Bank ATM Rules | एटीएम ते मिनिमम बॅलन्स, बँकिंग नियम पूर्वपदावर, ‘हे’ दहा बदल

कोविड19 च्या पार्श्वभूमीवर एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांमध्ये एटीएममधून पैसे काढताना सरकारकडून अनिर्बंध सवलत दिली होती.

Bank ATM Rules | एटीएम ते मिनिमम बॅलन्स, बँकिंग नियम पूर्वपदावर, 'हे' दहा बदल
Follow us
| Updated on: Jul 01, 2020 | 11:21 AM

मुंबई : बँकिंग सेवा, नियम आणि शुल्कांमध्ये आजपासून (1 जुलै) मोठे बदल करण्यात आले आहे. याचा थेट परिणाम ग्राहकांवर होणार आहे. बँक खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवणे बंधनकारक असून एटीएम व्यवहारांसाठी मिळालेली सूटही आता संपलेली आहे. (Bank ATM withdrawal minimum balance relaxations expire rules change from July 1)

1. बँक ठेवींवर व्याजदर कपात : बँक खातेधारकांना ठेवींवरील व्याजदरात घट करण्यात आली आहे. बँकेच्या बचत खात्यावर जास्तीत जास्त 3.25% व्याजदर असेल.

2. एटीएम व्यवहार शुल्क : एटीएममधून विनाशुल्क पैसे काढण्याबाबत दिलेली सूट आणि सवलत संपुष्टात आली आहे. कोविड19 च्या पार्श्वभूमीवर एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांमध्ये एटीएममधून पैसे काढताना सरकारकडून निर्बंध लावण्यात आले नव्हते. मात्र याला मुदतवाढ देण्याची घोषणा न झाल्याने ही सवलत संपल्याचे मानले जाते.

किती एटीएम व्यवहारांवर सूट द्यायची आणि त्यानंतर किती शुल्क आकारायचे, याबाबत प्रत्येक बँकेचे नियम वेगवेगळे असल्याने ग्राहकांनी आपल्या बँकेकडून याची माहिती आणि नियम तपासणे सोयीचे ठरेल.

3. बचत खाते मिनिमम बॅलन्स : बचत खात्यावरील मासिक किमान शिल्लक (मिनिमम बॅलन्स) आवश्यकता पुन्हा सक्रिय होईल. आपण ग्राहक म्हणून बँकेच्या बचत खात्यात मिनिमम बॅलन्स राखण्यास अपयशी ठरल्यास ‘बँक ऑफ बडोदा’ आपले खाते गोठवू शकते. विशेष म्हणजे ‘विजया बँक’ आणि ‘देना बँक’ यांचे ‘बँक ऑफ बडोदा’मध्ये विलीनीकरण करण्यात आले आहे. बचत खात्यावरील मासिक मिनिमम बॅलन्ससाठी मेट्रो शहरे (महानगर) शहर आणि ग्रामीण भागासाठी वेगवेगळे नियम आहेत.

4. खाते गोठवणे : बँकिंग सेवा सुरु ठेवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात ग्राहक अपयशी ठरल्यास बँक तुमचे खाते गोठवू (फ्रीझ) शकते

इतर बदल

5. पीएफमधून रक्कम काढण्याची मुदत संपली, कोरोना काळात सवलत होती 6. म्युचुअल फंडाच्या खरेदीवर स्टॅम्प ड्युटी लागणार 7. अटल पेन्शन योजनेत पुन्हा ऑटो डेबिट सुरु होणार 8. एलपीजी आणि हवाई इंधनाचे दर महिन्याच्या 1 तारखेस ठरणार 9. सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांची ऑनलाईन नोंदणी, कागदपत्रांची गरज नाही 10. किसान सन्मान निधीसाठीची नोंदणी संपली, शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये

(Bank ATM withdrawal minimum balance relaxations expire rules change from July 1)

Non Stop LIVE Update
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.