Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तर तुम्हालाही आताच बँकेशी संबंधित महत्त्वाची कामं उरकावी लागणार, जाणून घ्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी

जर तुम्हाला बँकेशी संबंधित कोणतेही काम नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करायचे असेल तर त्याआधी नोव्हेंबरमध्ये बँका किती दिवस बंद राहणार आहेत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. या सुट्ट्यांचा विचार करून तुम्ही तुमचे बँकेचे काम मार्गी लावण्याचे नियोजन करू शकता, जेणेकरून तुमचा एकही दिवस वाया जाणार नाही आणि काम वेळेत होऊ शकेल.

तर तुम्हालाही आताच बँकेशी संबंधित महत्त्वाची कामं उरकावी लागणार, जाणून घ्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी
bank holiday
Follow us
| Updated on: Oct 28, 2021 | 8:28 PM

नवी दिल्ली: Bank Holidays November 2021 : वर्ष संपायला फक्त 2 महिने शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत तुमच्याकडे अशी अनेक कामे असतील, जी नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे. कारण शेवटचा महिना असल्याने डिसेंबरमध्ये सर्वकाही पूर्ण आणि अंतिम होऊ लागते. त्यामुळे बहुतांश गोष्टी पूर्ण करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत वेळ देण्यात आलाय. जर तुम्हाला बँकेशी संबंधित कोणतेही काम नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करायचे असेल तर त्याआधी नोव्हेंबरमध्ये बँका किती दिवस बंद राहणार आहेत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. या सुट्ट्यांचा विचार करून तुम्ही तुमचे बँकेचे काम मार्गी लावण्याचे नियोजन करू शकता, जेणेकरून तुमचा एकही दिवस वाया जाणार नाही आणि काम वेळेत होऊ शकेल.

नोव्हेंबर 2021 मध्ये बँकांना किती सुट्ट्या?

खरं तर नोव्हेंबर महिन्यातच दिवाळी, भाईदूज, गुरुनानक जयंती असे अनेक सण येतात, जेव्हा बँका बंद असतात. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात बँका कोणत्या प्रसंगी बंद राहणार आहेत हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या कामाला सामोरे जाऊ शकता.

1 नोव्हेंबर – कन्नड राज्योत्सव आणि कूटमुळे बंगळुरू आणि इम्फाळमध्ये बँका बंद राहतील 3 नोव्हेंबर – नरक चतुर्दशीनिमित्त बंगळुरूमध्ये बँकेला सुट्टी असेल. 4 नोव्हेंबर – दिवाळी अमावस्या/काली पूजेमुळे बंगळुरूवगळता सर्व शहरातील बँका बंद राहतील. 5 नोव्हेंबर – दिवाळी / नवीन वर्ष / गोवर्धन पूजेमुळे अहमदाबाद, बेलापूर, बंगळुरू, डेहराडून, गंगटोक, जयपूर, कानपूर, लखनौ, मुंबई आणि नागपूर येथील बँका काम करणार नाहीत. 6 नोव्हेंबर – गंगटोक, इम्फाळ, कानपूर, लखनौ आणि शिमला येथे भाईदूज/चित्रगुप्त जयंती/लक्ष्मीपूजा/दीपावलीमुळे बँका बंद राहतील. 10 नोव्हेंबर – छठ पूजा/सूर्यषष्ठी/दला छठ निमित्त पाटणा आणि रांची येथे बँक सुट्टी असेल. 11 नोव्हेंबर- पाटणामध्ये छठपूजेमुळे बँका बंद राहणार आहेत 12 नोव्हेंबर- वंगला महोत्सवानिमित्त शिलाँगमध्ये बँक बंद राहणार आहे. 19 नोव्हेंबर – आयझॉल, बेलापूर, भोपाळ, चंदीगड, डेहराडून, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, दिल्ली, रायपूर, रांची, शिमला आणि श्रीनगर येथील बँका गुरुनानक जयंती/कार्तिक पौर्णिमेमुळे बंद राहतील. 22 नोव्हेंबर – कनकदास जयंतीनिमित्त बंगळुरूमध्ये बँका बंद राहतील 23 नोव्हेंबर- सेंग कुत्स्नामच्या निमित्ताने शिलाँगमध्ये बँका काम करणार नाहीत

नोव्हेंबर महिन्यात 17 दिवस बँका बंद राहणार

या निमित्ताने बँकांमधील कामकाज पूर्णपणे बंद राहणार आहे. मात्र याशिवाय शनिवार आणि रविवारीही बँकेत कामकाज होणार नाही. 13 नोव्हेंबरला महिन्याचा दुसरा शनिवार आणि 27 नोव्हेंबरला महिन्याचा चौथा शनिवार असतो. त्यामुळे सुट्टी असते. याशिवाय रविवारी बँका बंद राहणार आहेत. यामध्ये 7 नोव्हेंबर, 14 नोव्हेंबर, 21 नोव्हेंबर आणि 28 नोव्हेंबरचा समावेश आहे. त्यानुसार नोव्हेंबर महिन्यात एकूण 17 बँकांना सुट्ट्या आहेत.

संबंधित बातम्या

एका दिवसात सेन्सेक्स 1200 अंकांनी घसरला, बाजार 60 हजारांच्या खाली बंद

Gold Silver Rate Today : सोने पुन्हा एकदा महागले, चांदीचा भाव घसरला; पटापट तपासा ताजे दर

Bank Holidays November 2021 So you also have to deal with important tasks related to the bank know the complete list

पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक.
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या.
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट.
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया.
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन.
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक.
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल.
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.