या बँकेमध्ये खातं असेल तर हिरव्या रंगाकडे लक्ष असुद्या, नाहीतर होईल मोठं नुकसान
देशातील कोट्यावधी ग्राहकांसाठी बँकेकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे, ज्यामध्ये पासवर्डचे गणित लाल, पिवळे आणि हिरव्या रंगांद्वारे स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली : जर आपलेही बँक ऑफ बडोदामध्ये खाते असेल आणि डेबिट, एटीएम किंवा क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. देशातील कोट्यावधी ग्राहकांसाठी बँकेकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे, ज्यामध्ये पासवर्डचे गणित लाल, पिवळे आणि हिरव्या रंगांद्वारे स्पष्ट केले आहे. तसे, या बँकेच्या सर्व ग्राहकांना लक्षात ठेवले पाहिजे. याबद्दल जाणून घेऊयात महत्त्वाची माहिती. (bank of baroda customers before making password take care of green color know about it)
बँकेच्या लाल, पिवळ्या आणि हिरव्या रंगांचा अर्थ काय ?
बँक ऑफ बडोदाच्या या ग्रीन अलर्टचा अर्थ असा आहे की, तुमचा पासवर्ड स्ट्राँग आहे. पिवळा म्हणजे तुमच्या पासवर्डची सरासरी जास्त आहे. त्याच वेळी, लाल रंग म्हणजे पासवर्ड कमकुवत आहे. त्यामुळे बँकेचा पासवर्ड तयार करताना तुम्ही सगळ्या गोष्टींची काळजी घ्या.
हिरव्या रंगात पासवर्ड अधिक सुरक्षित
याशिवाय बँकेने ट्वीटमध्ये असेही लिहिले आहे की, ‘ग्रीनरी’ पासवर्ड असणं सुरक्षित आहे. हा रंग तुमचा पासवर्ड सुरक्षित आहे असं समजा. त्यामुळे तुम्हीही असाच प्रयत्न करा की तुमचा पासवर्ड हिरव्या रंगात असला पाहिजे.
बँकेने नुकतीच केली सेवा सुरू
बँक ऑफ बडोदाने व्हॉट्सअॅपवर बँकिंग सेवा सुरू केली आहे. आता तुमच्या व्हॉट्सअॅपच्या चॅट बॉक्समध्ये तुम्हाला बँकिंगशी संबंधित सर्व माहिती मिळू शकेल. यासाठी तुम्हाला फक्त बँकेने दिलेल्या नंबरवर मेसेज करावा लागेल. आपल्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून आपण बँकेने जारी केलेल्या 8433 888 777 या क्रमांकावर ‘Hi’ लिहून संदेश पाठवावा लागेल. यानंतर आपण व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून बँकिंग सुविधेचा वापर करू शकाल. (bank of baroda customers before making password take care of green color know about it)
संबंधित बातम्या –
7 एप्रिलपर्यंत SBI ग्राहकांसाठी बंपर ऑफर, प्रत्येक खरेदीवर मिळणार 50 टक्के डिस्काऊंट आणि…
हॉटेल सुरू करून महिन्याला कमवा 1 लाख रुपये, वाचा संपूर्ण प्लॅन…
Gold Price Today : पुन्हा घसरल्या सोन्याच्या किंमती, आताच चेक करा ताजे दर