Bank Holidays in 2024 | पुढील वर्षात इतक्या दिवस राहतील बँका बंद, पाहा संपूर्ण यादी

Bank Holidays in 2024 | पुढील वर्षात बँकांच्या कामकाजाचे कॅलेंडर जाहीर झाले आहेत. प्रत्येक महिन्यातील दुसरा आणि चौथा शनिवार आणि रविवारी बँका बंद असतील. तर सणासुदीसह महत्वाच्या दिवशी बँका बंद असतील. पाच दिवस कामकाजाचा प्रस्ताव मंजूर झाल्यास बँकांना प्रत्येक आठवड्यात दोन दिवस सुट्या असतील.

Bank Holidays in 2024 | पुढील वर्षात इतक्या दिवस राहतील बँका बंद, पाहा संपूर्ण यादी
Follow us
| Updated on: Dec 23, 2023 | 3:02 PM

नवी दिल्ली | 23 डिसेंबर 2023 : वर्ष 2023 आता संपत आले आहे. काही दिवसातच नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. पुढील वर्षात, 2024 मध्ये शनिवार (दुसरा आणि चौथा), रविवारसह इतर अनेक दिवस बँका बंद असतील. भारतीय रिझर्व्ह बँकेने सणासुदीनुसार सुट्यांचे कॅलेंडर जाहीर केले आहे. राष्ट्रीय सणानिमित्त वर्षातील काही दिवस बँका बंद असतील. सुट्यांच्या दिवशी बँकांचे कामकाज होत नाही. बँकेशी संबंधित काही कामकाज असेल तर ते या सुट्यांच्या कॅलेंडर आधारे ते पूर्ण करता येईल. दैनंदिन व्यवहार तुम्हाला ऑनलाईन बँकेद्वारे पूर्ण करता येतील. जाणून घ्या वर्ष 2024 मध्ये बँका किती दिवस बंद राहातील.

