बँक ऑफ बडोदाची खास योजना, 100 रुपयांत सुरु करा अकाऊंट, उत्त्पन्नवाढीसह करातही सवलत

नुकतंच बँक ऑफ बडोदाने अशाचप्रकारे एक बडोदा टॅक्स सेविंग फिक्स्ड डिपॉझिट योजना सुरु केली आहे. ज्यामुळे तुमच्या उत्पन्नवाढीसोबत करातही बचत होते. (Bank Of Baroda Tax Saving Term Deposit Scheme)

बँक ऑफ बडोदाची खास योजना, 100 रुपयांत सुरु करा अकाऊंट, उत्त्पन्नवाढीसह करातही सवलत
Money
Follow us
| Updated on: Jun 14, 2021 | 8:53 AM

मुंबई : जर बँक अकाऊंटमध्ये जमा असलेले पैसे मुदत ठेवीमध्ये रुपांतरित केले गेले तर त्यावर व्याज दिले जाते. त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा मिळतो. पण जर एखाद्याने टॅक्स सेविंग फिक्स्ड डिपॉझिट योजना सुरु केली, तर वाढत्या उत्पन्नासोबतच कर बचतीचाही लाभ घेता येतो. नुकतंच बँक ऑफ बडोदाने अशाचप्रकारे एक बडोदा टॅक्स सेविंग फिक्स्ड डिपॉझिट योजना सुरु केली आहे. ज्यामुळे तुमच्या उत्पन्नवाढीसोबत करातही बचत होते. (Bank Of Baroda Tax Saving Term Deposit Scheme)

भारतातील कोणताही नागरिक हे खाते उघडू शकतो. यामध्ये एक किंवा दोन व्यक्ती एकत्रित पैसे जमा करू शकतात. भारत सरकारच्या नियमांनुसार या खात्याच्या केवळ पहिल्या धारकाला कर बचतीचा फायदा मिळतो. दुसऱ्या धारकाला फायदा मिळत नाही. हा नियम जाईंट खातेधारकांसाठी आहे.

तर एका खातेधारकासाठी अशी कोणतीही सक्ती नाही. या खात्यात किमान 100 रुपये जमा करावे लागतील. जर तुम्हाला यापेक्षा जास्त रक्कम जमा करायची असेल तर तुम्ही 100 रुपयांच्या पटीत ती जमा करू शकता. यात तुम्ही एका वर्षात जास्तीत जास्त दीड लाख रुपये जमा करु शकता.

योजनेवर चक्रवाढ व्याज

या खात्यासाठी कर बचत ठेवींसाठी किमान लॉक-इन कालावधी हा 60 महिने आहे. म्हणजेच तुम्हाला ही योजना किमान 5 वर्षापर्यंत सुरु ठेवावी लागेल. ही योजना जास्तीत जास्त 10 वर्षे सुरू ठेवली जाऊ शकते. यात टॅक्स सेविंग फिक्स्ड डिपॉझिट योजनेवर चक्रवाढ व्याज दिले जाते.

यात प्रत्येक तिमाहीच्या शेवटी खात्यात व्याजाची रक्कम जोडली जाते. दरम्यान आतापर्यंच्या सर्व कर-बचत योजनांपैकी बँक ऑफ बडोदाची ही योजना अत्यंत चांगली मानली जाते. अनेक जण कर बचतीसाठी या खात्याचा वापर करतात.

कधी बंद करता येते अकाऊंट

मात्र ही योजना तुम्ही मॅच्युरिटीपूर्वी बंद करु शकत नाही. जर तुम्ही ही योजना घेऊन 5 वर्ष पूर्ण झाले असेल तर तुम्ही बँकेशी बोलून हे खाते बंद करू शकता. यावेळी तुम्हाला व्याज देखील मिळते. पण त्याची रक्कमही कर बचत एफडी व्याज दरापेक्षा एक टक्के कमी आहे. जर एखादा ठेवीदाराचा मृत्यू झाला तर हे अकाऊंट बंद केले जाऊ शकते.

करात किती सवलत?

या खात्यातील प्रथम धारकाला जमा केलेल्या मूळ रक्कमवेर आयकर कलम 80 सी अंतर्गत सूट मिळते. यानुसार एका आर्थिक वर्षात तुम्हाला दीड लाख रुपयांपर्यत सूट मिळू शकते. ही मुदत ठेव टीडीएसच्या नियमांशी जोडलेली आहे. त्यामुळे मुख्य रक्कमेवर कर सवलत दिली जाते. मात्र मिळालेल्या व्याजावर मात्र कर लावला जातो.

यासाठी तुम्हाला 15H/15G हा फॉर्म भरावा लागतो जेणेकरुन बँक व्याजानुसार टीडीएस वजा करणार नाही. विशेष म्हणजे या ठेवींवर ज्येष्ठ नागरिकांना चांगला व्याज मिळतो. बँक ऑफ बडोदा ज्येष्ठ नागरिकांना 0.5 टक्क्यांपेक्षा अधिक व्याज देते. हा नियम 1 कोटींपेक्षा कमी ठेवींना लागू होतो. या कर बचत एफडीसाठी नॉमिनी म्हणून तुम्हाला कोणाचेही नाव नोंदवता येते. (Bank Of Baroda Tax Saving Term Deposit Scheme)

संबंधित बातम्या : 

SBI ग्राहकांनो सावधान! ऑनलाईन बँकिंग करतेवेळी कधीही करु नका ‘हे’ काम, अन्यथा होईल मोठे नुकसान

एटीएम कार्ड हरवलंय? त्वरित करा ‘हे’ काम, अन्यथा होईल लाखोंचे नुकसान

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.