऊ शकतात. असे मानले जाते की, हे पैसे 25 मे ते 31 मेदरम्यान खात्यातून कापले जातात.
काही अडचण असल्यास तक्रार कशी करावी?
स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना सूचित केले आहे की, जर तुम्हाला काही समस्या आली तर तुम्ही तक्रार कशी करू शकता. बँक म्हणाली, ‘तुम्हाला विनंती आहे की तुमची तक्रार या लिंकवर नोंदवा. आपल्याला मदत करण्यात आम्हाला आनंद होईल. https://crcf.sbi.co.in/ccf/ category Existing Customer (MSME/Agri Loans/Other Grievances ) >>General Banking>>Operation of Accounts >> Disputed Debit Credits.
कारणाशिवाय पैसे कापले जात नाहीत
बँकेकडून कोणत्याही कारणाशिवाय पैसे तुमच्या खात्यातून पैसे डेबिट केले जात नाही. प्रत्येक व्यवहारामागे एक कारण असते, ज्यात काही शुल्क इत्यादींचा समावेश असू शकतो. परंतु प्रत्येक व्यवहारामागे काही ना काही आधार असतो. अशा परिस्थितीत जेव्हाही तुम्हाला असे वाटेल की तुमच्या खात्यातून पैसे कापले गेलेत आणि तुम्ही कोणताही व्यवहार केला नाही, तेव्हा सर्वप्रथम तुम्हाला हे कोणत्या कारणामुळे कापले गेले आहे हे माहीत असणे आवश्यक आहे.
संबंधित बातम्या
हवाई प्रवास आजपासून महागला, सरकारने देशांतर्गत उड्डाणांचे भाडे 13 टक्क्यांनी वाढवले
तुमच्याकडेही PF खाते असल्यास तासाभरात मिळतील 1 लाख, जाणून घ्या अर्ज कसा करावा?
Bank alert! 12 deducted from your account? So find out why this happened.