वर्ष 2024 मध्ये इतक्या दिवस बंद राहातील बँका

  • 1 जानेवारी, 2024- संपूर्ण देशातील बँका राहातील बंद
  • 11 जानेवारी, 2024- मिझोरममध्ये बँका असतील बंद
  • 12 जानेवारी, 2024- स्वामी विवेकानंद जयंतीमुळे पश्चिम बंगालमध्ये बँका बंद
  • 13 जानेवारी, 2024- लोहडी, दुसरा शनिवारमुळे बँका बंद
  • 14 जानेवारी, 2024- मकर संक्रांती, रविवारमुळे देशातील बँका बंद
  • 15 जानेवारी, 2024- पोंगलमुळे तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमधील बँका बंद
  • 16 जानेवारी, 2024- टुसू पूजामुळे पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये बँक बंद
  • 17 जानेवारी, 2024- गुरु गोविंद सिंह जयंतीमुळे काही राज्यातील बँका बंद
  • 23 जानेवारी, 2024- नेताजी सुभाष चंद्र बोस जयंतीमुळे काही राज्यात बँकांना ताळे
  • 25 जानेवारी, 2024- हिमाचल प्रदेश राज्य दिवस, बँकेला सुट्टी
  • 26 जानेवारी, 2024- प्रजासत्ताक दिनामुळे कामकाज ठप्प
  • 31 जानेवारी, 2024- आसाममधील बँकांचे कामकाज बंद
  • 15 फेब्रुवारी, 2024- Lui-Ngai-Ni मुळे मणिपूरमधील बँकांना सुट्टी
  • 19 फेब्रुवारी, 2024- छत्रपती शिवाजी महाराज जयंतीमुळे महाराष्ट्रातील बँकांना सुट्टी
  • 8 मार्च, 2024- महाशिवरात्रीमुळे अनेक राज्यातील बँकांचे कामकाज बंद
  • 25 मार्च, 2024- होळीमुळे बँकांना सुट्टी
  • 29 मार्च, 2024- गुड फ्रायडेमुळे बँकांचे कामकाज बंद
  • 9 एप्रिल, 2024- उगादी/गुडी पडवा कर्नाटक, तेलंगाणा, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात बँका बंद
  • 10 एप्रिल, 2024- ईद-उल-फितरमुळे कामकाज होणार नाही
  • 17 एप्रिल, 2024- रामनवमीमुळे बँकांना सुट्टी
  • 1 मे, 2024- कामगार दिन, महाराष्ट्र दिनामुळे सुट्टी
  • 10 जून, 2024- श्री गुरु अर्जुन देवजी शहीद दिवसामुळे पंजाबमधील बँकांना सुट्टी
  • 15 जून, 2024- YMA मुळे मिझोरममधील बँका बंद
  • 6 जुलै, 2024- MHIP मुळे मिझोरममधील बँकांना सुट्टी
  • 17 जुलै, 2024- मोहरममुळे बँकांना सुट्टी
  • 31 जुलै, 2024- हरियाणा आणि पंजाबमध्ये बँकांना सुट्टी
  • 15 ऑगस्ट, 2024- स्वातंत्र्य दिनीमुळे देशभरातील बँका बंद
  • 19 ऑगस्ट, 2024- रक्षाबंधनामुळे बँकांचे कामकाज होणार नाही
  • 26 ऑगस्ट, 2024- जन्माष्टमीमुळे अनेक राज्यातील बँका बंद
  • 7 सप्टेंबर, 2024- गणेश चतुर्थीमुळे महाराष्ट्रातील बँकांना सुट्टी
  • 13 सप्टेंबर, 2024- रामदेव जयंती, तेजा दशमी राजस्थानमधील बँकांचे कामकाज नाही
  • 16 सप्टेंबर, 2024- ईद-ए-मिलादमुळे अनेक राज्यातील बँकांना सुट्टी
  • 17 सप्टेंबर, 2024- सिक्कीममध्ये बँका बंद
  • 18 सप्टेंबर, 2024- नारायण गुरु जयंतीमुळे केरळमध्ये बँकांना सुट्टी
  • 21 सप्टेंबर, 2024- केरळमधील बँकांना सुट्टी
  • 23 सप्टेंबर, 2024- हरियाणातील बँकांचे कामकाज बंद
  • 2 ऑक्टोबर, 2024- गांधी जयंतीमुळे बँकांचे कामकाज नाही
  • 10 ऑक्टोबर, 2024- महा सप्तमीमुळे अनेक राज्यातील कामकाज बंद
  • 11 ऑक्टोबर, 2024- महाअष्टमीमुळे बँकांना सुट्टी
  • 12 ऑक्टोबर, 2024-दसरामुळे बँकांचे कामकाज नाही
  • 31 ऑक्टोबर, 2024- सरदार वल्लभभाई पटेल जयंतीमुळे गुजरातमधील बँकांचे कामकाज नाही
  • 1 नोव्हेंबर, 2024- हरियाणा कर्नाटकातील बँकांना सुट्टी
  • 2 नोव्हेंबर, 2024- मणिपूरमधील बँकांना सुट्टी
  • 7 नोव्हेंबर, 2024- छठ पूजेमुळे बिहार आणि झारखंडमधील कामकाज बंद
  • 15 नोव्हेंबर, 2024- गुरु नानक जयंतीमुळे बँकांचे कामकाज नाही
  • 18 नोव्हेंबर, 2024- कर्नाटक राज्यात बँकांना सुट्टी
  • 25 डिसेंबर, 2024- नाताळमुळे बँकांन सुट्टी

ऑनलाईन बँकिंग सेवा सुरु

हे सुद्धा वाचा

सुट्टीच्या दिवशी ग्राहकांना बॅंकेच्या शाखेत जाऊन त्यांचे पैसे जमा करता येणार नाहीत किंवा शाखेतून पैसे काढता येणार नाहीत. परंतु एटीएममध्ये अशा सेवा उपलब्ध राहतील. ऑनलाईन बँकिंग सेवा, एटीएम आणि मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून व्यवहार करता येईल. क्रेडिट, डेबिट कार्ड आणि युपीआयचा वापर करुन ऑनलाईन पेमेंट करता येईल.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.